Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

व्ही फॉर – भाग दोन

ब
बिपीन सुरेश सांगळे
Mon, 02/12/2024 - 16:57
💬 3 प्रतिसाद
व्ही फॉर – भाग दोन -------------------- मयत उरकून ते परत निघाले. गाडीत खास पोरं होती ; पण सगळेच शांत होते . कारण दिप्या शांत होता. पोरांना वाटत होतं की भाई दुःखात आहे - मोठ्या भाईच्या . ते खरंही होतं; पण दिप्या या क्षणाला डबल दुःखात होता . पण तो हे कोणाला बोलला नव्हता . त्याला हे कोणाला सांगायचं नव्हतं . स्वतःचं दुःख तो गुमान गिळत , बाहेर बघत बसला होता . त्याला बाहेरचं काही दिसत नव्हतं . त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते . आणि बोलावं म्हणलं तरी कसं बोलणार ? असं त्याला वाटत होतं - आता तो मुख्य होता . त्यांच्या गँगचा डॉन ! त्याला एकदम पोक्त झाल्यासारखं वाटत होतं . तो कमजोर आहे असं पोरांना कुठूनच वाटता काम नये , असं त्याचं मन त्याला म्हणत होतं . गाडीने वेग घेतला तशी त्याच्या डोक्यातली चक्रं फिरू लागली. त्याच्या डोळ्यांपुढे मोठा भाई होता, त्याचं वागणं त्याचं दिसणं , त्याचा दरारा होता ... नवीन जबाबदारी होती. वाटेत खड्डा आला . गचका बसला तसं त्याचं विचारचक्र तुटलं. मग डोळ्यांपुढे फक्त -रिया रिया अन रिया ! XXX तो आठवणीत हरवला ... दीपक कॉलेजमध्ये गेला तसा वाईट पोरांच्या संगतीला लागला. त्याची भाईगिरी चालू झाली . पण इथेतिथेच . थोड्या प्रमाणात. एके दिवशी तो पोरांच्या घोळक्यात उभा होता . चर्चा अर्थातच भाईगिरी ! अचानक त्याला रिया दिसली. साधी पोरगी पण आकर्षक बांध्याची ,आकर्षक चेहऱ्याची . मोकळ्या सोडलेल्या केसांनी तिच्या चेहऱ्याला आणखीच गोडपणा आणला होता . तो तर तिच्या एका दिसण्यातच पागल झाला. त्याला नजरेसमोर सतत रियाच दिसू लागली . दिवस-रात्र ! वेडं वय ! एवढा हाणामाऱ्या करणारा गडी तो ! कायम हत्यार बाळगून फिरणारा गडी तो ! पण तिच्याशी बोलायचं म्हणल्यावर त्याची फाटायला लागली . एके दिवशी त्याने हिंमत करून तिला थांबवलं. .. त्याचा निष्कर्ष एवढाच- तिचा नकार ! पण त्याच्या मनातून ती काही केल्या जाईचना. पुढे कॉलेज गॅदरिंगला पोरापोरांच्या भांडणात एकाच खून झाला. त्या ग्रुपमध्ये दिप्या होता . त्या गुन्ह्यात तो आत गेला . कॉलेज सुटलं. शिक्षण संपलं. पण गुन्हेगारीत त्याची पीएचडी झाली आतमध्ये ! खरं तर तो मूळचा हुशार पोरगा होता . तिथून तो बाहेर आला तो पूर्ण भाई बनूनच ! तो मोठा भाईच्या गँगमध्ये सामील झाला . त्याचे कारनामे सुरु झाले . त्याचं नाव शहरात गाजायला लागलं. एके दिवशी त्याने मोठाच डाव रचला . त्याने रियाला किडनॅप केलं. आणि मोठ्या भाईच्या फार्महाऊसवर नेलं . ' रिया, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील?' त्याने मोठ्या आशेने विचारलं . पुढे काय वाढून ठेवलंय हे रियाला माहिती नव्हतं . ती घाबरली होती तरीही, ती बाणेदार पोर उत्तरली ,' कधीच नाही ! ' याच गोष्टीवर , याच गोष्टीवर तर फिदा होता तो ! ' पण का रिया ? मी तुला राणीसारखी ठेवीन गं !' 'तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे ?' तिने विचारलं . 'हो आहे ! बोल काय करू तुझ्यासाठी ? काय पाहिजे ते सांग . आत्ता हजर करतो . का कोणाचा जीव घेऊ ते सांग .' ' बस ? एवढंच ? अरे , फक्त जीव घेणं एवढंच सुचू शक तं का तुला ? ' तो ब्लॅक झाला . ' अच्छा ? ठीक आहे. तुझं माझ्यावर जर एवढं प्रेम असेल तर तू ही निवडलेली वाट सोडू शकशील - माझ्यासाठी?' ती म्हणाली . तो विचारात पडला . त्याला पटकन उत्तर सुचेना . तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. अन दिप्या म्हणाला ,'सोडली! ही भंगार लाईन आपण सोडली !' बाकीची पोरं तो येडा आहे अशा नजरेने बघू लागले. त्यांच्यासाठी दिप्याभाई एकदम डॅशिंग होता . त्याने तिला परत सुखरूप आणून सोडलं. त्याच्या साथीदारांनाही समजावलं. पण सगळं काही सरळ नसतंच. त्याच रात्री त्याच्यावर हल्ला झाला . एका जुन्या भांडणाच्या वादातून . थेट पोटातच गोळी घुसली होती त्याच्या. थेट आयसीयू ! तो वाचणं कठीणच होतं. xxx क्रमश:

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1460 views

💬 प्रतिसाद (3)
क
कर्नलतपस्वी Tue, 02/13/2024 - 01:27 नवीन
.......
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 02/13/2024 - 16:36 नवीन
वाचक मंडळी आभारी आहे आणि कर्नलजी अ . बाहुबली
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/22/2024 - 17:33 नवीन
उत्सुकता वाढवणारा भाग. सिनेमा बघतोय असं वाटतंय ! मस्त.. शैलीही छानच ! थॅन्क्यू, बिपीन सुरेश सांगळे !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा