इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!
७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.
एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.
१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.
अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.
अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!
इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.
परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]
इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.
हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.
नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.
आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)
१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.
२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...
३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...
४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.
५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल.हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात.पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का?त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते.असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात.दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात.पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात.बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊआमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.