Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?

ध
धर्मराजमुटके
Wed, 10/04/2023 - 08:08
🗣 74 प्रतिसाद
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते? आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या लेखाचा दूवा वरीलप्रमाणे आहे. डॉ. डी. एन. मोरे अलीकडच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. वीज, रेल्वे, विमान, बँका, विमा, सैन्य इत्यादीसह अनेक सरकारी आणि सहकारी संस्था खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या जात आहेत. आता शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नसून शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांची पदभरती नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्याकडून करण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. कुशल श्रेणीत समाविष्ट शिक्षक व सहाय्यक शिक्षक पदासाठी बीएड, डीएड, पिटीसी किंवा संबंधित पदवी, पदविका, टीईटी आणि टेट पात्र व तीन वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना ३५ हजार तर दोन वर्षाचा अनुभव असलेल्या सहाय्यक शिक्षकांना २५ हजार रुपये ठराविक वेतन निश्चित केले आहे. या भरतीत शिक्षकांना दिले जाणारे सेवा संरक्षण, सेवाशर्ती, वेतनवाढ, बढती आणि विशेषत: आरक्षण लागू असणार नाही. सैन्य दलात अमलात आणलेली ‘अग्निवीर’ सारखी कंत्राटी तत्त्वावरील योजना शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षणवीर’ म्हणून राबविण्याचा शासन निर्णय शासकीय नोकरीसाठी आस लावून बसलेल्या हजारो पात्रताधारकांचे स्वप्न चक्काचूर करणारा आहे. त्याचे दूरगामी परिणाम समाज आणि एकूणच राष्ट्राच्या विकासावर मोठ्या प्रमाणात होणार आहेत. पुर्ण लेख इथे देत नाही. इच्छूकांनी लोकसत्तावर जाऊन वाचावा आणि चर्चा करावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15974 views

🗣 चर्चा (74)
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 10/10/2023 - 12:51 नवीन
आतापावेतो वाचनमात्रे होतो, पण आता लिहितो सरकारी शाळा/सरकारी शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरीचे कवच आहे. पण दर्जाबद्दल काय बोलणार? शहरात किती लोक सरकारी शाळांमध्ये मुलांना घालण्यास उत्सुक असतात? त्यापेक्षा दसपट पैसे मोजुन खाजगी शाळात मुलांना घातले जाते, आणि तिथे तर कंत्राटी शिक्षकच असतात, दर वर्षी किवा अधे मधे सुद्धा शिक्षक बदलू शकतात. हे झाले शाळांचे. सरकारी/अनुदानित कॉलेजमध्ये जाणारी किती मुले फक्त कॉलेजच्या शिक्षणाच्या जोरावर पास होतात? त्यांना पुन्हा कोचिंग क्लासेस लावावेच लागतात, तिथे पुन्हा कंत्राटी शिक्षकच असतात. ईंजिनीयरिंग वगैरे साठी दरवर्षी किती मुले प्रयत्न करतात? साधारण ५ लाख. त्यांना सामावुन घेण्याईतक्या जागा सरकारी कॉलेजात आहेत काय?(आरक्षणाविषयी तर मी बोलतच नाहिये, तो एक वेगळाच वादाचा मुद्द आहे) खाजगी ईंजिनीयरिंग कॉलेजात पुन्हा कंत्राटी शिक्षकच असतात. आता तर त्याच्याही पुढे जाऊन दरवर्षी बाजारात येणार्‍या नवनवीन विषयांकरीता शिक्षक शोधण्या ऐवजी कॉलेजेस सरळ युडेमी,कोर्सेरा वगैरे वेब्साईट वरचे कोर्स करा म्हणुन मुलांना सांगुन मोकळे होतात. आणि त्याचे सर्टिफिकेट दाखवले की गुण देतात. शिक्षण दिवसागणिक बदलत चालले आहे. रोज नवनवीन टेक्नोलॉजी बाजारात येत आहेत. ईलेक्ट्रिकल्/केमिकल/सिव्हिल ईंजीनियरींगला काय भवितव्य आहे कुणास ठाउक. या सगळ्या वेगाशी जुळवुन घेण्याची सध्याच्या (किमान १० वर्षे शिक्षण क्षेत्रात असलेल्या) सरकारी शिक्षकांची तयारी आहे काय? ईतक्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता, माझ्या मुलांना जर कंत्राटी शिक्षक शिकवत असतील, भले ते महागडे असतील पण दर्जा चांगला असेल तर एक पालक म्हणुन मला चालेल.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 10/10/2023 - 15:58 नवीन
ईतक्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता, माझ्या मुलांना जर कंत्राटी शिक्षक शिकवत असतील, भले ते महागडे असतील पण दर्जा चांगला असेल तर एक पालक म्हणुन मला चालेल. सध्याला तो पर्याय खासगी शाळांच्या पर्यायाने आत्ताही उपलब्ध आहे. समजा, सरकारी शाळेत सरकारी शिक्षक जाऊन कंत्राटी शिक्षक आले तर दर्जा सुधारणार आहे का? शक्यता कमी वाटते कारण कमी पगारात एक तर ते टिकून राहण्याची शक्यता नाही रहीलेच्र ते मुलांना त्यांचकडेच शिकवण्याचा प्रयत्न करणार. सध्या सरकारी शाळांचा दर्जा खालावलेला आहे कारण एकतर सरकार च लक्ष नाही कारण जवळ जवळ प्रत्येक आमदार खासदारांच्या खासगी इंग्रजी मिडीयम च्यां शाळा आहेत. आणि कदाचित समाज म्हणून हे आपलीही अपयश असेल. कंत्राटी शिक्षक आले तरीही दर्जा वाढणार नाही कारण बाकी सर्व सिस्टीम तीच राहणार. ज्यांचा कडे पैसे आहेत त्यांचा साठी खासगी शाळांचा पर्याय आहे पण पैसे नसणाऱ्यांकदे मात्र तो पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 10/10/2023 - 16:13 नवीन
सरकारी शाळांमध्ये सरसकट वाईट शिक्षक असतात असे माझे म्हणणे नाही किवा कंत्राटी शिक्षक आल्याने एकदम सुधारणा होईल असेही म्हणायचे नाही. पण किमान शिक्षक चांगले शिकवत नसतील तर बदलता येतील, असे म्हणणे आहे. थोडक्यात कुठुनही का होईना? मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे हा मुद्दा आहे. लोकप्रतिनिधिंच्या खासगी संस्था--ही एक डोकेदुखी आहेच. म्हणजे रिक्षा/टॅक्सीचे धंदे चालावेत म्हणुन सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेकडे दुर्लक्ष, किवा अदानी/अंबानीची खळगी भरण्यासाठी बी एस एन एल कडे दुर्लक्ष असा हा प्रकार. (पळा पळा--आता समर्थक/विरोधक चवताळणार)
  • Log in or register to post comments
र
रीडर Tue, 10/10/2023 - 17:26 नवीन
आणि खासगी हॉस्पिटल्स चालवीत म्हणून सार्वजनिक आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष्य
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 10/20/2023 - 19:20 नवीन
प्रिय मित्र धर्मराज, बर्‍याच दिवसानी मिपावर आलो आणि तुझा लेख पाहिला. मुळात जे "अलीकडच्या सरकारने" असे जे म्हटले आहे ते रास्त वाटत नाही. मुळात सर्व कंत्राटी भरतीचा निर्णय उधोजी यांच्याच काळात झाला होता. आताच्या सरकार्ने फक्त तो पुढे नेला. आश्चर्य म्हणजे उधोजींच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध शिल्लक सेनाच निदर्शने करणार आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 10/22/2023 - 08:09 नवीन
राजकीय चर्चांना बंदीय, ऊगाच खटपट करू नका.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 10/21/2023 - 04:48 नवीन
कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द. वरून हे पाप पवार आणि ठाकरे यांचे आहे अशी टीकाही फडणवीसांनी केली. मग GR कशाला काढला होता?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 10/21/2023 - 05:29 नवीन
२०२४ निवडणूक येतेय, राजकारण्यांनी जनतेची करमणूक सुरु केलीये म्हणून!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/22/2023 - 06:35 नवीन
कंत्राटी भरतीवरुन महाराष्ट्रभर असंतोष धगधत होता. बेरोजगार युवक, नौकरदार, यांचा वाढत्या विरोधामुळे-मोर्चांमुळे, सरकारला कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करावा लागला. जनतेने जर विरोध केला नसता तर, कंत्राटी भरती पुढेही चालू राहिली असती. मागील सरकारांनी जो जो काय नालायकपणा केला असेल, तो तो आपण करु नये अशी जनतेची अपेक्षा असते. कंत्राटदार ज्या कंपन्या असतात त्या केवळ नफ़्यासाठीच आलेल्या असतात. कंपन्यांना सेवाशुल्क मिळत असतो आणि कंत्राटदार कंपन्या काही आभाळातून आलेले नसतात. काही सत्तेतले कंत्राटदार असतात काही विरोधक असतात. सब मिली भगत. पूर्वीच्या सरकारांनी कंत्राटी भरती सुरु केली तरी, भरतीची व्याप्ती शिंदेनवीस सरकारांनीच वाढवली होती. बाह्ययंत्रणे मार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवापुरवठादार एजन्सीचे एक नवीन पॅनल तयार केले. सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या काळात निविदा प्रक्रिया राबवून १० ठेकेदार कंपन्या पात्र ठरवल्या आणि मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला. त्याला विद्यमान सरकारच्या ८ मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जनता कोणत्याही विचारांची असली तरी, त्याचा जेव्हा फ़टका सर्व सामान्यांना बसणार असतो तेव्हा लोक रस्त्यावर येतात आणि त्याचा फ़टका आपल्या बसू नये म्हणून ही पापं एकमेकांवर ढकलतात, इतकाच कंत्राटी भरती रद्दचा अर्थ. जिंदाबाद जिंदाबाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 10/22/2023 - 08:11 नवीन
अभ्यासपुर्ण विश्लेषण. ऊगाच ऊधोजी वगैरे इतरांसारखं द्वेषमूलक काहीही न लिहीता व्यवस्थित मुद्देसूद ऊत्तर.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 10/23/2023 - 17:23 नवीन
शिंदेनवीसवार का नको?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 10/28/2023 - 14:13 नवीन
येस ...
बेरोजगार युवक, नौकरदार, यांचा वाढत्या विरोधामुळे-मोर्चांमुळे, सरकारला कंत्राटी भरतीचा शासन निर्णय करावा लागला. जनतेने जर विरोध केला नसता तर, कंत्राटी भरती पुढेही चालू राहिली असती.
तो रद्द करण्याचा निर्णय २०२४ च्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन घेतला हे स्पष्ट आहे ..... अशा कर्माचारी वर्गाची नाराजी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला जड जाईल म्हनून. (आणी आंदोलने मोर्चे हे सुद्धा राजकिय पाठबळाने च घडून आआलेय हे ही स्पष्ट आहे ) एकदा निवडणुक होऊन जाऊ द्या ... कुठलेही शासन आले तर कंत्राटीकरण होणार हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे ! ... शेवटी कंत्राटीकरण हा या युगाचा रेटा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sun, 10/29/2023 - 06:20 नवीन
कशाला शिक्षकांना स्वप्नामधून जागे करता? उगा आता पगार वाढवा म्हणून रडारड चालू होईल - प्रा बसुन हादडे (सर) उपशिक्षक डोंगळे बुद्रुक प्रा शि मंदीर सचिव, अखिल भारतीय जिप शिक्षक संघटना अध्यक्ष, मराठी भाषा बचाव समिती सदस्य, सेंट झांगळू आयसीएसई स्कूल टीचर पॅरेंट असोसिएशन
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 10/29/2023 - 09:03 नवीन
- प्रा बसुन हादडे (सर) उपशिक्षक डोंगळे बुद्रुक प्रा शि मंदीर सचिव, अखिल भारतीय जिप शिक्षक संघटना अध्यक्ष, मराठी भाषा बचाव समिती सदस्य, सेंट झांगळू आयसीएसई स्कूल टीचर पॅरेंट असोसिएशन
अहिरावण साहेब, अधोरेखित भागातुन लगावलेल्या टोल्यामुळे मी तुमचा पंखा झालोय राव!
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sun, 10/22/2023 - 15:41 नवीन
चला सध्या शिक्षक असलेल्यांची काळजी मिटली.. त्यांच्या पोराबाळांची वर्णी लावायची सोय झाली. सर्व शिक्षकांचे अभिनंदन. आता आंदोलने वगैरे बंद करुन शिकवण्याची क्षमता असेल तर शिकवा नाही तर संस्थाचालकांची घरची कामे पूर्ण करावी. जनतेसाठी (चांगले) शिक्षण दुर्लभ होतेच, आहेच आणि राहिल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/23/2023 - 08:36 नवीन
न्यायालयात न्याय मिळतो हे अर्धसत्य आहे. न्यायालयात जे मिळतं त्याला न्याय म्हणायचं याच सुरात शाळेत शिक्षण मिळतं हे अर्धसत्य आहे. शाळेत जे मिळतं त्याला शिक्षण म्हणायचं. हि स्थिती मुंबईतील सरकारी/अनुदानित शाळांची (१९७० ते १९८०) होती. आमच्या वर्गात ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलेली परिस्थिती चिंताजनक अशीच होती. आता परिस्थिती अजूनच वाईट आहे. बहुसंख्य मुले शाळेत पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी जातात आणि शिक्षणासाठी क्लास लावतात. अभियांत्रिकी महाविद्यालयात तर आज परिस्थिती अशी आहे कि तेथे उद्योगांना काय हवं आहे ते शिकवले जात नाही तर तेथे असणाऱ्या प्राध्यापकांना जे शिकवता येतं तेच शिकवले जाते. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आलेल्या अभियंत्यांना उदयॊगात आल्यावर मुळापासून गोष्टी शिकवाव्या लागत आहे. माझा भाऊ गेली ३० वर्षे माध्यम उद्योग चालवत आहे आणि त्याच्या कडे ७-८ अभियंते एका वेळेस काम करत असतात. त्यांना शिकवून तयार केल्यावर ते सोडून मोठ्या उद्योगात जातात. त्यामुळे अभियंत्यांची पाठशाळा चालूच असते. वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा परिस्थिती अशीच बिकट आहे. त्यातून आरक्षण हा ज्वलंत विषय मी आणतच नाही. इतर आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज बद्दल मी बोलतच नाही. यामुळे शिक्षक कायम स्वरूपी असो कि कंत्राटी विद्यार्थ्यांना फारसा फरक पडत नाही. शाळेत/महाविद्यालयात शिक्षक शिकवतात हाच मुळात गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 10/23/2023 - 17:27 नवीन
शाळेत/महाविद्यालयात शिक्षक शिकवतात हाच मुळात गैरसमज आहे.
+१०८
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 10/23/2023 - 17:42 नवीन
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?
का असू शकत नाही? --- मी एक मातं प्रशिक्षण कंपनी चालवतो. एक एचआर आणि दोन मार्केटिंगवाल्या एवढेच पूर्ण वेळ पगारी आहेत. माझ्या प्रशिक्षकांपैकी सर्वजण कंत्राटी काम करतात. प्रशिक्षणार्थी / क्लायंट / माझी कंपनी सर्वांचा feedback (अभिप्राय?) किमान ४.५/५ असतो. - त्यांना पगारापेक्षा जास्त पैसे मिळतात. - ते उत्तम काम करतात. - ते समाधानी आहेत. - मी समाधानी आहे. - क्लायंट समाधानी आहे. - प्रशिक्षणार्थी समाधानी आहेत. -- अजून काय हवंय? --- मतभिन्नतेच्या आदरासहित माझा निष्कर्ष: पगारी नोकरांपेक्षा कंत्राटी लोक अधिक चांगले काम करतात. --- एकेकाळी मीही कंत्राटी प्रशिक्षक म्हणून काम करायचो. --- झैरात: मातं प्रशिक्षकांनी / इच्छूक मातं प्रशिक्षकांनी कृपया व्यनी करावा. (मिपाच्या धोरणात बसत नसेल तर वरील ओळ काढून टाकावी).
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 10/25/2023 - 16:38 नवीन
मुळात एक खासगी कंपनी आणि सरकारी शाळा यांची तुलना होऊ शकत नाही. खासगी कंपनी च उद्दिष्ट पैसा कमावणे हे असत. सरकारी शाळेचे उद्दिष्ट पैसा कमवणे नाही. पैसे वाचवणे केवळ ह्याच उद्दिष्टासाठी सरकारने हा नर्णय घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/28/2023 - 08:48 नवीन
सरकारी शाळेचे उद्दिष्ट पैसा कमवणे नाही. मान्य. परंतु एका शिक्षकावर किती खर्च होतो आणि त्यातून प्रत्यक्ष किती उत्पादन होते याचा कुठे तरी मेळ असावा कि नाही? For secondary teachers (Class VI-VIII), the revised pay matrix is Rs 67,700 to Rs 2,08,700 per month,and for primary teachers(IX to XII),revised to Rs 41,800 to Rs 1,32,300 per month. शिक्षकांचा ( केवळ शिक्षकच नव्हे तर एकंदर सरकारी कर्मचारी यांचा) पगार वेतन भत्ते याचा खर्च डोईजड होत चालला आहे? हा पैसा येणार कुठून? जुनी निवृत्तीवेतन योजना परत लागू करण्याबद्दल राजस्थान राज्याबद्दल वाचत असताना -- Pension liabilities, salary payments and interest payments form 56% of state expenditures that is committed which is met out of state revenue receipts. In FY21, the total committed expenditures of state as a percentage of state own revenue receipts was at a staggering 125% Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/90412922.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst राजस्थान सरकारच्या खर्चापैकी ५६ % खर्च हा केवळ लोकसंख्येच्या ५ % असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांवर खर्च होत असेल तर उरलेल्या ९५ % जनतेसाठी ४४ % उरतात. म्हणजेच पायाभूत सुविधा आणि विकास कार्यक्रमासाठी किती निधी उपलब्ध होईल? त्यातून आता गेहलोत सरकारने २०० युनिट वीज फुकट, दीड कोटी स्त्रियांना फुकट स्मार्टफोन, गॅस सिलिंडर ५०० रुपयात सरसकट १००० रुपये महिना निवृत्तीवेतन सारख्या खिरापती वाटण्याचे जाहीर केले आहे. आपण सत्तेत येण्यासाठी अव्वाच्या सव्वा सवलती द्यायच्या घोषणा कार्याच्या सत्तेत आहोत तोवर ढकलायचं आणि राज्याला कर्जबाजारी करायचं असली दळभद्री धोरणं सगळे राजकारणी करत असतात. ऋण काढून सण केल्यास दिवाळखोर होण्यास किती वेळ लागेल?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 10/28/2023 - 10:25 नवीन
>>>ऋण काढून सण केल्यास दिवाळखोर होण्यास किती वेळ लागेल? देश गेला खड्यात ! आम्हाला आमच्या ७ पिढ्या पुरेल एवढे पैसे मिळालेच पाहिजेत ते ही काहिही काम न करता !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 10/28/2023 - 14:34 नवीन
त्यातून आता गेहलोत सरकारने २०० युनिट वीज फुकट, दीड कोटी स्त्रियांना फुकट स्मार्टफोन, गॅस सिलिंडर ५०० रुपयात सरसकट १००० रुपये महिना निवृत्तीवेतन सारख्या खिरापती वाटण्याचे जाहीर केले आहे. विदेशातून काळा पैसा आणला की सर्व समस्या सुटतील. पण आणणार कोण?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/28/2023 - 15:09 नवीन
विदेशातून काळा पैसा आणला की सर्व समस्या सुटतील. पण आणणार कोण? कसा आणणार? ते सांगा. श्री मोदी म्हणालेच आहेत कि जर विदेशातील काळा पैसा भारतात आणता आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील इतका पैसा आपल्याच लोकांनी विदेशात पाठवलेला आहे. काही देश केवळ अशा पैशावर आपली अर्थव्यवस्था चालवतात अशी स्थिती आहे. ते तुमच्या राजनैतिक शिष्टाचार किंवा मुत्सद्दीपणाला भीक घालत नाहीत. स्वित्झर्लंड सारख्या देशाचे नाक दाबल्यावर त्यांनी अखेर २०१९ पासून आपल्याकडील काळ्या पैशाचा हिशेब देण्यास सुरुवात केली आहे. https://www.businesstoday.in/latest/economy-politics/story/black-money-swiss-bank-accounts-india-gets-first-information-on-residents-financial-details-switzerland-231850-2019-10-07 https://www.livemint.com/news/india/india-gets-fresh-set-of-swiss-bank-account-information-of-its-nationals-organisations-exchange-pact-with-switzerland-11696845928027.html#:~:text=The%20exchange%20took%20place%20last,accounts%20in%20their%20tax%20returns. परंतु आपल्या त्याच देशद्रोही लोकांनी तो पैसा लगेच तेथून दुसरीकडे हलवायाला सुरवात केली.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 10/28/2023 - 07:22 नवीन
विद्यार्थी आणि पालकांमुळे शिक्षकांवर आत्महत्येची वेळ दक्षिण कोरीयातील बातमी https://edition.cnn.com/2023/10/27/asia/south-korea-teachers-strike-analysis-intl-hnk/index.html बघा भारतातले शिक्षक कित्ती कित्ती सुखी आहेत... तरी रडतात दळभद्री लेकाचे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 58 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा