Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सुटलेला डाव !

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 01/05/2024 - 08:18
आज भांबावला दिस काही येई ना मनात अंधार व्यापलं आकाश उजेड उरे पणतीत ठरलेल्या अवसरी रान गेलंच उठून पक्षी शोधी रानमेवा पंख जाती हो थकून . खेळ चुकलेला सारा मना दुःख्ख देई मोठे तिथे लावो कोणी लेप सारे मोठ्ठे खोटे खोटे कोठे गेली हीरवळ मन शिडकावे तीला मोडलेल्या फांदीवर एक बांधलेला झुला . सारे खोट्यात खोट्यात काय शोधू खरे खरे नशिबाचे तोडून तारे दगडाला म्हणती हिरे अंती खरे एक आहे झाले ते ते स्विकारावे आयुष्याच्या सरणीला मोजून ते ते मांडावे . सारा हिशेबच आहे आयुष्याचा हाच धंदा कधी बंदा लागे हाती कधी पोकळीचा चंदा काय करू अंत याचा ? काव्य म्हणू की भावना ? धरले व्यवहारात तुम्ही काव्य, नाही तर ? भाव ना ! सारे तूटून तूटून शब्दानीच मी जोडतो पुढे जमो पुन्हा डाव सुटलेला हा सोडतो . सूटलेला हा सोडतो . ---------------------------- अतृप्त - ५/०१/२४

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2941 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 01/05/2024 - 09:51 नवीन
एकेक कडवे पुन्हापुन्हा वाचले. कविता खूप आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/05/2024 - 11:18 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/05/2024 - 11:56 नवीन
अब आयेगा मजा.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 01/05/2024 - 13:36 नवीन
मीटरपण चांगला सांभाळला आहे. मल्टीटॅलेंटेड गुरुजींचं लै कौतुक वाटतं!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 01/05/2024 - 13:46 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/05/2024 - 17:30 नवीन
कंजूस ,विवेकपटाईत , तुषार काळभोर . धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 22 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 24 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा