Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गूढ कथा: अक्कल दाढ

व
विवेकपटाईत
Fri, 02/23/2024 - 06:30
💬 9 प्रतिसाद
(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील. काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळा ठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. मुले ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असे घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमिरात ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आल्यावर मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2625 views

💬 प्रतिसाद (9)
अ
अहिरावण Fri, 02/23/2024 - 06:56 नवीन
चेहरा अजुनही काळाच आहे की थोडा उजळ झाला?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 02/23/2024 - 07:56 नवीन
प्रतिसाद आवडला. बाकी देवाने चेहरा उजळ दिला आहे. अजून ही स्मार्ट दिसतो.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 02/23/2024 - 07:58 नवीन
म्हणजे आजूबाजुच्या बायका खालिल गाणे नक्की म्हणत असतील... https://www.youtube.com/watch?v=BZl2JWzfemM
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 02/23/2024 - 09:26 नवीन
खिक्क.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 02/23/2024 - 12:35 नवीन
माझे आवडते नाटक. बाकी हिंदीत म्हण आहे "जब साठा तब पाठा".
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 02/23/2024 - 11:05 नवीन
गूढ कथा नाही समजली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 02/23/2024 - 12:42 नवीन
काही फाईल्स लाल फितीत नेहमीसाठी बंद ठेवणे योग्य असते. त्या उघडल्या तर उघडणाऱ्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. कथेचा आशय सरकारी बाबू व्यवस्थित समजावून देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 02/23/2024 - 13:53 नवीन
अच्छा, आता समजली थोडी!
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 02/23/2024 - 15:24 नवीन
खाली स्पष्टीकरण दिले आहे ते वाचल्यावरच समजली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा