Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दिवाळी अंक २०२३ - कोणी कुणाला किती आवडावे

च
चांदणे संदीप
Sat, 11/11/2023 - 19:30
💬 6 प्रतिसाद
कोणी कुणाला किती आवडावे

कोणी कुणाला किती आवडावे काही तुला अन् मलाही न ठावे

करून बहाणे, दोघे धडपडतो कशाही निमित्ताने बोलू बघतो दिवसा मोरपिशी मौजा लुटाव्या रात्रीने पुन्हा विरह घेऊन यावे घराच्या बाहेर दारापुढे जराशी तुझ्या उतावीळ येरझारा मघाशी पाहून, हलके हाक देशील, वाटे पुन्हा तू नेहमीचे संकोचून जावे मग कधी तू व्यस्त होऊन जाते इथे अवघे माझे अवसान गळते व्याकूळ नजरेस आस दिसण्याची तू दिसताक्षणी मी मोहरून उठावे सखे सोबती अन् कुणी साद देते त्यात चित्त कसले जराही न जाते व्याप काही, काही उद्योग पाठी सारे सोडून तुझ्या समीप असावे ती लाजरी हवीशी तिरपी नजर आणि तुझ्या उरीचे स्पंदनस्वर तुझ्याच ओंजळीत भरण्यासाठी मी, सांग कसे, कुठे साठवावे? उभय डोळ्यांत मौनाची गाणी न स्पर्शता हाता गुंफू पहाती पुरे अनामिक थरथरते दडपण मिठीतून पुढले हितगूज व्हावे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2941 views

💬 प्रतिसाद (6)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/13/2023 - 04:06 नवीन
प्रेमभावना छान व्यक्त झाली आहे, लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 11/13/2023 - 09:24 नवीन
संदीपराव फॉर्मात असले की असं काहीतरी जीवघेणं लिहितात!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 11/16/2023 - 08:22 नवीन
व्वा, सुंदर प्रेमकविता ! ... हळूवारपणे प्रणय फुलत जातो ... आणि आमच्या सारख्या रसिकांना अलगदपणे गुंतवून टाकतो !
ती लाजरी हवीशी तिरपी नजर आणि तुझ्या उरीचे स्पंदनस्वर तुझ्याच ओंजळीत भरण्यासाठी मी, सांग कसे, कुठे साठवावे? उभय डोळ्यांत मौनाची गाणी न स्पर्शता हाता गुंफू पहाती पुरे अनामिक थरथरते दडपण मिठीतून पुढले हितगूज व्हावे
- सुरेख ! -- आणि कविताचित्रही खुपच बोलके !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 11/22/2023 - 05:46 नवीन
प्रेमकविता आवडली . दिवाळीच्या वातावरणात चैतन्य फुलवणारी . मस्त !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 11/22/2023 - 07:56 नवीन
देर ना कर फरयादी जख्म सुख जायेगा देखते रह जाओगे और आशियाना लुट जायेगा कवीता आवडली हे वेगळे सांगावयास नको.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sat, 12/02/2023 - 08:26 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा