Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

रहस्यकथा भाग १ : डाग

म
म्हया बिलंदर
Sat, 01/06/2024 - 11:09
💬 4 प्रतिसाद
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ भाग १ : डाग पुणे-मुंबई शहरी भागात कुठेही महागड्या सोसायटी मध्ये किंवा स्वतः ची जागा घेऊन राहणं शक्य असतानाही कबीर ने खंडाळ्यात एकाकी बंगलो घेऊन राहणं पसंत केलं. प्रोफेशनने सी.ए. होता शिवाय कमी वयातच त्याने मार्केट मध्ये स्वतःचं स्थान कमावलं होतं. एक ऑफिस पुण्यात स्वारगेट ला तर दुसरं नवी मुंबईत पनवेल ला. दोन्ही कडे त्याचे आठवड्यातले वार देखील ठरलेले होते. दोन्ही ऑफिसेस मध्ये मोजकाच काही स्टाफ कामाला होता. एकंदर त्याचं प्रोफेशनल करीअर व्यवस्थित चाललं होतं. कबीर आणि माया दोघेही कॉलेज मध्ये होते खरे पण एकमेकांपासून तसे अलिप्तच. माया त्याला दोन वर्षे ज्युनियर. हा कॉलेजचा टॉपर असल्याने सर्वांच्या ओळखीचा. याचा मित्र परिवार भरमसाट तर दुसरीकडे माया तिच्या मोजक्याच मैत्रिणींमध्ये इतर सामान्य मुलीं सारखी. काही योग जुळून आले आणि मायाच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिच्या घरच्यांनी कबीर च्या घरच्यांशी संपर्क साधून दोघांच्या गाठी जोडल्या. कबीर आणि माया दोघांकडून विरोध करण्याचे काही कारण नसल्याने लग्न देखील लगेच यथासांग पार पडलं. कबीर चं करिअर लौकर सुरू झाल्याने एकमेकांना लग्नाआधी भेटणं वगैरे सोपस्कार त्यामानाने कमीच. वैवाहिक जीवनात दोघेही एकमेकांना भरपूर प्रेम, मान-सन्मान, आदर द्यायचे. 'यांचं कॉलेज पासूनच काहीतरी असावं' असा संशय यावा इतकं ते एकमेकांवर प्रेम करायचे. लग्नानंतर एका वर्षात पाळणा हलला आणि त्या गोंडस बाळसेदार मुलीचं नाव उत्तरा ठेवण्यात आलं. कबीर आणि मायाच्या आनंदाला काही सीमाच उरली न्हवती. एकंदर कबिरचं खाजगी आयुष्य ही मस्त चाललं होतं.उत्तरा ला तिच्या आजी आजोबांकडे पुण्यातच शिकू द्यावं म्हणून अगदी पहिलीपासून च पाठवण्यात आलं. हा निर्णय पूर्णपणे कबिरचा होता. माया खूप भांडली पण कबिरपुढे तिचं चालेना. गेले काही दिवस कबीर विक्षिप्त वागत होता. खंडाळ्याला राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याचाच. तो रात्री बेरात्री कुठे जातो हे मायाला देखील माहीत नसायचं. त्याच्यावर संशय यावा असा तो स्त्री-लंपट नक्कीच न्हवता पण त्या दिवशी सकाळी मायाला त्याच्या सफेद शर्टावर लिप्स्टिकचे वाटावेत असे लालसर डाग दिसले. क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2427 views

💬 प्रतिसाद (4)
क
कानडाऊ योगेशु Sun, 01/07/2024 - 06:26 नवीन
सुरवात छान.पण मोठे भाग लिहिले तर उत्तम.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Mon, 01/08/2024 - 07:49 नवीन
इतका छोटा भाग ? आणि पनवेल हे नवी मुंबईचा भाग न्हवे.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 01/08/2024 - 08:08 नवीन
पनवेल हे नवी मुंबईचा भाग न्हवे. काय सांगता :=)
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Wed, 01/17/2024 - 10:16 नवीन
छान सुरवात... पुढचा भाग लवकर येवुदे....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा