Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आर्थिक नियोजनामागील विचार!

र
राघव
Sat, 09/23/2023 - 18:42
💬 57 प्रतिसाद
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला अगदीच नगण्य गुंतवणूक झाली. आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो. असो. स्वानुभवातून काही बाबी मला जाणवल्यात त्या अशा: - आपल्याकडे आर्थिक नियोजनाबद्दल निरक्षरता खूप आहे. आणि या विशिष्ट निरक्षरतेचं सर्वात् मुख्य कारण म्हणजे जगतांना आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण शिस्तीचा अभाव हे आहे. हेच पैसा कमी पडण्याचं एक प्रमुख कारण देखील आहे. - आपल्याकडे बहुतांशी, गणित हा विषय अत्यंत कठीण/जणू काही शत्रूच असे लहानपणापासून कळत/नकळत मनावर बिंबवल्या जातं. "ते अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत आणि जाणीवपूर्वक टाळायला हवेत. - नियोजनातला प्रमुख भाग हा उत्पन्नाच्या किती प्रमाणात आपण गुंतवणूक केली पाहिजे हा आहेच (सर्वसाधरण आवश्यक खर्च, पुढची गरज यावरून प्रमाण ठरतं), पण त्याहीपेक्षा त्यामागची नियमितता जास्त महत्त्वाची आहे. शिस्त लागते ती इथेच. They say, "commitment will help you to initiate a thing, consistency will help you to accomplish it." - गुंतवणूक करण्याआधी बेसिक लॉजिक, शक्य तेवढा जास्तीत जास्त सखोल अभ्यास आणि आपल्या अभ्यासावरचा आपला स्वतःचा विश्वास हे फार महत्त्वाचं आहे. - जर कोणतीही गुंतवणूक केवळ कोणा दुसऱ्याच्या अभ्यासावर अवलंबून केलेली असेल, तर त्या गुंतवणुकीला जुगार म्हणण्यास वाव आहे (त्यात फायदा/तोटा किती हा भाग गौण आहे). जर आपण अभ्यास करण्याचेही कष्ट उपसणार नसू, तर तो पैसा मिळण्यास आपण अपात्र आहोत हे समजून घ्यायला हवे. - बचत आणि उत्पन्न या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. दोन्हींमधे संतुलन हवं तसंच दोन्ही वृद्धिंगत व्हायला हव्यात. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणं हाही गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग आहे. - टॅक्सेस हा विषय नीट समजून घेऊन त्यानुसार गुंतवणूक, निर्गुंतवणूक आणि पुनर्गुंतवणूक करायला हवी. यातून बरीच बचत होऊ शकते. - नशीब हा एक अपरिहार्य, अनाकलनीय आणि अत्यंत महत्त्वाचा "घटक" न मानता "साथिदार" आहे असे मानत जावे. त्याचा वाटा वेगळा काढून ठेवायलाच हवा. - पैसा कमवणं, गुंतवणं, साभाळणं, पुनर्गुंतणूक करणं या बरोबरच योग्य विनियोग करणं हाही गुंतवणूकीचाच भाग आहे. विनियोग आणि खर्च या दोन गोष्टींत मूलभूत फरक आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य विनियोग होत नसेल तर ती गुंतवणूक नासली असे समजण्यास हरकत नाही. - पैसा हा जवळ-जवळ नेहमीच पैशाकडे जातो आणि पैशाचं सोंग कधीही आणता येत नाही. आपली मदत आपणच करायची आहे हे स्वतःच्या मनावर पक्के बिंबवावे. कोणीही (अक्षरशः कोणीही) आपल्या मदतीला येणार नाहीये ह्याची आपण नीट जाणीव ठेवायला हवी. जर कोणाची मदत झालीच तर तो बोनस समजावा. पण आपण स्वतः पुरेसं स्थिरस्थावर झाल्यावर निदान दोन योग्य व्यक्तींना "पायावर" उभं राहण्यास जरूर मदत करावी (don't serve them fish... equip them with knowledge to fish) आणि परताव्याऐवजी त्यांना असंच आणिक दोन योग्य व्यक्तींना मदत करावयास सांगावे. बाकी गुंतवणूक वेगवेगळ्या बास्केट्स मधे करावी, विम्यातून अपेक्षा केवळ सुरक्षेची ठेवावी वगैरे बाबी सर्वच जण जाणतात. गुंतवणूकीसाठी नेहमी काहीतरी भव्यदिव्यच स्ट्रॅटेजी असली पाहिजे असे काही नाही. They say, "simplicity is the most complicated thing to achieve.." and it's true. सध्या इतपतच. आणिक काही सुचले तर जरूर लिहेन. कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे. इत्यलम्

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20226 views

💬 प्रतिसाद (57)
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 10/08/2023 - 21:42 नवीन
धन्यवाद निनाद सर.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 10/10/2023 - 05:10 नवीन
खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. यामुळे तुम्ही जमा केलेली संपत्ती ही विनासायास तुमच्या नॉमिनीकडे ( ट्रस्ट बेनेफिशयरी) जाऊ शकते. आणि यावर बहुतेकवेळा कॅपिटल गेन्स टॅक्स लागत नाही. संपत्ती नेहमी ट्रस्टमध्ये घ्या. ह सल्ला मी जरूर देईन. यामध्ये तुमच्या संपत्तीची सुरक्षा फार जास्त असते. विश्वस्त या नात्याने तुम्ही कधीही ट्रस्टच्या अटी बदलू शकता. तुम्ही लाभार्थी काढून टाकू शकता, नवीन नियुक्त करू शकता आणि ट्रस्टमधील मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी अटी सुधारू शकता. मी यातला तज्ञ नाही त्यामुळे जाणत्या अकाउंटंट आणि हुषार वकिलाकडून हा ट्रस्ट चा सेट अप बनवून घ्या. त्याची मालकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला द्या. त्या कंपनीचे डायरेक्टर तुम्हीच रहा. या शिवाय अविभक्त हिंदु कुटुंब या सेटअप चा वापर करता येऊ शकतो. या अशा व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते. थोडा पैसा जाईल पण व्यवस्था बनेल आणि संपत्तीची कार्यपद्धती बनेल. श्रीमंत होणेच महत्त्वाची नाही तर श्रीमंत राहणे हे ही महत्त्वाचे असते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 10/10/2023 - 05:22 नवीन
तुमचा अकाउंटंट असे सल्ले तुम्हाला देत नसेल तर ही तुमचा अकाउंटंट/सी ए बदलण्याची वेळ आहे!
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 08:36 नवीन
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. किंवा उतारवयात स्वतःला बेनिफिट मिळावा आणि नंतर वारसांना म्ह्णून हा उत्तम पर्याय आहे .. पण आर्थिंक नियोजन हे त्याहून खूप वेगळे आहे
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 10/10/2023 - 09:49 नवीन
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 10:28 नवीन
तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र वाचा म्हणजे झाले खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 10/10/2023 - 23:57 नवीन
गलतीसे मिष्टेक हो गया सर!(वरील प्रतिसाद बाद समजावा!)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा