Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.

भ
भागो
Mon, 11/13/2023 - 14:34
💬 7 प्रतिसाद
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता. त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही. “आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.” हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते. हो नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. “पूवी बेस्केटच्या काही काही मॅचेस आम्हाला फिक्स कराव्या लागत होता. फिक्स म्हणजे काय ते माहीत आहे ना?” “म्हणजे थोडं थोडं ऐकून आहे.” चिंटू घाबरत बोलला. “आम्हाला फिक्सिंग नाईलाजाने करावे लागत होते. का? त्याला अनेक कारणे आहेत. त्याच्याशी तुम्हाला देणंघेणं नाही. पूर्वी आमच्याकडे एक रायटर होता. तो आमच्यासाठी स्क्रिप्ट लिहित असे. ते स्क्रिप्ट दोन्ही संघाच्या जबाबदार खेळाडूंना, कोचना आणि मालकांना समजाऊन सांगावे लागत असे. बऱ्याच वेळा काहीतरी घोळ होत असे. म्हणजे असंं की काही खेळाडू फॉर्मांत यायचे; त्यांचे त्यांच्या खेळावरचे नियंत्रण जात असे. काही नेम चुकायचे. काही वेळा घाईघाईत "ला गोरी" नियमाप्रमाणे लावली गेली नाही तर ती रद्दबातल होत असे. मग काय सगळा खेळ हे-वायर! खूप डायसी होता सगळा प्रकार. खेळ स्क्रिप्टबरहुकूम झाला नाही तर बऱ्याच लोकांचे नुकसान व्हायचे. आणि खेळ स्क्रिप्टबरहुकूम झाला तर, खेळ लुटूपुटूचा नुरा चालला आहे असा संशय लोकाना येऊ लागायचा. सगळीकडे आरडाओरड झाल्यावर स्क्रिप्टिंग बंद करण्यांत आले.” “ह्या राजेशाही खेळाचा असा पचका, बोऱ्या, फज्जा, विचका-- काहीही म्हणा—झाल्यावर माझ्या आधीच्या सीइओने त्याची जबाबदारी पत्करून राजीनामा दिला. परिणामस्वरूप खेळ लोकांच्या मनातून उतरला. जाहिरातदारांचे अतोनात नुकसान होऊ लागले. साबण, केशतेल, फसफसणारी पेये आणि पोट साफ करण्याची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना जाहिराती करण्यासाठी एवढा मोठा बांधील प्रेक्षकवर्ग कोठे मिळणार? जाहिराती थांबल्या तसे लोक खरेदी करेनासे झाले. जाहिराती नसल्यामुळे अमुक अमुक साबण तेजस्वी अंगकांती देतो, तमुक तमुक तेलामुळे केस अमेझानच्या जंगलाप्रमानणे घनदाट होतात, फसफसपेये प्यालावर अफाट आणि अचाट कामे सहज करता येतात अश्या गोष्टीवरुन लोकांचा विश्वास उडाला. थोडक्यांत देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडायच्या बेतात आली. कारण काय तर 'ला गोरी' ऊर्फ बेस्केट खेळाची झिंग, चकाकी आणि झळाळी खतम झाली म्हणून! हा इतिहास तुम्हाला माहीत असेलच!” “'ला गोरी'चा जीर्णोद्धार करून त्याचे वैभव, त्याची शान परत आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यांत आली आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला भेटायला आलो आहे.” असे बोलून त्या साहेबाने आपले भाषण संपवले. “व्वा! अप्रतिम! छान! आपण फार मोलाचे काम करत आहात. पण ह्यांत माझा संबंध कुठे येतो?” चिंटूच्या डोक्यांत अजून प्रकाश पडत नव्हता. “सांगतो, तुम्हाला बाहेर जायची घाई आहे का? नाही ना. मग मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. ह्या रविवारी पुणे फेरी टेल्स विरुद्ध सातारा तारा रा रा रा ह्या संघांचा सामना आहे. सातारा तळागाळातील संघ आहे. तो पुण्याविरुद्ध जिंकणे शक्य नाही. तुम्हाला तुमच्या दिव्य लेखणीतून अशी कथा लिहायची आहे की सातारा अटीतटीच्या सामन्यांत विजयश्री खेचून आणतो. हा सामना बघण्यात प्रेक्षकांना रस नाही, साताऱ्याचे पारडे जसे जसे जड होऊ लागेल तसे प्रेक्षकांना झटका बसेल आणि सगळे येऊन टीवीला चिकटतील. असेही लिहा. माझा होरा खरा असेल तर तुम्ही जे लिहाल तसेच होईल. माझी खात्री आहे. प्रेक्षक पुन्हा “ला घोरी” कडे वळतील. माझा हेतू साध्य होईल.” त्यानंतर अघटीत घडले. साहेबाने पाकीट काढले, दोन हजारांच्या पाच नोटा टेबलावर ठेवल्या. “ही घ्या तुमची अगाऊ बिदागी.” चिंटू कोलमडून पडणार होता, त्याने टेबलाचा आधार घेऊन स्वतःला कसेबसे सांभाळले. चिंटूने स्वतःचे रिकामे पाकीट काढले आणि नोटा आत सरकवल्या. “जर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना गोष्ट पसंत पडली आणि आपला हा प्रयोग यशस्वी झाला तर मग आपण पक्का करारनामा करू. मात्र ह्याचा फायदा घेऊन तुम्ही बेटिंगच्या लफड्यात पडू नका.” नंतर छद्मी हास्य फेकत तो म्हणाला, “सट्टा बेटिंग आपल्या देशात गुन्हा आहे हे लक्षांत असू द्या.” “समजा, आपला बेत फिझल आउट झाला तर?” “तुम्ही काळजी करू नका, मी ते दहा हजार परत मागणार नाही.” हा ईश्वर म्हणजे मनकवडा दिसतो आहे! “उद्या माझा माणूस येऊन तुम्हाला एक मोबाईल देईल. तो आपल्या दोघात संपर्क साधण्यासाठी वापरायचा. त्यात माझा क्रमांक हार्ड कोडेड आहे.” इतक्यांत दारावर टकटक झाली. ह्यावेळी कोण आलं असावं? चिंटू हलायचा अगोदर ईश्वर जणू काय आपले घर आहे अश्या थाटात उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दारात गोरिला उभा होता. माझ्याकडे वळून ईश्वर बोलला, “मी जातो. परवा पर्यंत मला कथा मिळायला पाहिजे.” त्याचा सूर धमकवणीचा होता. सवाल दहा हजारांचा होता. दहा हजाराला जर पाय फुटले असते तर पळून जायला दहा हजार वाटा होत्या. आधी गोष्ट लिहावी मग स्वस्थपणे दहा हजार कसे उडवायचे त्याचा विचार करावा. हे ठीक राहील. ईश्वरीलाल रुणझुणरुणझुणवाला साहेब गेला. गेला पण जाताना मागे अद्भुतरम्य भीतीदायक भावना सोडून गेला. हा माणूस खरा होता कि कुणी भामटा लुबाडायाला आला होता? म्हणा माझ्याकडे लुबाडायला आहे काय? उलट जाताना दहा हजार टिकवून गेला. चिंटू विचार करत राहिला. ह्या प्रमाणे चिंटूच्या हस्ते 'ला गोरी' चा पुनरुध्धार झाला. जाहिरातदारांनी पुन्हा उत्साहाने (देशाच्या हितासाठी) जाहिरातींचा ओघ सुरु केला. 'ला गोरी'ला जुने वैभव प्राप्त झाले. सारे काही चिंटूच्या स्क्रिप्ट बर हुकुम होत होते. चिंटूला थोडा मेहेनताना मिळत होता. ईश्वरला जे काय मिळायचे ते मिळत होते. कोल्ड ड्रिंक, बिस्कुट, टू मिनिट्स, पोट साफ तर सर्व रोग माफ इत्यादी इत्यादी बनवणारे बख्खळ पैसा कमाऊ लागले, जनतेचे आणि म्हणून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारून पूर्वीसारखे झाले. तेरी भी विन मेरी भी विन असे सुख समाधानाचे पर्व देशात आले. दुपारचे काहीतरी वाजले होते. चिंटू तृप्त मनाने अंथरुणावर लोळत पडला होता. सगळे जग आपल्यात मग्न होते. हिंजवडी, हडपसर मध्ये भारतीय एमएनसी मध्ये सॉफ्टवेअरच्या पाट्या टाकल्या जात होत्या. फॉरेनमध्ये कोणीतरी महाल बांधत होते. तिथं ह्यांची हमाल गिरी चालली होती. कोण जास्त हमाली करतो ह्याची स्पर्धा चालली होती. तू संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसतोस काय साल्या. बॉस वर इम्प्रेशन मारायला. बघ मी रात्री दहा वाजेपर्यंत बसतो. अखेर प्रमोशन मीच घेणार आहे. इकडे बँकेत पन्नास हजारी क्लार्क निर्विकारपणे दुसऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत होते. एंटर फिगर दाब की. नेक्स्ट एन्ट्री. तिकडे शाळा कॉलेजमध्ये गुरुजी मुलांचे, देशाचे आणि स्वतःचे भविष्य घडवत होते. वर्गात दंगा चालला होता. देशातही. मास्तर शिकवत होते, “माझ्या मना बन दगड.” पण एकाही दगडाचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्या तिथे पलीकडे तिकडे कार खान्यात कार जोडणी जोरात आहे. ओ नो. ते रोबो नाहीयेत. रोबो सारखे दिसताहेत खरे पण तुमच्या आमच्यासारखी माणसेच आहेत. नजीकच्या भविष्यात रोबो आपले जॉब हिसकावून घेणार आहेत ह्याची त्यांना जाणीव आहे. माहित आहे रोबो तिकडून निघाले आहेत. रोबोज आर कमिंग. सध्यातरी रोबो पेक्षा माणूस सस्ता आहे. सो नो प्रॉब्लेम. अश्याप्रकारे जग दरीच्या काठावर उभे आहे. तळाचा थांगपत्ता नसलेल्या दरीत डोकावून बघायची हिंमत नाहीये. जर का तोल गेला तर? आपला चितामणी मात्र ह्या जीवनाच्या जाचातून मुक्त आहे. त्याला ना आजची काळजी ना उद्याची. फोनची घंटी वाजली. चिंटू खडबडून जागा झाला. “मी बोलतोय. रुणझुणवाला शेठचा पीए. ऑफिसवर इडीची धाड पडली आहे. सोबत सीबीआय, इओडब्ल्यू, सेबी, एसीबी, आहेत. शेठनं तुमचं नाव घेतलं आहे. बाकी तुमच्याकडे कांदे काय भावाने चालले आहेत? ऑ, अरे ह्यांना ती फाईल देरे,” जरा खाल्ल्या आवाजात. “तो सीबीआयचा माणूस आला होता त्याला हूल म्हणून कांद्याचं काढल. तर शेठला घेऊन मंडळी तुमच्याकडेच येत आहेत. तेव्हा घाई करा आणि अंडरग्राउंड व्हा, चांगल्या लॉयरला पकडा आणि मार्ग काढा.” फोन बंद झाला. चिंटूला आधी काय झाले ते समजलेच नाही. त्याच्या डोक्यात जश्या जश्या गोष्टी उलगडत गेल्या तसा तसा त्याला घाम फुटत गेला. आता ते यमदूत येणार आणि आपल्याला प्स्कडून घेऊन जाणार. केव्हढी ही नाचक्की. आई बाबांचे काय होणार? सगळे तोंंडावर अरेरे म्हणणार पण ह्यांनाच पाठीमागून आनंदाच्या उकळ्या फुटणार. “वाटल नव्हत एव्हढा फ्रॉड ......” “दिसतो कसा शामळू. तोंडावरची माशी पण हलत नव्हती....” “सध्या असा काळ आला आहे कि कुणावर म्हणजे कुण्णावर भरंवसा ....” “तरीच आजकाल चैनीत उंडरत होता...” “क्यारॅक्टरलेस चिंटू.....” चिंटूला वाटल आत्ताच्या आत्ता जाव आणि त्या क्रॉसओवरवरच्या जादुगाराचे पाय धरावे. म्हणावे, “आता तूच वाचीव रे.” पण तो आता कुठ भेटणार? त्यापेक्षा इथूनच प्रार्थना करावी. “जय देवा महाराजा जादुगरा ‘रंगीतपाणि’ बाटलीवाल्या.....” चिंटूने मनोभावे प्रार्थना केली. जेहत्ते कालाचे ठायी महाराजा प्रार्थनेचा महिमा काय वर्णावा. चिंटूच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. त्याने मोबाईल चालू केला आणि टकटक टंकायला सुरवात केली. लिहिली कथा आणि दिली पाठवून “रविवारच्या भुंग्याला.” • xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx थोड्याच वेळात कुत्र्यासारखे विव्हळणाऱ्या लाल बत्तीवाल्या सायरन गाड्यांची वरात चिंटूच्या सोसायटीत दाखल झाली. चिंटूच्या फ्लॅटची बेल वाजली.चिंटूने दरवाजा उघडला. समोर झाकप्यॅाक पोशाख केलेली मंडळी उभी होती. पोलिसी खाक्याचा एकजण पुढे होऊन चिंटूला म्हणाला, “गुड मोर्निंग सर. माय नेम इज रणदिवे. डेप्युटी असिस्टंट पोलीस कमिशनर साउथ-वेस्ट डी वार्ड.” “मराठीत बोललात तरी हरकत नाही. मला मराठी समजतं. आणि ‘माय नेम इज’ अस म्हणायच्या ऐवजी ‘आय अॅम’ असं म्हणणं चांगलं वाटतं. साउथ-वेस्ट म्हणजे नैॠत्य ना! काहो नैॠत्य मान्सूनला एवढा उशीर का झाला?” रणदिवे डेप्युटी असिस्टंट पोलीस कमिशनर साउथ-वेस्ट डी वार्ड. एकदम गडबडला. “उशीर? कुठे काय साहेब. अरे मानकामे ह्यांची काय कांप्लेंट आहे बघा. सर, मान्सून विल कम सून सर. मी स्वतः लक्ष घालतो.” “ओके, आज इकडे यायचे कारण?” “सर, कमिशनर, (ऑल वार्डस् दाही दिशा) साहेबांनी आपल्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत.” “कमिशनर? कोण?” “कसबेकर साहेब आय पी एस २००२ बॅच.” “त्याच्या आयला कसब्या कमिशनर झाला? त्या साल्याला म्हणाव एकदा येऊन भेट तरी.” “होय साहेब. त्या सा..... साहेबांन्ला सांगतो आपला निरोप.” चिंटूने असा आय ए एस, आय पी एस, आय आर एस, आय ए & ए एस, आय इ एस इत्यादींच्या आयांची दाखल घेत सर्वांचा निरोप घेतला. जायच्या आधी सर्वांनी येऊन चिंटूशी हस्तांदोलन केले. मात्र मानकामे थोडे रेंगाळले. खालच्या आवाजात खासगीत म्हणाले, “तेव्हढे माझ्या प्रमोशनचे बघा प्लीज. मोठी मुलगी लग्नाची झाली आहे ...म्हणून सर.” चिंटूच्या मनाची तार कुठेतरी झंकारली. मनात गल्बली झाली. त्याच्या बहिणीची आठव आली. “निश्चित! मानकामे करून टाकतो. काळजी नको.” कुणाकुणाची किती दुःख, जीवन पोखरणाऱ्या किती काळज्या. चिंटू बंबवाल्यासारखा आग विझवण्यासाठी कुठे कुठे धावणार. आगी सगळीकडे लागलेल्या. चिंटूला एकदम देवाची दया आली, कणव वाटली. बिचारा किती ओव्हरलोडेड असणार. एक तरुण लेडी इन्स्पेक्टर चिंटूकडे एकटक बघत उभी होती. चिंटूच प्रथमच तिच्याकडे लक्ष गेले. बरी होती दिसायला.“मिस, तुम्ही का उभ्या?” “यू आर सो क्यूट!” ती एकदम खळबळजनक लाजली आणि पळून गेली. चिंटूच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. तेव्हढ्यात रुणझुणरुणझुणवाला साहेबाने चिंटूचे पाय पकडले. गदगदून म्हणाला, “गुरुजी, आज तुम्ही वाचवलेत नाहीतर ....” पुढचे शब्द अडखळले. बाहेर येईनात. पण चिंटूला ते ऐकू आले. “उठा, आणि जा आपल्या घरा. पुन्हा ह्या भोवऱ्यात पडू नका आणि मला पण खेचू नका.” द एंड ला अजून थोSSSडा वेळ होता. फिजिक्स डिपार्टमेंटचा प्यून यायचा बाकी होता. तोही आला. “चिंतामणीसाहेब, एच ओ डी ने तुम्हाला बोलावले आहे. आत्ताच्या आत्ता.” “तू चल पुढे. मी कपडे करून आलोच बघ.” निघायच्या आधी चिंटूने त्या क्रॉसओव्हरवरच्या सर्वशक्तिमान महान जादूगाराचे आभार मानले. प्युनच्या आधीच चिंटू डिपार्टमेंटमधे पोचला xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx चिंटू आता काय करतो? मी थोडक्यात कल्पना देतो. चिंटू फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये डेमो म्हणून काम करतो. जे शास्त्र कधी कुणाला—म्हणजे अगदी आईन्स्टाईन आणि फाईनमन ह्यांना पण --- समजले नाही त्या क़्वांटम फिजिक्सचे प्रयोग तो विद्यार्थ्यांना सेटअप करून देतो. यथामति समजाऊन पण सांगण्याचा प्रयत्न करतो. खर तर चिंटूला क़्वांटम फिजिक्स चांगले समजले आहे. कारण तो स्वतः “तिकडे” जाऊन परत आला आहे. त्याला सत्य आणि आभासी विश्व म्हणजे काय ह्याची पुरेपूर जाणीव आहे. आपण आभासी विश्वात राहतो आहोत असा त्याचा ठाम विश्वास आहे. आभासी असले तरी काय झाले पैसे तर पाहिजेतच ना. आभासी पैसे ही सही! चिंटूने लग्न केले आहे. त्याच इन्स्पेक्टरीणशी. चिंटूने ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा उद्योग सुरु केला आहे. का? एक तर कुटुंब खर्चाला मदत म्हणून. पण त्याही पेक्षा –मला वाटत--त्याचा लेखन कीडा! तो वळवळ करून त्याला स्वस्थ बसू देत नाही. पण पूर्ण कथा लिहिण्याची त्याला हिम्मत होत नाहीये. विश्वाचे झिरझिरीत स्पेस-टाईमच्या धाग्यांनी विणलेले वस्त्र फाटले तर? एक कथा लिहिली तर केव्हढा उत्पात झाला. म्हणून तो ग्रीटिंग कार्ड मध्ये दोन दोन ओळींचे विश्व उभे करून कथा लिहितो. त्याच्या ह्या दोन लाईनच्या कथांनी भावाला बहिणींच्या, बहिणीला भावाच्या, आई-बाबांना मुलांच्या, प्रियकराला प्रेयसीच्या (तुम्हाला कंटाळा येईल एव्हढी मोठी यादी आहे) इत्यादी आठवणी येऊन गहिवरून येते. मग ते शे दोनशे रुपये फेकून ते कार्ड विकत घेतात. घ्यायच्या आधी खात्री करून घेतात कि कार्ड “चिंतामणी आर्ट्स” चेच आहे. कारण “चिंतामणी आर्ट्स” म्हणजे गहिवर गॅरंटीड! चला जायच्या अगुदर मी तुम्हाला चिंटूच्या “दोन ओळींची” झलक दाखवतो. Guess we could have asked for a better father but Iam not sure if God has figured out how to make one yet. I may be taller than you but I still look up to you. Happy Birthday! Keep going round the sun for another 365 days. It is a true sign of aging when the candles cost more than the cake. Well, you were right about...absolutely everything. Thanks for being my mom! Moms are like buttons—they hold everything in life togethe If I wrote down all the reasons I love you, it'd take up a whole book! Home is wherever you are, Mom Your face was the first one I ever saw, and I fell in love immediately. I’ve been loving you ever since. To the world you are a mother, but to me, you are the world. You must be a perfect mom, because I’m the perfect child. You're a little piece of my childhood that will always be with me. I'm so glad I have someone like you in my life. May we share and make many more memories together, starting with your birthday! भावना उचंबळल्या? गहिवर दाटून आला? आले डोळ्यात पाणी? नाही? येईल येईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3580 views

💬 प्रतिसाद (7)
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/16/2023 - 10:12 नवीन
आणि बहुतेक शेवटचाच :) भागो- तुमच्या कथा डोक्याला झिणझिण्या आणणार्‍या असतात एव्हढे नक्की, म्हणजे कथेच्या शेवटापर्यंत आलो की संदर्भ शोधायला पुन्हा सुरुवातीकडे जावे लागते. त्यात सत्य/असत्याची ईतकी सरमिसळ केलेली असते आणि वाक्यावाक्याला ईतके पंचेस असतात की आपण नक्की काय वाचलेय हे लक्षात ठेवावे लागते. गो केकू गो कॉस्मिक सेन्सॉरशिप राँग नंबर सगळ्या मालिका साधारणपणे अशाच प्रकारच्या वाटल्या. पण एकुण चमचमीत भेळ छान आहे. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments
भ
भागो गुरुवार, 11/16/2023 - 10:39 नवीन
आणि बहुतेक शेवटचाच :)>>> क्या मै बोलू? एका वाचकाचे जरी रंजन झाले तरी बास. आभार!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 11/16/2023 - 11:34 नवीन
मिपा वर वाचकांना लेख किती आवडला हे प्रतिसादाच्या संख्येवर ठरवता येतं नाही..
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 11/16/2023 - 12:32 नवीन
आहो,काही मिपाकर इतके अप्रतिम लिहीतात पण वाचक का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात माहित नाही. या वर्षाच्या दिवाळी अंकातील, सहा ऋतूंचे सहा सोहळे, खुपच अप्रतिम लेख. कवीता तर इतक्या भारी आहेत. मी तिन वेळेस वाचल्या पण मन भरले नाही. तुमच्या कथा अशाच दिमाग का दही करणाऱ्या पण मनोरंजनाचे लोणी मात्र भारी असते. कथा आवडली हे वेगळे सांगत नाही. लि र वा रा
  • Log in or register to post comments
भ
भागो गुरुवार, 11/16/2023 - 14:37 नवीन
होय. एकदा कर्नल साहेबांनी मला सांगितले होते. स्वान्तः सुखाय सांगितले होते. आणि आज आपण. हे मी चांगले ध्यानात ठेवीन. आभार काळभोर साहेब.
  • Log in or register to post comments
भ
भागो Fri, 11/17/2023 - 11:41 नवीन
भाग- २ https://www.misalpav.com/node/51803 भाग -१ https://www.misalpav.com/node/51802
  • Log in or register to post comments
D
diggi12 गुरुवार, 04/25/2024 - 12:21 नवीन
चांगलीय
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा