भारत कॅनडा संबंध का बिघडत आहेत? आणि परिणाम?
भारत कॅनडा संबंध का बिघडत आहेत
(राजकीय घडामोडींची नोंद)
आता आताच जी २० चे शेवटचे बिगुल वाजले, सर्वांनी एकमेकांशी हात मिळवले आणि छान पैकी त्यांच्या आठवणी काढत मंत्रालय मंडळी स्मरण करत असतानाच कॅनडाच्या मुख्य मंत्र्यांनी भारतावर तोफ डागली. ती सुद्धा त्यांच्या पार्लमेंटांतच. "खलिस्तानवादी नेत्याची हत्या होण्यात भारत सरकारचा छुपा हात तर नाही?"
शिवाय तो मनुष्य कॅनडाचा नागरिक म्हणजे गंभीर आरोप. शिवाय हल्लीच दोन्ही देशांनी एकमेकांचे अधिकृत डिप्लोमॅट परत पाठवायला सुरुवात केली आहे.
असे राजकीय आणि (व्यापारी) संबंध बिघडणे भारताला तरी परवडणारे नाही.
यासंबंधी India Today साप्ताहिक आणि Hindustan Times paper बरेच अपडेट्स देत आहेत ते तिकडे पाहता येतील.
मुख्य म्हणजे कॅनडाचे मुख्य मंत्री एवढे भडकण्याचे आणि त्यांनी वक्तव्यं करण्याचे आंतरिक राजकारण काय आहे? तर ट्रुडो यांच्या पार्टीला सत्ता मिळवण्यासाठी ज्या वीस सांसदांचा आधार घ्यावा लागला ते सर्व खलिस्तानवादी विचारांचे कॅनडिअन शीख नागरिक आहेत. त्यामुळेच त्यांना खुश करण्याचा ट्रुडो यांनी चंग बांधला आहे. शिवाय आता एक वर्षात तिकडे निवडणुका होत आहेत. योगायोगाने इकडे भारतातही निवडणुका होणार आहेत. प्रस्थापित भाजपाला हा एक कळीचा मुद्दा ठरेल. पण विरोधी पक्षातल्या कॉन्ग्रेसलाही खलिस्तानवादी विरोधातून इंदिरा गांधींच्या काळात जबर फटका बसला होताच. इतरांसाठी - राष्ट्राचे तुकडे होणार का?
एकूण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जळके चटके बसणार आहेत. राजकारणात नसलेल्यांनाही धक्काच ठरेल. कॅनडात गेलेले भारतीय नागरिक हे दोन भागात वाटले गेलेत - शीख आणि इतर धर्मीय. परत यावं लागण्याची भीती सर्वांनाच सतावत आहे.
पंजाबी रॅप गायकांचा श्रोतावर्ग कमी होईल आणि धंदा संपेल हीसुद्धा शक्यता आहेच.
दोन ठिकाणी होळ्या पेटल्यावर आपल्या घरचीही चार लाकडे जाणारच यात शंका नाही, किंवा हाळ लागणारच. तर ती कुठे आणि कशी बसेल या विषयी चर्चा म्हणून धागा काढत आहे. थोडक्यात राजकीय चर्चा नसून धुमाळीचा धुरळा कसा उडेल याबद्दल.
(संस्थळाच्या नियमाने आणि संयमाने आपले विचार मांडावेत ही विनंती.)
त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हतामाझा पण नव्हता झाला :=))बदला घेण्याची सुवर्णसंधी आता मिळाली आहे, तेव्हा तिचा पूर्ण लाभ भारताने घ्यावा अशी अपेक्षा!सहमत.भारताने कॅनडा विरुद्ध FATF मध्ये तक्रार करण्याचे ठरवले आहेयोग्य निर्णयमात्र सगळ्या प्रतिसादांमधून कॅनडाचीच ठासली जाणार आहे असे प्रतिबिंबित होते. तसे होईलही कदाचित पण ज्या भारतीयांचे लागेबांधे कॅनडाबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत.त्यांचा ते बघतील. आम्ही आमच्या भारत सरकार बरोबर आहोत.पण ज्या भारतीयांचे लागेबांधे कॅनडाबरोबर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत.ते विद्यार्थी का भारतीय कोण पण असोत त्यांचा ते बघतील. मी या वादात भारत सरकार बरोबर आहे.