स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत?
मसाला लैब पुस्तक वाचतेय स्वयंपाकघरात कोणकोणते भांडे वापरायचे याविषयी लिहिले आहे.
भांडी स्टील वा अल्युमिनियम ऐवजी तांबे, उच्च प्रतीचे अल्युमिनियम वा स्टील असावे.भांडे उच्च प्रतिचेच असावेत.नाहीतर पदार्थातील आम्ल प्रक्रिया घडू शकते.त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात.नोन स्टिकच्या धूरामुळे तर एक छोटासा जिवंत पक्षीही मरू शकतो.
त्यात मला आज लिंक आली.त्यामध्ये सर्जिकल स्टील चे स्वयंपाकाचे भांडे वापरावेत का वापरावेत हे सांगितले जात होते.पण त्या भांड्यांची किंमत आहे 50k.तसेच प्रेशर कुकर वापरू नये त्यात पोषकद्रव्ये कमालीचे नष्ट होतात हेही सिद्ध झाले आहे.मातीच्या भांड्यांची गुणवत्ता इतकी चांगली नसते,कारण योग्य चांगली माती वापरली जाणे महत्त्वाचे आहे.
बांबूचे ही काही भांडी असतात असे ऐकीव आहे.
अर्थात खूपच खोल विचार करतेय,पण स्वयंपाक घरात वापरले जाणार्या भांड्यंविषयी तुमची मतं वाचायला आवडतील.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures- स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच तूरडाळ आणि तांदूळ (वेगवेगळे!) धुऊन, एकास दोन या प्रमाणात पाणी घालून, कुकरात एक तास तयार ठेऊन देणे.
- मग मोठ्या आचेवर गॅस पेटवणे.
- सुमारे सात आठ-मिनिटांनी शिट्टी फूसफूस करू लागली कि गॅस अगदी मंद करणे.
- दहा मिनिटांनी गॅस बंद करणे.
- अजून दहा मिनिटे कुकर आपोआप थंड होऊ देणे.
- वाफ पूर्ण शांत झाल्यावर कुकर काढणे.
- या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकही शिट्टी होऊ न देणे.
(अर्थातच, या दरम्यान स्वयंपाकाची इतर कामे करणे!) --- हे सर्व रोजच्या रोज करणे अगदी सोपे आहे. मी अलार्म लावून करतो, आमची बरी-अर्धी अलार्मशिवायच करते!