Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शाळा की मंदिर

ट
टीपीके
Sun, 01/07/2024 - 08:56
🗣 105 प्रतिसाद
थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो. सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते. समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे? एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे. सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही. खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल आपला काय विचार ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 29667 views

🗣 चर्चा (105)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/10/2024 - 04:04 नवीन
ग़ालिब चा प्रसिद्ध शेर अर्ज है- शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं। -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/10/2024 - 04:08 नवीन
इकबाल या वर म्हणतो की- "मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं , काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं. आणि 'ग़ालिब' तू अपना रुख मोड़ क्यों नही देता. ज़रे-ज़रे में ख़ुदा है तू शराब छोड़ क्यों नही देता. -दिलीप बिरुटे ( प्रमाणातला ) :)
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 01/10/2024 - 05:39 नवीन
बाडिस! :-)
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Wed, 01/10/2024 - 07:53 नवीन
लेख गंडलाय बहुतेक, मला जे म्हणायचे होते त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींवरच चर्चा झाली. उगाच मंदिर किंवा जातीनिहाय सर्वेक्षणाबद्दल (आणि माझे यात काही ठाम मत नाही, जे नीट माहित नाही त्याबद्दल आत्ता तरी न बोललेले योग्य ) लिहिले, खरं तर ते नसले तरी हा लेख लिहिता आला असता. त्यामुळे क्षमस्व. परत एक प्रयत्न करतो. एक उदाहरण म्हणून शिल्पकला घ्या. तशी निरुपयोगी कला. खरं तर जगण्याची जिथे खाण्या जगण्याची भ्रांत तिथे सगळ्याच कला निरुपयोगी पण निदान संगीत , नाटक ह्या समुदायाने/समुदायाला आनंद देण्याऱ्या कला आहेत आणि त्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकतात. जसे प्रेरणा देणे, ज्ञान किंवा इतिहास जपणे जे रिकाम्या पोटीही जरुरी असू शकते. परंतु शिल्पकला , चित्रकला या थोड्या स्वान्तसुखाय विभागात येऊ शकतात. त्याचवेळी हेही खरं आहे की काही लोकांकडे उपजतच ह्या कला असतील. अशा लोकांना जर जबरजस्तीने इतर काम करावे लागले तर ते नीट करू शकणार नाहीत किंवा उपाशी मरू शकतील. पूर्वीच्या काळी शिल्पकलेचे मुख्य ग्राहक म्हणजे मंदिरे किंवा महाल किंवा जसे युरोपिअन गॉथिक शैलीतील घरे. आता मात्र यातील कोणतेच ग्राहक हि कला वापरत नाहीत त्या मुळे या कलाकारांची कुचम्बणा होत असेल आणि त्यांना अर्थांजन कठीण असेल. अशा वेळी नवीन मंदिरे पारंपरिक पद्धतीने बांधली गेली तर अशा लोकांना पण स्वाभिमानी जगणे शक्य होईल असे म्हणणे होते. आणि मंदिरात वाईट काहीच नाही, ती ही अर्थव्यवस्थेत मदत करतातच. त्यांचा फक्त ब्राह्मणांनाच फायदा होतो असे नाही. अनेक दुकाने असतात जी ब्राह्मणांची नसतात, त्या साठी ज्या वस्तू बनवल्या जातात त्यांचे उत्पादन काही ब्राम्हण करत नाहीत. उलट सर्वच जातींच्या लोकांना (ब्राम्हणांपेक्षाही अधिक) मंदिरामुळे जगण्याची, कमावण्याची संधी मिळते. त्यामुळे ब्राम्हण द्वेष असल्याने मंदिर नको असा विचार फार वेडगळ विचार आहे. असो, परत मंदिरांची अर्थव्यवस्था हा विषय नसून, वेगवेगळ्या प्रज्ञा आणि त्यांना समाजात उपलब्ध संधी या अनुषंगाने मी हा विषय मांडला होता. अजूनही मुद्दा समजावण्यात मी कमी पडलो असेन किंवा समजूनही सोयीचा नसल्याने पटत नसेल तर इग्नोरास्त्र मारा :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/10/2024 - 08:36 नवीन
मंदिर की शाळा ह्यात शाळाच आधी असनार. असा प्रश्न तुन्हाला पडूच कसा शकतो??
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 01/10/2024 - 11:08 नवीन
आणि रोजगाराला सहाय्य करतात हा युक्तिवादच मुळी फार तकलादू आहे. हाच युक्तिवाद पुढे कोणत्याही वादग्रस्त उद्योगांना (जसे फटाक्यांचा कारखाना) लावता येऊ शकतो ना? मंदिरांच्या निमित्ताने कलेच्या भरभराटीला चालना मिळाली हा भूतकाळ झाला. सध्याच्या काळात भरमसाठ संपत्तीचा ओघ असणारी शिर्डी आणि तिरुपती संस्थांना कलेला उत्तेजन म्हणून त्यांच्या मंदिरांचे प्रांगण देताच येणार नाही अशी परीस्थिती आहे. तरी पण घटकाभर म्हणू या कि कलेला उत्तेजन देण्यामध्ये मंदिरांचं महत्व होतं. पण आज अशा व्यासपीठांची गरज आहे का? जहांगीर आर्ट गॅलरी, एनसीपीए, भारत भवन, केंद्र आणि राज्य सरकारांची कला आणि सांस्कृतिक खाते, आणि इतर कितीतरी सरकारी आणि खाजगी व्यासपीठे उपलब्ध असतांना पर्यावरण आणि सामाजिक स्वास्थ्य यांना क्षती पोहोचवणारी मंदिरं खरंच अहमिहिकेने उभारावीत का हा प्रश्न आहे. बाकी ईतर कितीतरी मंदिरांशी निगडित उद्योगांचा ब्राह्मणांशी काही संबंध नसतो असा काही तरी मुद्दा उपस्थित करून मंदिरं नेमकी हवीत कुणाला याचं उत्तर तुम्ही दिलंय असं समजावे का?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Wed, 01/10/2024 - 11:39 नवीन
मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच आहे. मुद्दा समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या प्रज्ञेप्रमाणे काम मिळणे आहे. पूर्ण लेखातले शाळा किंवा मंदिर हे डिस्ट्रॅक्टर्स आहेत. तिकडे लक्ष देऊ नका. उदाहरण वाईट म्हणून मुद्दा चुकीचाच असे नसते ना?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/10/2024 - 13:16 नवीन
समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या प्रज्ञेप्रमाणे काम मिळणे आहे.
असे करणे अतिशय अवघड असते. मोठ्या आकाराच्या समाजात प्रत्येकाला आपली प्रज्ञा वापरून रोजगार मिळणे, आणि विशेषतः त्याच्या आर्थिक अस्पिरेशन्स पुऱ्या होणे हे फार कठीण आहे. सामाजिक आणि राजकीय रचना अशा सर्वोदयी प्रकारची बनवणे महाकठीण आहे. मागणी पुरवठा हेच विश्वाचे मूळ तत्व. मग तुम्ही कितीही समान वितरण करायचा प्रयत्न करा. तबला वाजवणे, पोहणे, प्राकृत भाषेचा अभ्यास, पूजापाठ, सेल्युलर बायॉलोजी, ट्रक चालवणे, मजुरी, जाहिरात, क्रिकेट, खो खो, हालगी वादन, नृत्य... प्रज्ञा यातील कशातही सापडू शकते. पण त्यात मिळणाऱ्या "संधी" या त्या प्रज्ञेचे आविष्कार, आऊटपुटस किती लोक पैसे मोजून खरेदी करायला तयार आहेत यावरच ठरते. एका मर्यादेपलीकडे मागणी नसलेल्या संधी कृत्रिम रित्या उत्पन्न करता येत नाहीत. सर्वत्र प्रोत्साहन पॅकेज किंवा परवडत नसतानाही काही कौशल्य जपण्यासाठी कोणाला फार सतत सबसिडी देता येत नाही. दुर्दैवाने प्रज्ञा आणि संधी (उपजीविका, अर्थार्जन) हे एक न जुळणारे गणित आहे. केवळ मानसिक समाधान याबद्दल बोलत असाल तर वेगळी गोष्ट.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Sat, 01/13/2024 - 12:28 नवीन
विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव प्रतिसाद. :) परत एकदा, हे किंवा ते हा मुद्दाच नाहीये, तर हे हि जरुरी आहे पण तेही जरुरी आहे आणि दोघांतही तोल सांभाळला गेला पाहिजे हा मुद्दा आहे. आता तोल म्हणजे अगदी ५०% हे आणि ५०% ते असेही नाही. प्रत्येक समाजाच्या गरजा आणि त्या वेळेचा तोल वेगळा असेल. तसे म्हंटले तर खेळही (व्यवसाय म्हणून) का पाहिजे? पण समाजात आपण खेळ सामावून घेतलेच ना? उलट आता त्या संबंधी किती नवीन व्यवसाय चालू झाले आहेत? कोचिंग, उपकरणे, अगदी वैद्यकीय व्यवसायात पण विशेष शाखा निर्माण झाल्या आहेत. इतकेच काय पण किती वेगवेगळ्या प्रकारे संशोधनही होत असते, की माणसाच्या शरीराची क्षमता किती? उसेन बोल्ट अजून किती जोरात धावू शकतो? कोणत्या प्रकारचे कपडे घातले की माणूस अधिक जोरात पोहू शकतो? TV वर कोणत्या पद्धतीने खेळ दाखवले की लोकांनां आवडेल, त्या साठी नवीन कॅमेरे, DRS सॉफ्टवेअर? आहारातील संशोधन इत्यादी इत्यादी ... सांगायचा मुद्दा असा की खेळ या एकाच निरुपयोगी (समाजासाठी) प्रज्ञेचे व्यावसायिकरण झाल्या मुळे किती नवीन संशोधन झाले, व्यवसाय निर्माण झाले आणि अर्थव्यवस्थेत किती भर पडली? सुरवातीला एखाद्या वेळेस समाजाला किंवा सरकारला थोडी गुंतवणूक करावी लागते, पण नंतर फायदेही मिळतातच ना? पण प्रयत्न तर करावे लागतात. स्टेडियम्स, प्रशिक्षण केंद्रे किंवा या धाग्यावर ज्या वरून भांडणे चालू आहेत ती मंदिरे हि फक्त फॅसिलिटेटर्स आहेत, नॉट डेस्टिनेशन ... गविंचा मुद्दा बरोबर आहे की अगदी मोजून मापून अशा संधी तयार करणे आणि त्यात बॅलन्स आणणे कठीण किंवा अशक्य आहे, पण निदान अशा प्रज्ञा असतात हे मान्य करणे, त्या प्रकारच्या लोकांसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही एक चांगली सुरवात असू शकते ना? इतकेच :) माझा खरा राग अशा लोकांवर असतो की ज्यांना राजकीय दृष्ट्या (फक्त मोदी/राहुल असेच नाही तर भांडवलशाही/समाजवाद किंवा तत्सम ) एखादी गोष्ट सोयीची नसली की मग असे हे की ते करून बुद्धिभेद करणे चालू होते. मग चांद्रयान पेक्षा हॉस्पिटल बांधायला पाहिजे होते किंवा तत्सम भांडणे चालू करतात ही लोकं. एक उदाहरण म्हणून, नेहरूंनीही IIT, IIM, धरणे, ISRO यांना सपोर्ट केलेच ना , मग त्या वेळी कोणी असे बोलले असते की फक्त प्राथमिक शाळा चालू करा आणि जो पर्यंत १००% साक्षरता नाही तो पर्यंत माध्यमिक शाळा किंवा IIT , IIM नको, तर भारताची प्रगती झाली असती का? आणि नुसते शिक्षण देऊन उपयोग होत नाही ना? त्या प्रमाणे जगण्याच्या संधीही तयार कराव्या लागतात. त्या नव्हत्या म्हणूनच त्या काळातील उच्च शिक्षित भारताबाहेर गेले ना? त्या काळात भारताला जितका फायदा व्हायला पाहिजे होता या संस्थांचा तितका झाला नाही. बरे ज्यांना सायंटिफिक टेम्पर आहे त्यांच्यासाठी या संस्था उपयोगी होत्या, पण प्रत्येकाकडे सायंटिफिक टेम्पर असू शकत नाही ना? त्याचे काय? की मग हरणाला उडता येत नाही म्हणून त्याची टर उडवायची की त्याला मारून टाकायचे? समाजात प्रत्येक जण वेगवेगळ्या लेवल ला असतो, एकीकडे एखादी स्त्री अगदी नरकमय जगत असेल त्याच वेळी दुसरी स्त्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असेल. दोघींच्याही गरजा, लागणारा सपोर्ट वेगवेगळा पण जेनुइन असेल. तुम्ही फक्त अधिक वाईट परिस्थितीतील व्यक्तीलाच मदत करावी असे नाही ना करू शकत. त्यामुळे प्रश्न हे किंवा ते नसून , हे आणि ते आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या प्रज्ञेसाठी जर संधी दिसली तर ती एक्सप्लॉईट केलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 01/13/2024 - 13:52 नवीन
मला वाटतं की तुमच्या कल्पनेतच आजच्या घडीला खुप फोलपणा होता. त्यामुळे शाळा की मंदिर या त्यातल्या त्यात स्पष्ट कल्पनेवर जास्त चर्चा झाली. आता फोलपणाकडे वळूया: त्या अगोदर प्रज्ञा आणि प्रज्ञावंत या गोष्टी कशा लाडावत जाऊ शकतात त्याचे उदाहरण सांगतो. जवळपास पंधरा वर्षापूर्वी माझ्या टीममध्ये एक टेकनिकल रायटर होता. साधारण कामावर रुजू झाल्यानंतर लगेचच काही दिवसात आम्हाला आपला निर्णय चुकला याची जाणीव झाली. यथावकाश ओरिएंटेशन, प्रॉडक्ट ट्रेनिंग झाल्यावर काही दिवसांनी साहेबांना एक हलकीशी असाइन्मेंट दिली. त्यांनी ती काही केली नाही. होता होता बॅकलॉग चांगलाच साठला आणि साहेबांना दट्ट्या दिला. त्यावर त्यांनी “लिहीणं हे सृजनशील काम आहे आणि अशी कामं कधीपर्यंत पूर्ण होतील हे कसे सांगता येईल” असा लडीवाळ प्रश्न विचारला. हा फिडबॅक दिल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांचा आम्ही निरोप समारंभ केला. मुलांच्या प्रज्ञेच्या शोधात त्या व्यक्तींची आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची वाईट गत झाल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या ऐकण्यात आणि पाहण्यात असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील मुलांना भाषा, सोपे विज्ञान, खेळ, सोप्या कला असा सरधोपट कार्यक्रम सर्व मुलांना देतो आणि मग त्यांचा कल लक्षात यायला लागतो. त्यानुसार कुलदीपक किंवा दीपिका काय दिवे लावणार आहेत त्यानुसार आपल्या उत्तर आयुष्याची आपण बेगमी करतो. प्रज्ञेचा शोध यालाच म्हणत असावेत!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:39 नवीन
मानसिक संतुलन सुधरले की असे प्रतिसाद येतात.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 01/11/2024 - 07:50 नवीन
अशी अर्थहीन वाक्य खरे तर कुणाचं मानसिक संतुलन ढळलंय हे सांगायला पुरेशी आहेत. मानसोपचार आता समाजमान्य आहेत. लवकरात लवकर उपचार सुरु केल्यास आणि रोग अजून भिनला नसल्यास तब्येतीला उतार पडू शकतो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/10/2024 - 09:38 नवीन
चलाख शाळामालकानी म्हणूनच 'सरस्वती विद्या मंदीर्/बालमोहन विद्या मंदीर' अशी नावे दिली असावीत काय? शाळा की मंदीर अशी तुलना म्हणजे 'पोळी की भात' असे विचारण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:36 नवीन
विद्या भारती ही संस्था सरस्वती शिशु मंदिरांचे संचालन करते आजच्या घटकेला वीस हजारहून जास्त शाळा, अधिकांश मागास व दुर्गम भागात चालवितात. ३५००० एकल विद्यालये ही वनवासी आणि दुर्गम भागात. उद्देश्य सामान्य आणि गरीब जनतेला शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमांनी होणारे धर्म परिवर्तन थांबविणे. हजारों शिक्षकांनी आपली आयुष्य वेचले आहे. कित्येक नॅक्सली आणि देशविरोधी हल्यात मुख्यत नॉर्थ इस्ट भागात शहीद ही झाले आहेत.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 01/11/2024 - 06:40 नवीन
विद्या भारती ही संस्था सरस्वती शिशु मंदिरांचे संचालन करते आजच्या घटकेला वीस हजारहून जास्त शाळा, अधिकांश मागास व दुर्गम भागात चालवितात. ३५००० एकल विद्यालये ही वनवासी आणि दुर्गम भागात. उद्देश्य सामान्य आणि गरीब जनतेला शिक्षण उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमांनी होणारे धर्म परिवर्तन थांबविणे. हजारों शिक्षकांनी आपली आयुष्य वेचले आहे. कित्येक नॅक्सली आणि देशविरोधी हल्यात मुख्यत नॉर्थ इस्ट भागात शहीद ही झाले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुरिया गुरुवार, 01/11/2024 - 10:47 नवीन
विद्या भारति जे काही काम करते त्याचा पूर्णपणे आदर ठेऊन, पटाईत साहेब तुम्ही सुशिक्षित आहात, इंग्रजी चांगले जाणता हे ध्यानात घेऊन विचारतो की मोठमोठे आकडे फेकून दणकून लिहायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? ह्याचे उत्तर अगदीच सगळ्यांना माहीत असले तरी सल्ला एकच आहे. प्रचार करताच आहात तरी खरा तरी करा. कारण विद्या भारतीच्याच साईटवरचा हा मजकूर. विद्या भारती १००० प्लस शाळा चालवते, त्यातील १०० प्लस शाळांना निवासी सुविधा आहे, हि सुविधा वनवासी कल्याण केंद्रा कडून केली जाते. आपण ठोकलेला वीस हजारहून जास्त शाळा यातील २०००० हा आकडा विद्यार्थ्यांचा आहे. तेही विद्या भारती कडून मोफत शिक्षण घेणारे आदीवासी विद्यार्थी. जे वनवासी कल्याण केंद्राच्या हॉस्टेल वर राहतात. ३५००० एकल विद्यालयाचा स्त्रोत तुम्हीच द्या.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/11/2024 - 11:50 नवीन
पटाईत साहेब काहीही लिहीत असतात. काहींना तर त्यांनी युगपुरूष घोषीत केलेय.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 01/12/2024 - 15:37 नवीन
१. माझा मुलगा/ मुलगी गेले कित्येक दिवस शाळेत गेला नाही. २. माझा मुलगा/ मुलगी गेले कित्येक दिवस मंदीरात/ मशिदीत/ माझ्या धर्माच्या प्रार्थना स्थळाला गेला नाही. मंदीराचा आग्रह धरणार्यांपैकी किती जणांना १ ची अधिक चिंता वाटेल? सध्याच्या महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आहेत त्या सरकारी शाळांची अवस्था काही अपवाद सोडले, तर दयनीय आहे. परंतु शिर्डी, पंढरपूर, एकवीरा देवी इ. अनेक देवस्थानांचा विकास करण्यासाठी मात्र शासन अगदी कटीबध्द असल्यासारखे निर्णय घेऊन कामे करत आहे. आपल्या समाजाला आपण कुठे घेऊन जात आहोत, याचा विचार तर कराल?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 01/13/2024 - 09:55 नवीन
हिंदुची चूक झाली मंदिर बांधून, आपण इंदू मिल च्या जागेवर शाळा बांधायला हवी काय म्हणता?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 01/13/2024 - 11:02 नवीन
त्या भागात चांगल्या शाळाच नाहीत. मोठ्ठ पटांगण मुलांना खेळाचे मैदान होईल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/13/2024 - 11:15 नवीन
मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 01/13/2024 - 13:46 नवीन
ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या धर्मस्थळाबद्दल पण तुम्हाला हेच वाटत असेल ना की तिथं शाळा व्हायला हवी?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/13/2024 - 14:04 नवीन
सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून काय करनार?? काही ठिकाणी सार्वजनीक शौचालयेही हवीत.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 01/13/2024 - 14:10 नवीन
म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर आहे तर, असो चालूदे तुमचे आत्मकुंथन.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/13/2024 - 15:37 नवीन
आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे घेतलाय??
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sat, 01/13/2024 - 19:33 नवीन
नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला लावलेय. मंदिरा किंवा शाळा तर शाळाच हवी अस काहीतरी कोण बोलत होत, बघा बघू कोण होत ते?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/13/2024 - 20:30 नवीन
म्हणजे तूमचा शाळेला विरोध आहे तर
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/12/2024 - 18:49 नवीन
माणसाचं मन डेव्हलप व्हायला हवं कि बुद्धी? मूळात हे either or आहे का ??
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 01/13/2024 - 03:57 नवीन
शाळेच्या पातळीवर शिकवलं जाणारं नागरिकशास्त्र हे बहुतांशी मनाने शिकण्याचा विषय असायचा. तेव्हा मन आणि बुद्धी असा काही भेद करता येतो असं वाटत नाही. यमुनेचं पात्र तुडवून केलेला सत्संग, लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असणारे, वगैरे दिव्य आत्मा बघितले तर मंदिरांमध्ये मनाची मशागत होते असं म्हणणं फार धारिष्ट्याचं होतंय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 01/15/2024 - 07:03 नवीन
इथले अनेक प्रतिसाद बघुन त्यांना शाळेचा तरी काय उपयोग झाला याची शंकाच येते.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 01/15/2024 - 08:05 नवीन
सध्या आपण जे अनुभवतो आहे त्याची माझ्यामते कारणमीमांसा अशी आहे: आपल्या सर्वांच्या आयष्यात ढोबळमानाने चार टप्पे येतात. पहिल्या टप्प्यात आयुष्याची पायाभरणी असते. माझ्या पिढीत (चाळीस वर्षांपूर्वी) नोकरीच्या संधी तशाही फार कमी होत्या. तशात बऱ्याच पांढरपेशा कुटुंबांमध्ये जमीन जुमला वगैरे काही नसल्यामुळे सर्व शक्ती शैक्षणिक पात्रता मिळविण्यासाठीच वापरली जायची. नंतर येते तो आयष्यात स्थिरस्थावर होण्याचा टप्पा. नोकरी, व्यवसाय, संसार असा हा टप्पा. पुढच्या टप्प्यात माणूस यथाशक्ती काही तरी सामाजिक कार्यात भाग घेतो. सत्संग, छंद अशा गोष्टींकडे काही जण वळतात. आपण ओळखलो जाओ अशी एक माफक ते तीव्र स्वरूपाची उर्मी यावेळेस तयार होते. नंतर येतो तो विश्रांतीचा टप्पा. स्वतःला आहोत तसं व्यक्त करणं जसं प्रवास करणं, वाचन अशा गोष्टींमधून आपण व्यक्त व्हायला सुरुवात होते. आत्ताच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यावर असणाऱ्या मध्यम वर्गीयांनी धार्मिक अस्मिता हे आपली ओळख आणि अभिव्यक्ती करण्यासाठी निवडली आहे हे प्रकर्षाने जाणवते. निव्वळ दिमाखदार सुविधा यांना हा वर्ग विकास समजतो. वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहे. येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 01/15/2024 - 09:45 नवीन
येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.
१. धार्मिक निष्ठा कुणाला वाहायच्या हे निश्चित करणे चूक आहे का? २. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठा कुणाला वाहिल्या आहेत? ३. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठांची निश्चिती केंव्हा केंव्हा बदलली आहे? ४. या चर्चेत कुणी कुणास चितपट केले आहे? --- चर्चा म्हणजे माहिती, विचार, मत इत्यादींचे आदानप्रदान असे हिंदू धर्म सांगतो आणि तसे आचरण करतो. चर्चच्या नावाखाली कुणाला चितपट करण्याचे मनसुबे बाळगणे हे हिंदू धर्मास मान्य नाही.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 01/15/2024 - 09:49 नवीन
वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहे
अरे! पुरोगामी लोक असा विचार करतात! बरं झालं तुम्ही इथे उघड केलेत ते. सनातनी हिंदू धर्म मात्र - ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ अशी सर्वांच्या हिताची कामना करतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/16/2024 - 14:36 नवीन
राज घाट, महात्मा गांधींची समाधी : 40 एकर. शांती वन, जवाहरलाल नेहरूंची समाधी : 53 एकर शक्ती स्थळ,इंदिरा गांधींची समाधी : 45 एकर राजीव गांधींची समाधी : 15 एकर राम मंदिर : 2.7 एकर. गांधी-नेहरूंची समाधी बांधली जात असताना कोणाला शाळा, कॉलेज, हॉस्पिटलचा विचार आला नसेल का? दिल्लितील अशा सुपर प्राइम प्रोपर्टी विकल्या तर किती शाळा, कॉलेज, हॉस्पिटल बान्धता येतील?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/16/2024 - 14:39 नवीन
खर्च??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/16/2024 - 15:02 नवीन
कुणाचा?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/16/2024 - 15:15 नवीन
दोघांचा. आणी कार्य??
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/16/2024 - 15:22 नवीन
तसंच महात्मा गांधी, इंदिरा गांधी वगैरे लोक महान होते. महात्मा गांधीतर खोटंही बोलायचे नाहीत. आजकाल खोटारज्या लोकांचा ऊदऊदो करायची परंपरा आलीय. असो. मंदीरांचा ऊपयोग काय?? संत गाडगेबाबा तर सांगून गेलेत मंदिरात फक्त पुजार्याचे पोट असते. प्रश्नकर्त्याने मंदिर की शाळा असा प्रश्न विचारलाय. समजा गावात मंदीर असेल तर पुजार्याची सोय होईल पण शाळा नसेल तर गावातल्या पिढ्या अशीक्षीत राहतील. विद्या नसेल तर काय होते हे महात्मा फुले आपल्याला सांगूनच गेलेत. मग मंदीर महत्वाचं का शाळा?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/17/2024 - 05:42 नवीन
मंदीरांचा ऊपयोग काय? मग या समाधी स्थळान्चा तरी काय उपयोग आहे. दिल्ली मधील अतिमहत्त्वाच्या जागा अड्वून ठेवण्या पेक्शा त्या जागान्चा विधायक कार्यासाठी उपयोग करा की! नाही तरी साडे चार कोन्ग्रेसी सोड्ले तर कोण जातय तिथे? मन्दिरात हजारो लाखो भाविक जातात फुल,प्रसाद, खाद्यपदार्थ विक्णारे, रिक्शावाले होटेलवाले इ चे पोट तरि भरते
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/17/2024 - 05:47 नवीन
कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती ह्यांनाही खतपाणी मिळते ते समाधीस्थळी नाही मिळत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/17/2024 - 06:06 नवीन
काय सान्गताय काय? कोणत्याही नेत्याच्या समाधी स्थळी गड्बड करुन पहा, दन्गल होते की नाही? बाकी तुमच्याकडून अधिक काय अपेक्शा करणार?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/17/2024 - 06:23 नवीन
गडबड केली तर होते. ते ही होईलच असे नाही. पण मंदिराचं तसं नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/17/2024 - 06:43 नवीन
आपण अधिक विचार करणार नाहीच. तुमच्याकडून अधिक काय अपेक्शा करणार?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/17/2024 - 06:55 नवीन
जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर नाही. माहीतीय मला. देशाच्या अधःपतनाला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे ज्याला वाटतं की शिक्षण, रोजगार ह्यापेक्षा धार्मीक मुद्दे जास्त महत्वाचे आहेत. - पेरियार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 01/17/2024 - 06:57 नवीन
तुमच्या भम्पक युक्तिवादाला कुणाकडेच ऊत्तर नाही. तेन्व्हा तुमच चालु द्या
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/17/2024 - 07:02 नवीन
कर्मकांडं , अंधश्रध्दा, ह्यावर तुम्ही लिहीलं नाहीत. शाळा का नको मंदिर का हवं? ह्यावरही तुमच्याकडे ऊत्तर नाही. समजू शकतो. देश मागेमागे का चाललाय हे लक्षात आले असेलच तुमच्या.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 01/16/2024 - 15:51 नवीन
कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे! ज्या काळात हि स्मारके उभारली तेव्हाची शैक्षणिक संसाधने असण्याची गरज आणि आजची गरज याचा काही विचार कराल कि नाही? आज प्राथमिक शाळांची फी देखील लाखाच्या घरात आहे. जी स्मारकं तुम्हाला खुपत आहेत त्यांच्या अगोदरच आयआयटी दिल्ली (स्थापना १९६१), हंसराज कॉलेज (स्थापना १९४८) अशा संस्था होत्या. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था अगदी तालुकाच्या गावापर्यंत पोहोचल्या होत्या.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/17/2024 - 07:33 नवीन
असा युक्तिवाद कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे!
शतश: सहमत शिकलेले लोक (मिपावर प्रतिसाद लिहितात म्हणजे शिकलेले असतील असे समजतो) सुद्धा "मंदिर व शाळा ह्या दोन बाबी म्युच्यूअली एक्स्क्लूजिव नसतात" हे समजून न घेता शाळा की मंदिर असा वाद घालतात याचेच ते द्योतक आहे. अर्थात ही तुम्ही म्हणताय तशी त्यांची बालबुद्धी आहे की त्यांची बदमाशी आहे हेही आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/25/2024 - 08:05 नवीन
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी हाणामारीत ही सूंदर कविता सापडली. शाळा पडू द्या,त्यात लेकरू मरू द्या.... पण तुम्ही देवळे बांधा बापहो….... सोन्याचा कळस चढवा त्यावर , उद्याच भविष्य दडलंय ना त्यात तुमचं ..…… बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर, माणसाच्या जीवनात समृद्धी आणत असेल तर.... विकणारा काय खुळा आहे का ? का मूर्ती घडवणारा खुळा आहे ? तो स्वतःच भलं करण्याऐवजी , बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल ? हे कधी कळणार माझ्या बाप हो तुमाले राष्ट्रसंत गाडगेबाबा
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 01/25/2024 - 08:19 नवीन
थोरांचे थोर विचार... उद्याला अमरावतीत जाणार आहे. तिकडे बाबांच्या समाधीस्थळी भेट देणार आहे. आरती प्रसाद झाल्यावर ही कविता ऐकवतो सगळ्यांना
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा