Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शूर्पणखा

V
vcdatrange
गुरुवार, 10/26/2023 - 07:41
💬 4 प्रतिसाद
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो. भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. . सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय. मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे. थोडेफार शब्द आणि संपुर्ण चाल आठवत होती. जीव गुगलुन टाकला अन् १९२० ते १९५० या कालावधीतील गाजलेल्या मराठी कवितांचं संग्रह असलेलं एक पुस्तक सापडलं. मुंबई मराठी साहीत्य संघानं सन् १९५० मध्ये प्रकाशीत केलेलं "माझी कविता" या संग्रहात भा रा तांबे, माधव ज्युलियन, केशवकुमार, अज्ञातवासी, गिरिश आदी कविंच्या तत्कालिक गाजलेली काव्ये आहेत. . पहा, तुमच्याही आठवणीतीली एखादी जुनी कविता या संग्रहात सापडतेय का ! सोबत कवि गिरिश यांची *"शूर्पणखा"* कविता आठवणीतल्या चालीत गायचा प्रयत्न केलाय त्यासही प्रतिसाद द्या! https://youtu.be/IGX_c9oIXOk?si=oTuFYIMSHIBOImd1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2908 views

💬 प्रतिसाद (4)
B
Bhakti Fri, 10/27/2023 - 13:10 नवीन
छान आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 10/27/2023 - 13:51 नवीन
हे वाक्य आवडले.. व्हिडिओ पण मस्त आहे. छान गायले आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/31/2023 - 05:46 नवीन
जीव गुगलून टाकणे आवडले. बाकी गीत बरं गायलं आहे. आनंद महत्वाचा. ताल, सुर एवढं तेवढं चालायचंच. शुभेच्छा..! लिहिते राहा. येत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 10/31/2023 - 13:10 नवीन
मस्त .. झकास गायलंय ! ही कविता प्रथमच ऐकण्या बघण्यात आली ! कविता आणी कविता गायन दोन्ही आवडलं ! पुढच्या मिपा कट्ट्यासाठी एक चांगला कलाकार सापडला !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा