Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दोन ओळींची कविता,......

क — कर्नलतपस्वी, Wed, 09/20/2023 - 06:38
इच्छापत्र लिहून, संपत्तीची वाटणी केली वाचून बघ म्हंटल तर, दोन टिपे गाळून, तीने पावती दिली बघता बघता ढग भरून आले मधेच विज कडाडून गेली काय कमावले,किती कमावले, "ती", दोन टिपे खुप काही सांगून गेली तुमचं आपलं काहीतरीच बाबा,...... कागदावरची अक्षरे धुसर झाली दोन ओळीची कविता, बरेच काही सांगून गेली तीची दोन टिपे ,माझी दोन टिपे, जेव्हां एकत्र झाली.... वाटले, हरिद्वारची गंगाच दारी आली

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3284 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Wed, 09/20/2023 - 07:28 नवीन
म्हणजे आपोआप अश्रू ओघळणे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 09/20/2023 - 08:57 नवीन
म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल. बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 09/20/2023 - 09:12 नवीन
मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच. मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/24/2023 - 18:42 नवीन
छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/24/2023 - 18:43 नवीन
छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 09/24/2023 - 19:12 नवीन
आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही. समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा