माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .
सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला . तोल गेला की कपाळमोक्ष निश्चित ! अशा ज्या पारंपारिक मार्गाने केवळ एक टक्का परिक्रमावासी व नागा साधू जातात ,त्या मार्गाची ही एक डोळस अंतर्यात्रा ...
परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय , स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .
कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .
आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !
नर्मदे काठी बसून घराचे , प्रपंचाचे , कामाचे स्मरण करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहूनच , घरामध्ये बसूनच , सर्व कामे करता करताच अंतःकरणापासून नर्मदेच्या काठाचे चिंतन करणे कधीही श्रेष्ठ !
चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा
mazinarmadaparikrama.blogspot.com

💬 प्रतिसाद
(66)
स
सुक्या
Fri, 04/19/2024 - 08:28
नवीन
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल.
तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .
- Log in or register to post comments
N
Narmade Har
Fri, 04/19/2024 - 14:07
नवीन
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे .
बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !
- Log in or register to post comments
N
Narmade Har
Tue, 05/14/2024 - 16:42
नवीन
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !
- Log in or register to post comments
N
Narmade Har
Tue, 05/14/2024 - 16:43
नवीन
https://mazinarmadaparikrama.blogspot.com
- Log in or register to post comments
N
Narmade Har
Tue, 10/15/2024 - 13:51
नवीन
आमच्या उत्युपाचा दुवा
YouTube.com/@नर्मदा
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 10/15/2024 - 17:07
नवीन
पहात आहोत विडीओ.
नित्यनेमाने पोस्ट करत रहा हीच विनंती!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 10/17/2024 - 05:47
नवीन
नर्मदा परिक्रमा लेख वाचून वाटतं की करावी एकदा परिक्रमा.......
पण डास फार चावतात, शहरांतही रात्री फिरत नाही तर तिकडे कसं जमणार.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 10/19/2024 - 02:50
नवीन
स्लिपिंग बॅग वापरायची.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 10/17/2024 - 06:10
नवीन
नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो.
आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 10/19/2024 - 03:00
नवीन
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही.
दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची.
हाकानाका.
नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sat, 10/19/2024 - 08:44
नवीन
पण फक्त नंबर आहेत ते.
मैय्याने बोलवले तर जायचे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 10/19/2024 - 11:24
नवीन
मैय्याने बोलवले तर जायचे.
_/\_
🙏
- Log in or register to post comments
N
Narmade Har
Tue, 04/15/2025 - 14:24
नवीन
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com
आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 04/15/2025 - 18:47
नवीन
धन्यवाद. मी सारे लेख ब्लॉग वर वाचतो आहे. लिहिते रहा ...
- Log in or register to post comments
S
Sandeep Shejwalkar
Mon, 04/28/2025 - 11:19
नवीन
आपली नर्मदा परिक्रमेची अनुभवीत लेखमाला वाचत आहे. असेच लिहिते रहा ! नर्मदे हर !
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/07/2025 - 14:15
नवीन
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2
५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली.
नर्मदे हर.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2