Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुणे ते कन्याकुमारी सोलो ट्रीप

N
Nishantbhau
Sun, 10/29/2023 - 01:17
🗣 18 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, पुणे ते कन्याकुमारी car ने सोलो ट्रीप करायची आहे. आपल्या पैकी कोणी अशी ट्रीप केली आहे का? सोलो ट्रीप करताना काय काळजी घ्यावी? कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4580 views

🗣 चर्चा (18)
अ
अनिकेत वैद्य Sun, 10/29/2023 - 08:51 नवीन
मलाही अशी ट्रिप करायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 10/29/2023 - 09:06 नवीन
नेमकी काय माहिती हवी आहे? तुम्ही पूर्वी अशा ट्रिप केल्या आहेत का? कोणती गाडी आहे? सोबत कोणत्या वयाचे सहप्रवासी आहेत? त्यातले किती जण गाडी चालवू शकतात? रूट ठरवला आहे का? हाताशी किती दिवस आहेत?
  • Log in or register to post comments
N
Nishantbhau Sun, 10/29/2023 - 15:40 नवीन
प्रवास एकट्यानेच करायचा आहे. एका दिवसात 300-400 किलोमीटर पेक्षा जास्त कधी प्रवास केला नाही. Nexon पेट्रोल कार आहे. प्रवास किनार पत्ती जवळून करायचा आहे. प्रवासाची तयारी कशी करावी. माझ्या कडे २ महिन्याचा तयारी साठी वेळ आहे. आधी कोणत्या प्रॅक्टिस साठी ट्रीप कराव्या का? काही suggestion.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 11/08/2023 - 16:23 नवीन
एकट्याने का जात आहात.. चार मित्र सोबत घेउन जा. गाडी पंक्चर झाली तर मदतीला कोणीतरी हवे की.. ;) २०२२ आणि २०२३ ही दोन वर्षे स्वतःच्या कारने ५५०० किमी + असा वेगवेगळ्या रुटने कन्याकुमारी प्रवास केला आहे. २०१७ साली बुलेटने पुणे ते कन्याकुमारी गेलो होतो... त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकतो. पण तुमची एकट्याने कन्याकुमारीला जाण्याची (ती पण कारने!) कल्पना फारच धाडसी वाटत आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/29/2023 - 15:31 नवीन
ट्रिपचा उद्देश काय आहे? पर्यटन? किंवा दूरवरचे ड्राईविंग ? किनारपट्टी पकडूनच जायचे आहे का? गोव्यातील भाग माहीत असेलच. कर्नाटकसाठी sakre cubes केरळसाठी Shashank voyages YouTube videos पाहा.
  • Log in or register to post comments
N
Nishantbhau Sun, 10/29/2023 - 15:43 नवीन
सुरक्षित पणे दक्षिण भारत explore करणे. पर्यटन. खूप commercial ठिकाणा मध्ये interested नाही.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sun, 10/29/2023 - 17:23 नवीन
निशांतभाऊ ६ वर्ष १० महिणे झाले तुम्हाला मिपावर येऊन. सहा वर्षात एकतरी भटकंतीचा धागा काढला का तुम्ही? एक व्हाट्सअँप वरचे फालतू मेसेज जमा करून धागे काढनारा मिपाकर आहे. तुम्ही दुसरे. रच्याकने तुमचा मित्र लईच डेरिंगबाज ब्वा. मुंबईत रात्री ९ ला उतरून पुण्याला यायला निघायचा म्हंजे लईच हिम्मतवान माणूस. आता तुम्ही एकटे निघून राहिले कन्याकुमारी साठी? तुमच्या डेरिंबाज मित्राला सोबत घ्या की शेट. अशे भिकार धागे काढणारे एक बावळट आणि त्यावर प्रतिसाद देणारे हजार बावळट :=) चालू द्या तुमचा आम्ही मजा घेतो खुफियापंतीची :=)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 10/31/2023 - 12:43 नवीन
हा .... हा .... हा .... !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/29/2023 - 17:46 नवीन
पूर्वीच्या आरकुटची आठवण येते. अशा पोस्टी तिकडे मेन बोर्डावर टाकल्या की कुठून कुठून सल्ले येत असत. आता reddit आहे. r/Pune thread वर विचारा.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 10/31/2023 - 12:46 नवीन
आता लोक फेसबुक / फेसबुक समुहावर सुद्धा असले घागे काढतात. पुरेसे वाचन न करता / ट्रॅव्हलॉग व्हिडीओज न बघता थेट माहिती विचारतात. त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sun, 10/29/2023 - 17:53 नवीन
reddit फालतू आहे हो शेट पण इतके पण फालतू नाही जेवडे निशांतभाऊ चे धागे :=))
  • Log in or register to post comments
N
Nishantbhau Tue, 10/31/2023 - 03:58 नवीन
सर तुम्ही फार judgmental comments देत आहात. असो. मी आयुष्यात किती फिरलो किंवा काय काय केलं हे इतरांना सांगायलाच पाहिजे हे गरजेचं नाही. मुंबई पुणे प्रवास म्हणाल तर बरेच परदेशात राहणारे लोक असा प्रवास करताना थोडा जास्त विचार करतात. आणि थोडी फार मदत घेतली चार लोकांचे अनुभव ऐकून मग निर्णय घेतला तर बिघडले कुठे? मला स्वतला सुद्धा चार लोकांचे अनुभव ऐकून प्लॅनिंग करायला आवडतं. आणि त्यात गैर काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 10/31/2023 - 17:50 नवीन
सहमत आहे... आणि तसेही, कठीण समय येता, मिपा कामास येते....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 10/31/2023 - 09:45 नवीन
मी आणि अजून पाच डोकी 'तवेरा' या गाडीने कन्याकुमारीला जाऊन आलोय. पाचमधले दोन ड्रायव्हर होते. पण ८०% ड्रायव्हिंग एकानेच केलेली. नॅशनल हायवे नंबर १७ तुम्हाला घेऊन जाईल कन्याकुमारीपर्यंत. अगदी किनारपट्टीजवळून जाणारा हायवे आहे. तेव्हा खूपच लहान होता. आताची परिस्थिती माहिती नाही. किनारपट्टीजवळून जातो हे महत्वाचे. केरळातून जाताना एक विशेष गोष्ट जाणवते ह्या हायवेवरून. कोणी गेले असल्यास व्यनि करा. परतीचा प्रवास आम्ही, मदुरै, कोडाईकनाल, उटी, म्हैसूर,असा केलेला, सोबत नकाशे घेऊन. गुगल मॅपची चैन त्याकाळी नव्हती. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 10/31/2023 - 16:50 नवीन
पण ८०% ड्रायव्हिंग एकानेच केलेली.
नशीबवान आहात की २०% ड्रायव्हिंग तरी अन्य कोणी केली होती! मुंबई ते तिरुपती जाण्याचा अगोचरपणा आम्ही २०१६ मध्ये केला होता, बरोबर ४ जण होते पण ड्रायव्हर एकटा मीच. त्यावेळी 'मांडीला' आलेले मोड आठवले की आज पण हुळहुळते 😀 असो, धागाकर्त्याला सोलोट्रिप साठी शुभेच्छा! (लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 10/31/2023 - 12:51 नवीन
नियंत्रित सुरक्षित वेगाने सकाळच्या वेळी २०० किमि + दुपार नंतर १५०-२०० किमि पेक्षा जास्त वाहन चालवू नका. यादी प्रमाणे सर्व साहित्य (यात प्रथमोपचार डबा, औषधे आलीच) , थांबायची ठिकाणे, फोन क्र. + आडचणीत हमखास उपयोगी माणसे, भ्र.क्र. इत्यादि हाताशी असेल असे बाळगा. गावोगावच्या मित्रमैत्रीणींना भेटायचे विसरू नका. स्थानिक स्थल दर्शन जरुर करा. दर दोन दिवसांनी एखाद्या ठिकाणी मुक्काम करुन सहल अविस्मरणीय बनवा, ऑल दि बेष्ट !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 10/31/2023 - 17:30 नवीन
गंतव्य ठिकाणाएवढेच, कदाचित अधिक संस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष प्रवासात मिळतात.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 11/01/2023 - 04:02 नवीन
अजुन मजा येईल. निवांतपणे वाटेतील गावे/शहरे अनुभवता येतील, फक्त तितकी सुट्टी असली पाहिजे. सल्ला फाट्यावर मारायला हरकत नाही, माझे ते स्वप्न आहे म्हणुन बोल्लो.(पुणे-कन्याकुमारी-पुणे सायकल ट्रिप)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 26 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा