Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अ
अहिरावण
Wed, 12/06/2023 - 05:57
💬 9 प्रतिसाद
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3023 views

💬 प्रतिसाद (9)
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/06/2023 - 09:43 नवीन
शाहु फुले आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांच्या त्रयीतील सनातनींचा चातुर्वर्ण व्यवस्थेला सुरूंग लावून सनातनी जातीवाद्यांना सळो की पळो करून सोडनारे, दलित दिनदुबळ्यांना जातीवादातून ाहेर काढनारे, आधुनीक पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते, भारतीय संविधानाचे जनक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 12/06/2023 - 10:24 नवीन
Image removed. माझ्या लेकीने हे चित्र मागच्या वर्षी बनवलं होतं(वयं ७) ,उत्स्फूर्तपणे आणि मला दाखवलं होतं .अजूनपर्यंत ती बाबासाहेबांविषयी अनेक गोष्टी आनंदाने सांगते.मराठी माध्यमातून ती शिकतेय ह्यामुळेच हे घडलं :)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 12/06/2023 - 11:36 नवीन
पण तुमची मुलगी मराठी माध्यमातून शिकते आहे, हे वाचून आनंद झाला. माझी मुलेही मराठी माध्यमातूनच शिकली आणि त्यांना आणि मलाही त्याचा कसलाही तोटा जाणवलेला नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/06/2023 - 15:01 नवीन
खुप छान चित्र काढलंय छोट्या भक्तीने.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 12/07/2023 - 09:10 नवीन
चित्र चांगले काढले आहे. मराठी माध्यमाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 12/06/2023 - 11:45 नवीन
यांच्याविषयी नेहमी दलितांचे उध्दारकर्ते असे म्हटले जाते, पण खरे पाहता ते सगळ्या भारतीय नागरिकांचेच उध्दारकर्ते आहेत. कामगारांच्या हिताचे अनेक कायदे, शेतीबाबतचे कायदे (खोती पध्दत), स्त्रियांबाबतचे अनेक कायदे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रूपयाच्या परिवर्तनियतेबाबतचा त्यांचा पी एचडीचा निबंध हा सुध्दा देशाच्या अर्थशास्त्राला दिशा देणार होता. त्यांनी इतरांच्या भावनेचा वापर करून आपल्या मनासारखे करून घेतले नाही. अंतरी अपार करूणा होती पण नेहमी बुध्दीवादाचा आधार घेतला. एवढा मोठा माणूस आपल्या देशात झाला याचा अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 12/06/2023 - 17:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 12/07/2023 - 06:59 नवीन
कोणीतरी पूरोगाम्यांची व्याख्या विचारली होती एक सुचलेली - जे बाबासाहेबांच्या आरक्षण आणि मुस्लिमांबद्दलचं काही परखड वक्तव्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात https://www.firstpost.com/opinion/how-br-ambedkars-idea-of-islam-exposes-woolly-headed-liberals-of-the-day-10559281.html https://www.quora.com/What-were-Dr-Ambedkars-views-on-Islam - जे सावरकरांचच्या जातीनिर्मुलासाठी/ पतितपावन मंदिर सारखया प्रयत नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात ते पुरोगामी कारण अशांना दोन्ही पचणारे नसते
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 12/07/2023 - 09:08 नवीन
सहमत आहे. वरील व्याख्येत "लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतः मात्र कोरडे पाषाण" ही उक्ती सार्थ करणारे ही टीप सुद्धा जोडा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा