Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मी काय चुकीचे केले??

अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/11/2024 - 13:53
💬 133 प्रतिसाद
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही. मी काय चुकीचे केले?? activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली. मी काय चुकीचे केले?? संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला. मी काय चुकीचे केले?? सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले. “या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला. मी काय चुकीचे केले?? “मी पुण्यात राहतो.” “पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.” “जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले. मी काय चुकीचे केले?? “मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक” “पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.” ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली. मी काय चुकीचे केले?? पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली. “तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले. ती काहीतरी पुटपुटत निघून गेली. मी काय चुकीचे केले?? :( सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33401 views

💬 प्रतिसाद (133)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/11/2024 - 14:16 नवीन
सर्व चुकीचे केले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 04/11/2024 - 15:13 नवीन
एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/11/2024 - 15:49 नवीन
हाहाहा. खतरनाक. हसून हसून वाट लागली. :)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 04/11/2024 - 15:24 नवीन
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/11/2024 - 15:49 नवीन
खरंय.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/11/2024 - 16:08 नवीन
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/11/2024 - 16:22 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 04/12/2024 - 06:06 नवीन
मीपाव भरपूर ट्रोलरस् आहेत.तुमच्या चुका दाखविण्यासाठी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/12/2024 - 16:17 नवीन
मी काय चुकीचे केले चोंबडे पणा, आगाऊपणा, जास्त शहाणपणा आणि बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/12/2024 - 16:19 नवीन
हा हा हा. हा खरा प्रतिसाद. :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/12/2024 - 16:34 नवीन
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/12/2024 - 16:50 नवीन
ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 04/13/2024 - 07:10 नवीन
आणि दुस-यांच्या दारात ओका-या काढत फिरा !! पक्के डावे पुरोगामी आहात...
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 04/14/2024 - 16:53 नवीन
आणि दुस-यांच्या दारात ओका-या काढत फिरा !!
अगदी अगदी. जिकडे तिकडे हौदोस मांडला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/14/2024 - 17:24 नवीन
भाजपवर टीका म्हणजे हैदोस असतो??
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 04/15/2024 - 03:28 नवीन
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 04:44 नवीन
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 01:58 नवीन
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/16/2024 - 07:54 नवीन
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 08:06 नवीन
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/16/2024 - 08:14 नवीन
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/16/2024 - 08:40 नवीन
या तुम्ही. इथे घाण नका करू.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/16/2024 - 09:17 नवीन
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 09:55 नवीन
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 09:44 नवीन
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 09:56 नवीन
मत स्वतंत्र असणे आणि हेकटपणा करुन मीच तेवढा शहाणा असं मत असणे यात फरक आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 12:45 नवीन
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 09:57 नवीन
शक्य आहे. कॉग्रेसची ट्रोलसेना आहेच पैसे वाटणारी
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/16/2024 - 08:39 नवीन
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 09:54 नवीन
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 09:26 नवीन
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Wed, 04/24/2024 - 05:38 नवीन
त्याना की घरच्याना ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/16/2024 - 08:36 नवीन
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/16/2024 - 09:16 नवीन
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 09:12 नवीन
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/24/2024 - 15:30 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? ..............!!!!!!
  • Log in or register to post comments
D
diggi12 Fri, 04/12/2024 - 18:42 नवीन
तुम्ही पाकिस्तान लेखमालेचे भाग पटपट नाही टाकले
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/12/2024 - 19:25 नवीन
दर शुक्रवारी टाकतो. आज उशीर झालाय.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 04/13/2024 - 07:10 नवीन
बासी ईद मुळे का?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/13/2024 - 09:41 नवीन
हा... हा... हा... चूक ती चूकच! चुकीला माफी ना..... ही!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 04/14/2024 - 16:33 नवीन
दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sun, 04/14/2024 - 16:36 नवीन
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 04/15/2024 - 01:05 नवीन
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 04:49 नवीन
पण यातले प्रसंग खरे असतील तर कठीण आहे. 'सावधपण सर्व विषयी' फार महत्वाचे असते. दासबोध वाचावा अशी शिफारस करेन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 04/16/2024 - 09:51 नवीन
अपेक्षित क्रांती ४ जूनला होणार आहेच. वाद कशाला?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 04/16/2024 - 09:57 नवीन
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Tue, 04/16/2024 - 13:10 नवीन
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/16/2024 - 13:40 नवीन
भाजप विरोधि प्रतिसाद म्हणजे नकारात्मक प्रतिसाद?? किती तो भक्ती?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 00:47 नवीन
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Wed, 04/17/2024 - 12:23 नवीन
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा