Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लोकशाही - स्वतंत्र भारतातील एक शोकांतिका..

आ
आर्यन मिसळपाववाला
Tue, 08/29/2023 - 18:03
🗣 101 प्रतिसाद
माझा भारत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये आयुष्याच्या उतारवयात खात्रीशीर उपचार मिळतील का . नवीन पिढी सरकारी शाळेत जाण्याचा विचार करू शकेल. शहरी नागरिकांचे आयुष्य प्रदूषण आणि ट्रॅफिक मुक्त झालेय. ग्रामीण भागात बेसिक सोयी सुविधांची ऑन ग्राउंड परिस्थिती काय आहे. अखेर काय झालेय मागच्या ७६ वर्षात सामान्य माणसा साठी … धाग्यावर सर्व सामान्य माणसाला केन्द्रस्थनि धरुन प्रतिकिर्य अपेक्शित आहेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20594 views

🗣 चर्चा (101)
T
Trump Fri, 09/08/2023 - 06:07 नवीन
श्री साहना, तुम्ही दिलेल्या दुव्यासाठी धन्यवाद. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 09/06/2023 - 14:18 नवीन
भारतावरच गरळ ओकणाऱ्या बद्दल काय बोलायचे. गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ? भारता बाहेर गेल्यावर शिंगे फुटतात का काय..... @संपादक महोदय आपले लक्ष या धाग्यावर देऊन उचित कारवाई करावी. गोड गोजिरवाण्या धाग्यामागे एक लबाड उद्देश साफ दिसत आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 09/06/2023 - 22:51 नवीन
* भारताच्या विरोधांत कुठे गरळ ओकली आहे हे दाखवून द्या ! > गेल्या पन्नास-साठ वर्षांत जे उच्चशिक्षित, हुशार भारतीय लोक (अगदी तुमच्यासकट) यूके, अमेरिका, युरोपमधे गेले सगळे "लाचार भावाने" गेलेले आहेत का ? असे असल्यास आता ते परत का येत नाहीत ? बहुतांशी होय. देशांत ह्यांना संधी असत्या आणि जीवनमानाचा दर्जा चांगला असता तर इथे कोण राहणार नाही ? भारतातील बहुसंख्य मजूर हे आखाती देशांत काम करायला जातात. हे भारतांत गरीब असतात आणि इतर काहीही संधी नसल्याने त्यांना लाचार भावाने अत्यंत धोकादायक स्थितीत इतर देशांत जावे लागते. हि नामुष्कीची गोष्ट नाही का ? आखाती देशांत दररोज १-२ भारतीय काम करताना मरतात हि लाचारी नाही तर काय आहे ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/07/2023 - 06:25 नवीन
@साहना आपले संपूर्ण प्रतिसाद भंपक एकांगी आणि विशिष्ट अजेंड्याने लिहिलेले आहेत हे स्पष्ट आहेत. तेंव्हा प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करण्यात काहीच हशील नाही. भारतातील बहुसंख्य मजूर हे आखाती देशांत काम करायला जातात. हे भारतांत गरीब असतात आणि इतर काहीही संधी नसल्याने त्यांना लाचार भावाने अत्यंत धोकादायक स्थितीत इतर देशांत जावे लागते. हि नामुष्कीची गोष्ट नाही का ? आखाती देशांत दररोज १-२ भारतीय काम करताना मरतात हि लाचारी नाही तर काय आहे ? बाकी आखाती देशातच मजूर मरतात का? भारतात सुद्धा सफाई कर्मचारी, बांधकाम मजूर एवढेच कशाला सैनिक आणि डॉक्टर सुद्धा रोज मरतात. ते काही केवळ लाचारी म्हणून नव्हे. गरीबी, लाचारी, कामात असलेला धोका इ अनेक गोष्टी त्यात येतात. 798 doctors died during second wave of Covid-19 across country 343 workers died each day from hazardous working conditions. 5,190 workers were killed on the job in the United States. An estimated 120,000 workers died from occupational diseases. हि आपल्याच स्वप्न देशातील २०२१ ची आकडे वारी आहे. डोळे उघडा आणि पायाखाली काय जळतंय ते पहा
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 09/07/2023 - 22:53 नवीन
सुबोधजी, आपण सुज्ञ आहात त्या मुळे आपल्या तर्कांत आणि माझ्या मुद्द्यात काहीही फरक नाही असे तुम्हाला जाणवून येईल त्याशिवाय माझा मुद्दा काय आहे ह्यावर चिंतन केल्यास त्यातील सत्यता सुद्धा समजण्याची क्षमता आपल्या कडे आहे ! भारतीय मजूर आणि आखाती देशांत त्यांची स्थिती हा सध्या एक आंतरराष्ट्रीय विषय आहे आणि त्यावर भरपूर सार्वजनिक डेटा उपलब्ध आहे. भारतीय (पाकिस्तानी, केनिया, नेपाळी सुद्धा) मजुरांना तिथे फक्त धोकादायक स्थिती विना सुरक्षा काम करावे तर लागतेच पण अनेक वेळा त्यांची मृत शरीरे गायब सुद्धा केली जातात. आता भारत देशांत सुद्धा असेच होते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर माझा आक्षेप नाही. पण अश्या कामासाठी हे मजूर जातातच का ? तर देशांत त्यांच्या पुढील पर्याय आणखीन खराब आहेत. संपूर्ण परिवाराचा जीव धोक्यांत घालण्यापेक्षा फक एकाच जीव धोक्यांतघालून परिवाराला वाचविणे हि त्यांची लाचारीची भूमिका असते. ह्या लोकांची तुलना कोविड मधील डॉक्टर्स किंवा सीमेवरील सैनिकांशी करणे चुकीचे आहे. काही लोकांनी कदाचित मला ह्या देशबांधवांचा अपमान करण्याचा उद्द्येश आहे असा तर्क काढला असेल पण प्रत्यक्षांत उलटे आहे, अश्या मेहनती आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता असलेल्या आमच्या देशबांधवांना आम्ही देशांत काहीही संधी उपलब्ध करून देऊ शकत नाही हे भारतीय समाजाचे अपयश आहे. त्यावर चिंतन व्हावे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/08/2023 - 02:34 नवीन
मी साहना यांच्या प्रत्येक मताशी सहमत नाही परंतु त्यांच्या वर सतत जो "तुम्ही बाहेर राहता म्हणून तुम्ही देशविरोधी बोलता" हा आरोप हि योग्य नाही काही कठोर सत्य त्यांचं लेखनात आहे हे many करावे लागेल " दुरून डोंगर साजरे" हि जशी म्हण आहे तसेच "दूर गेल्यावर दिसत असलेला घरचा डोंगर हा हिमालय आहे कि टेकडी हे हि दिसते " काही बाबतीत तो डोंगर हिमालय असतो पण काही बाबतीत टेकडी ,, पण तसे दाखवले आणि तो दाखवणारा घरचाच असला कि लगेच त्यावर असा ह्ल्ला हि करणे योग्य नाही नाण्याची दुसरी बाजू : मी हे हि म्हणू इच्छितो कि साहना जी आपण खूप अभ्यास पूर्वक लिहीत असलात तरी एक प्रकारचा भांडकुदळ पण का जाणवतो? कठोर परिश्रम करण्याची क्षमता असलेल्या आमच्या देशबांधवांना आम्ही देशांत काहीही संधी उपलब्ध करून देऊ शकत नाही हे भारतीय समाजाचे अपयश आहे. त्यावर चिंतन व्हावे. यात एक कडू पणा ( बिटर्नेस ) जाणवतो अर्थात संधी आहे की नाही हे काळाप्रमाणे आणि वयवसाया प्रमाणे बदलत गेलाय .. त्यामुळे प्रत्येक स्थांतराची कारणे वेगवेगळी होती सरसकटपण करणे योग्य नाही प्रत्येक जण काही फक्त पैशाचे साठी जात नाही आणि प्प्रदेशात गुलामच असतो हि भारतात राहणाऱ्यांची भाबडी समजूत आहे ( हय्ला स्वतःचं देशात धर्म आणि जातीवरून जीवावर उठेल जाते तर "लाथाच खायच्या तर जरा चांगल्या वातवरणात बसून खाऊ असे कोणी म्हणले तर! भारत निवासीयांनी वाईट वाटून घेऊ नये (अर्थात तुम्हाला फट्य्वर मारतो/ तिकडे बसून ढुगन कागदाने पुसा वैगरे प्रतिक्रिया अपेक्षित आहेतच म्हणा )
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 09/08/2023 - 21:43 नवीन
> यात एक कडू पणा ( बिटर्नेस ) जाणवतो का नसावा ? कारण असंख्य लोकांना विनाकारण दारिद्र्यात खापर ठेवण्यात भारत सरकार आणि त्यांचे धोरणे ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. आमचे आई वडील किंवा आजोबा ह्यांचे जीवन विनाकारण कष्टप्रद करण्यात भारत सरकारची स्वातंत्र्यानंतरची धोरणे कारणीभूत आहेत. ज्यांना समाजाबद्दल प्रेम असेल त्यांच्यात हा कडवट पणा असेलच. पण आम्हीच विश्वगुरू, आमचाच भारत श्रेष्ठ, कधी तरी भविष्यांत आम्ही "सुपर पावर" बनू असल्या "दिल को बेहलाने के लिये" वाल्या गोष्टींनी छाती भरून घेणे सोपे आहे पण तो पलायनवाद किंवा मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 09/09/2023 - 06:41 नवीन
इंगजांनी भारताला किती नागवले आहे याची माहिती दादाभाई नौरोजी, भीमराव आंबेडकरांपासून ते शशी थरुरांपर्यंत अनेकांनी सविस्तर दिली आहे. अगदी साधं गूगल केलं तर हा लेख मिळाला. https://www.aljazeera.com/opinions/2018/12/19/how-britain-stole-45-trillion-from-india त्या इंग्रजांचा पुळका येऊन गेल्या ७० वर्षात असंख्य भारतीयांना दारिद्र्यातून वर आणून आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केलेल्या काँग्रेस, जनता पक्ष आणि भाजपाच्या सरकारांच्या धोरणावर काहीही आकडेवारी न देता शेरेबाजी करणारे तुमचे प्रतिसाद अत्यंत हास्यास्पद आहेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 09/09/2023 - 18:09 नवीन
सॉरी ! काँग्रेस पक्षाबद्दल आणि त्यांच्या नेत्याबद्दल मला काडीमात्र सहानुभूती किंवा आदर नाही. त्यामुळे अश्या लोकांवर मी माझे ५ सेकंड्स सुद्धा दवडणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:30 नवीन
समजतंय हो पण कडु पणा मुळे तुम्ही अभ्यासून लिहिलेल्या चांगलया मुद्यांचा सुद्धा काही परिणाम होत नाही.. असो तो तुमचा प्रश्न ... अभ्यासून लिहिता म्हणून आदर आहे म्हणून सांगण्याचा प्रयतन केला
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:32 नवीन
"असंख्य लोकांना विनाकारण दारिद्र्यात खापर ठेवण्यात भारत सरकार" "सुपर पावर" बनू असल्या "दिल को बेहलाने के लिये" वाल्या गोष्टींनी छाती भरून घेणे सोपे आहे पण तो पलायनवाद किंवा मूर्खपणा आहे. चला हे वाचून हे कळले कि तुमचा राग नेहरू आणि मोदी या दोघांवर आहे तर,, बर, जबाबदारी ना घेणाऱ्या जनतेचे काय ?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 09/11/2023 - 10:00 नवीन
नेहरू, काँग्रेस पार्टी इत्यादींचा हात ह्यांत आहेच पण शेवटी मूळ कारण हे नेहरू, मोदी, काँग्रेस नाहीत. हे फक्त सिम्प्टोम आहेत. मूळ रोग आहे तो बहुसंख्य जनता हि अत्यंत मागासलेली आहे, संस्कृतिक तसेच बौद्धिक दृष्टया त्यामुळे नापीक जमिनीतून ह्या प्रमाणे जास्त पीक येत नाही त्याच प्रमाणे ह्या समाजातून येणारे नेते मंडळी सुद्धा नेहरू आणि मोदी छापच असेल. खापर त्यांच्यावर फोडणे सोपे आहे पण मूळ कारण समाजच आहे. A nation of sheep will beget a government of wolves
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/11/2023 - 11:43 नवीन
बहुसंख्य जनता हि अत्यंत मागासलेली आहे, संस्कृतिक तसेच बौद्धिक दृष्टया त्यामुळे नापीक जमिनीतून ह्या प्रमाणे जास्त पीक येत नाही त्याच प्रमाणे ह्या समाजातून येणारे नेते मंडळी सुद्धा नेहरू आणि मोदी छापच आपली अभ्यासू वृत्ती चुकतीयं असे वाटते. सर्व प्रथम ही भूमी नापीक वगैरे काही नाही. आपल्या सारखे प्रज्ञावंत याच भूमीतून उगवले नाहीत का? स्वातंत्र्य पुर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस ही पार्टी अग्रणी होती व बहुसंख्य जनता त्या विचारधारे बरोबर जोडली होती. गांधी नेहरू यांना मानणारे लोक पुष्कळ होते.तुलनात्मक जहाल विचारांचे पक्षधर कमी होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस च्या पक्षधरांनी भरभरून मते दिली. काळ पुढे जात असताना शिक्षणाचा टक्का वाढला. स्वातंत्र्य पुर्व पिढी हळुहळू काळाच्या पडद्याआड गेली. नव्य दमाची नवी पिढी पुढे आली व काँग्रेस ला पहीला झटका आणीबाणी नंतर मिळाला व सांझा सरकार आले. ते अपयशी झाले वगैरे वेगळा विषय आहे पण एक गोष्ट मानावी लागेल की बदलाचा बिगुल वाजला. पुढे अनेक बदल झाले. आजचे सरकार याच बदला मुळे आहे. नेहरू,प्रातिनिधिक स्वरूपात, यांनी चुका केल्या तशाच काही चांगल्या गोष्टीही केल्या. कोणत्या ?तो इथला विषय नाही. बासष्ट मधे झालेली चुक पासष्ट ,एक्काहत्तर मधे सुधारली. पारतंत्र्यातून स्वातंत्र्य आणी स्वातंत्र्यानंतर ची वाटचाल कुठल्याही देशाची अशीच आसते. एका रात्रीत रोम बांधता येत नाही. अमेरिके सारखे देश सुद्धा बराच काळ गेल्यावर सद्यस्थितीत पोहोचले आहेत. सर्वगुणसंपन्न कोणी नसते. चुका होतात सुधारणा होते.विकासाकडे निरंतर वाटचाल सुरू असते. नेहरू,इंदिराजी,राजीव यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या तशाच अटलजी आणी मोदींनी ही केल्यात. तेव्हां वाईट म्हणणे बरोबर नाही. टक्के कमी जास्त एवढेच. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे झालं राजकारण पण सामान्य जनता काय चांगले काय वाईट याचा आढावा घेते व मतदान करते.असे नसते तर सत्तापालट कधीच झाला नसता. शिक्षण वाढले की बदलाव नक्कीच. शेवटचे,आय आय टी वाले आमेरिकेला गेले व सी ई टी वाले चंद्रावर. लोकशाही परिपक्व होत आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/07/2023 - 13:09 नवीन
अमरेंद्र बाहुबली यांना जसे प्रश्न पडलेले आहेत, तसे आजच्या तरूण पिढीलाच काय, पण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ प्रत्यक्ष न बघितलेल्या आम्हा सर्वांपैकी अनेकांना वाटत असण्याची शक्यता आहे. हल्लीच्या समाजमाध्यमांच्या गदारोळात आणि व्यग्र जीवनात कुणी मुद्दाम बसून एकाद्या विषयावरील साहित्याचा धांडोळा स्वतः घेऊन सगळे नीट समजून घेईल, ही शक्यता मुळातच कमी. त्यातून आता तो काळ आता इतिहासजमा झालेल्या असल्याने त्याविषयी फारशी चर्चाही घडून येताना दिसत नाही. तात्पर्य, मिपाकरांसठी उपयुक्त अशी एकाद-दोन मराठी पुस्तके इथे कुणी सुचवल्यास या विषयीची व्यवस्थित माहिती होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईल. 'लोकहितवादी' हे स्वतः ब्रिटिश सरकारचे सनदी अधिकारी (चू.भू. द्या.घ्या.) असल्याने त्यांनी त्यांची महती गाणे, यात आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 09/10/2023 - 05:13 नवीन
पुस्तके मराठी मिपाकरांसठी उपयुक्त अशी एकाद-दोन मराठी पुस्तके इथे कुणी सुचवल्यास मिपाकरांसठी म्हणण्यापेक्षा मराठी वाचकांना उपयुक्त अशी .... १९४७ नंतर लगेचच अशी पुस्तके प्रकाशित होण्यास अडचण नसावी. परंतू मराठी पुस्तके वाचकांची आवड लक्षात घेता प्रकाशकांनी पुढाकार घेतला नसावा. अगदी थेट ब्रिटिशांमुळे झालेले फायदे तोटे असा विषय नाही परंतू एकूण लोकांच्या जीवनात काय उजेड/अंधार पडत होता हे काही चरित्रे कादंबरीत दिसून येईल. गो.ना.माडगावकरांचे मुंबईचे वर्णन. दोन गोष्टी आपल्या पराभवाला,मागासलेपणाला कारण पूर्ण भारतात होत्या त्या -(१) बेशिस्तपणा,मन मानेल तसा व्यवहार, करार पाळण्याची बांधिलकी न ठेवणे. (२) जाती व्यवस्थेवर आधारित शिक्षण आणि व्यवसाय.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 09/11/2023 - 11:04 नवीन
डी डी कोसंबी यांचे प्राचीन भारतीय समाज-संस्कृति संवर्धन : एतिहासिक रूपरेखा यातील पहिलेच प्रकरण ऐतिहासिक भारत वाचतेय चांगलाच प्रकाश पडतोय.ब्रिटीशांची काळी कुटनिती, भारतीयांना गुलाम बनविण्याची रणनिती. टीप-हे पुस्तक ओनलाईन मोफत आहे,सहज डाऊनलोड करू शकता.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 09/14/2023 - 00:11 नवीन
कदाचित मीच ह्या विषयावर पुस्तक लिहिले पाहिजे असे वाटते. लक्ष्मी अय्यर ह्या अर्थतज्ञ महिलेने ह्या विषयावर इंग्रजी भाषेतून एक शोध प्रबंध लिहिला होता आणि त्यावरून इतर अनेक लोकांनी त्याच प्रकारचा आभास मांडला. त्याचे काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे. ज्यांना आवड आहे त्यांनी मूळ शोध प्रबंध वाचावा. * ब्रिटिश कालीन भारत दोन भागांत विभागाला जाऊ शकतो. थेट ब्रिटिश अंमल असलेला भाग आणि संस्थानिकांचा भाग. संस्थानिक लोकांचे जिथे राज्य होते तिथे विदेश नीती सोडल्यास इतर सर्व गोष्टींसाठी संस्थानिकांना मुभा होती. * ह्या दोन्ही विभागांचा अभ्यास केल्यास त्या काली ब्रिटिश आणि संस्थानिक ह्यांच्यांत कोण जास्त प्रभावी राज्यकर्ते होते ते समजून येऊ शकते. * ब्रिटिश लोकांनी सुपीक प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला असल्याने तो भाग संस्थानिकांच्या परंपरागत मिळालेल्या भागापेक्षा अर्थी दृष्टीकोनातून जास्त चांगला होता असे आम्ही समजू शकतो त्यामुळे हे आकडे त्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. * ब्रिटिश लोकांनी चालवलेले प्रदेश त्या काली भारतीय संस्थानिकांच्या प्रदेशापेक्षा जास्त प्रगत होते. बाळ मृत्यू दर, शिक्षण, रस्ते, कायदा इत्यादी सर्व क्षेत्रांत ब्रिटिश प्रदेश जास्त पुढे होतेच. पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा ब्रिटिश लोकांनी जिथे जिथे इन्स्टिट्यूशन्स निर्माण केली होती ते प्रदेश सतत आणि वेगाने जास्त प्रगत होत गेले. * म्हैसूर, बडोदा आणि केरळ मधील एक राज्य ह्यांना अपवाद होते, ह्या राज्यांतील व्यवस्था आणि रहाणीमान ब्रिटिश नियंत्रित भागांपेक्षा जास्त चांगले होते. * जास्त खोल अभ्यास केला असता असे दिसून येते कि "संस्था" निर्माणात ब्रिटिश खरोखर चांगले होते आणि त्यांनी घालून दिलेल्या संस्थांमुळे त्या भागांचा विकास स्वातंत्र्यानंतर सुद्धा जास्त वेगाने झाला. * जिथे जिथे भारतीय संस्थानिक थेट कर वसुली करत होते तिथे तिथे भारतीय संस्थानिकांनी अत्यंत उत्कृष्ट सेवा दिली. पण जिथे जिथे ब्रिटिश किंवा संस्थानिक स्थानिक जमीनदारांवर अवलंबून राहून कर वसुली करत होते तिथे तिथे भारतीय प्रदेश जास्त मागासलेले राहिले. * त्रावणकोर, मैसूर आणि बरोडा सर्वच बाबतीत ब्रिटिशाना मागे टाकत होती. लसीकरण, सार्वजनिक शिक्षण, रस्ते, आरोग्य ह्या बाबतीत हि संस्थाने ब्रिटिशा पेक्षा साधारण ३० वर्षे आघाडीवर होती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/14/2023 - 20:10 नवीन
तुमचा अभ्यास खरच दांडगाय.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 09/15/2023 - 07:11 नवीन
उत्तर आधी तयार करुन तसा प्रश्न करायचा आणि उत्तर लिहायचे याला अभ्यास म्हणत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 09/15/2023 - 10:09 नवीन
साहेब प्रतिसाद खोडायला तसाच अभ्यासपुर्ण प्रतिसाद देत चला.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 09/15/2023 - 10:30 नवीन
खोडण्यासाठी तो अभ्यासपूर्ण प्रतिसाद असावा लागतो
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 09/15/2023 - 05:39 नवीन
साहना यांच्या वरील प्रतिसादांतील मुद्दे खालील नकाशांवरून समजण्यास मदत होईल असे वाटते. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 09/17/2023 - 06:42 नवीन
मूळ पेपर ची ओपन आवृत्ती इथे मिळाली, जो नकाशा तुम्ही दिलाय तोच इथे देण्यात आला आहे. ज्यांना आवड आहे ते इथे वाचू शकतात. https://dash.harvard.edu/bitstream/handle/1/33785664/rest_a_00023.pdf?sequence=1&isAllowed=y
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 09/17/2023 - 06:58 नवीन
हा सुद्धा अतिशय छान पेपर आहे. उपग्रह रात्रीच्या छायाचित्रावरून देशांतील भागांत किती प्रगती काळाच्या ओघांत झाली आहे आणि त्याचा संबंध ब्रिटिश सत्ता आणि संस्थानिक ह्यांचा प्रभावाशी आहे कि नाही हि माहिती इथे आहे. टीप: भारतीय समाज मागासलेला आहे अशी कडू टिप्पणी मी केली असली त्याचे मूळ कारण इथे आहे. हा अभ्यास भारतीयांनी केला आहे. पण अमेरिकन विद्यापीठांत. कुठल्याही भारतीय विद्यापीठांत ह्या दर्जाचा अभ्यास होत नाही. हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते. खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती. https://www.cato.org/research-briefs-economic-policy/impact-colonial-institutions-economic-growth-development-india
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sun, 09/17/2023 - 16:16 नवीन
>>>हेच भारतीय लोक देशांत असते तर कुठे तरी आधार कार्ड चष्म्याच्या नंबर ला लिंक करण्याच्या लायिनीत ह्यांचे आयुष्य गेले असते. १) चष्म्याचा नंबर आधारला लिंक करावा अशा पद्धतीची योजना अजुन आणलेली नाही. अशी योजना आणण्यात काही फायदा नाही हे कळणारी मंड्ळी शासनात आहेत. २) आधार अपडेट ऑनलाईन सुद्धा करता येते. ज्या गोष्टी प्रत्येक्ष जाऊन करावे लागते अशा कामाला फार वेळ लागत नाही. आणि हे काही रोजचे काम नसते. एखाद वेळेस वेळ लागला तर त्याने आभाळ कोसळत नसते. >>>खरे तर ब्रिटिश सरकारच्या गुन्ह्याचा पाढा अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचण्यात भारतीय विद्यापीठे आघाडीवर असली पाहिजे होती. भारतीय समाज जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणून पुढे जातो... ब्रिटीश, तुर्क, मुघल नालायक होते एवढी माहीती त्यांना पुरेसी असते. आयुष्यात ते त्यांच्यपासुन दुर रहातात. त्यांच्याशी व्यवहार करतांना काळजीपूर्वक करतात. त्यांचा उगा उदो उदो करत बसत नाहीत. भविष्याकडे नजर लाऊन स्वतःची, समाजाची, देशाची त्यांच्या परीने उन्नती करण्याचा प्रयत्न करतात. हे ज्यांना समजत नाही... त्यांचे देव भले करो !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/08/2023 - 04:39 नवीन
सामान्य नागरिकांच्या आयुष्यात काय ठळक बदल झाला आहे. एकाच वाक्यात सांगता येईल " आज भारतात भिकारी सुद्धा क्यू आर कोड कि काय ते वापरून भीक मागतो " यात प्रगती कि जैसे थे कि अधोगती हे ज्याचे त्याने ठरवावे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 09/09/2023 - 20:10 नवीन
क्यू आर कोड ने पैसे दिले घेतले तर पैसे वाढतात काय? काय कौतूक त्याचं? रोख दिले काय नी क्यू आर ने दिले काय काहीही फरक पडत नाही सरकारला ट्रॅक ठेवता येत असला तरी काळा पैसा करनारे करतातच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:11 नवीन
माझ्य म्हण्यातील गोम कळली नाही बहुतेक इस्कटून सांगतो - एकीकडे क्यू र कोड साठी लागणारे मोबाईल फोन भिकाऱ्या कडे आले आणि दुसरीकडे आज हि भिकारी आहेत हा या देशातील केवढा मोठा विरोधाभास यात कौतुक पण आहे आणि वैषमय पण आहे असे मला म्हनयायचे होते जसे चांद्रयान पण आहे आणि प्रचंड गरिबी पण आहे हाच तो विरोधाभास हेच ७६ वर्षाचे फलित १ वाक्यात अजून "सुन्यास जास्त सांगणे ना लागे "
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 09/09/2023 - 20:21 नवीन
मी साहना ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत आहे. साहना ह्यांचे प्रतिसाद आरसा दाखवनारे असतात. आपण देशाबद्दल दवनिय लिहीले म्हणजे देश चांगला होत/ठरत नाही. देशाबद्दल गोड गोडच बोलावे तरच देशप्रेमी असेही काही नाही, सुधारणे साठी कटू सत्य ऐकावेच. साहनांनी जे काही मूद्दे मांडलेत ते बिनतोड आहेत. भलेही इंग्रज गेले पण ते त्यांच्या “मर्जीने” गेले. हे काही खोटे नाही ह्यात स्वातंत्र्य सैनिंकांचा अपमान येतो कूठे? इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल. बाकी खराब रस्ते, निकृष्ठ ऊपचार सेवा, भरमसाठ लाच खानारी बाबूशाही, घाणेरडी शहरे, बकाल वस्त्या, तुंबलेल्या गटारी, लोकसंख्येवर नियंत्रण नसणे, गरीबी, भूकबळी, काहीही विचार न करता घेतलेली आर्थीक धोरणे, छोटे रस्ते, ट्राफीक हे सगळं खोटं आहे का? इंग्लंड, युरोपच्या तूलनेत आपण कितीतरी मागे आहोत नी हेच साहना सांगताहेत तर मान्य करायला जड का जातंय? बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे. आता कुणाच्या नावाने बोंबलायचं? लोक देशाबाहेर पळताहेत कारण इथे परिस्थीती चांगली नाही हे खोटंय का? स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 09/10/2023 - 04:27 नवीन
इंग्रजांनी ठरवले असते तर अजून लाखो मूडदे पाडून काही वर्षे भारतात राहू शकले असते ते त्यांना कठीण नव्हते. आणी खरंच जर त्यांना शक्य नव्हते तर त्यांचे खरे कंबरडे हिटलर ने मोडले असे म्हणावे लागेल.
श्री हिटलर यांनी अगोर्‍यांच्या स्वातंत्र्यलढ्याला केलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदतीला मान्यता दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 09/10/2023 - 06:46 नवीन
सहमती दर्शवायला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. या सर्व परीस्थितीला कुठे तरी आपणच जबाबदार आहोत आणि जबाबदारी केवळ दिखावू देशप्रेमापोटी आपण नाकारत असू तर आपल्या करंटेपणाला काही सीमाच राहणार नाही. फक्त असं करतांना काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी असा दुजाभाव चांगला नाही. त्यावर कडी म्हणजे मी खूप काही लिहू शकते परंतू माझे विचार समजण्याची तुमचीच कुवत नाही असा आव आणायचा. हे कुणाला आवडेल?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 14:45 नवीन
काँग्रेसला अतिशय अश्लाघ्य भाषेत दूषणं देणं आणि त्यापेक्षा कठोर टीका ज्यांच्यावर करावी अशा मोदी आणि भाजपवर किरकोळ टीका करावी . का? काँन्ग्रेस पेक्षा जास्त शिव्या खाण्याच्या लायकीचा भाजप आहे हा तुमचा पण एकांगी पणा
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Mon, 09/11/2023 - 16:27 नवीन
माझ्या एकांगीपणाचं सोडा. भक्तांची ज्या कडक शब्दात मी निर्भत्सना करतो तशी तुमची करू नये यासाठी तुमची काय पुर्वपिठीका आहे ते सांगा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:20 नवीन
हो आम्ही हि "पळून" गेलोय पण ते - भारताचा दुस्वास म्हणून नाही - तर फक्त स्वतःचं स्वार्थसाठी ,,, पण पळून गेल्यार जी काही वर्षे झाली त्यात भारतात राहून जे काय अर्थवयवहाराला हात भार लावला असता तेवढा तरी एकूण सर्व भेटीतून लावला आहे बाकी राहिले ब्रेन ड्रेन वैगरे आपण काही हुशार कॅटॅगिरीतील नाही त्यामुळे तो आरोप आपल्यावर तरी होऊ शकत नाही आणो तसेच भारतात राहिलेले कितीतरी आय आय टी चे विंजिनियर शेवटी बँकेतून काम करताना दिसतात .. बरं आता पर्यंत कोंग्रेसच्या नावाने बोंबलता येत होते पण भाजप सरकार येऊन ९ वर्षे झाली तरी परिस्थीती सारखीच आहे. निदान काँग्रेस येवधी वर्षे तरी द्या मग बोला? काय जादूची कांडी आहे का कोणाकडे आणि भाजप काय काँग्रेस चा बाप आला तरी लोकांनी आधी मनावर घेतले पाहिजे ना ? अनेक प्रश्न शेकडो वर्षाचे आहेत .. उदय राहुलजींचा नातू गादीवर आला तरी त्यातील किती सुटतील? मर्सिडीज घ्य्याची ऐपत असते / शिक्षण असत पण रस्त्याचे नियम पाळत नाहीत हि आहे परिस्थितीती.. काँग्रेस काय किंवा भाजा काय करणार डोंबल
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 09/10/2023 - 04:08 नवीन
स्वतः मी सुध्दा बाहेर पळून जायचा विचार दुसर्या धाग्यात बोलून दाखवलाय. कधी जातायं त्या वंडरलॅण्ड मधे?लवकर निघा नाहीतर तिथेही गर्दी होईल. सहाना यांच्यी मते पुर्वग्रहदुषीत आहेत असा निष्कर्ष त्यांच्याच एका प्रतिसादांतून निघू शकतो.पण तुमचे काय? अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली,तेथील लोकसंख्या किती,नैसर्गिक संसाधने किती व तुलनात्मक दृष्टीकोनातून भारताची काय परिस्थिती? याचा विचार कधी केलात का? युरोपियन औद्योगिक क्रांतीचे पडसाद जसे इतर देशावर पडले तसे भारतावरही पडले.फायदा मात्र सायबाला झाला. सुधारणा फक्त जिथे सायेब रहात होते तिथेच झाल्या. १८९० किंवा त्याच्या आसपास पुण्यात विज,आगगाडी,पोस्ट ऑफिस होते पण थोड्याच अंतरावर आमचे गाव तीथे मात्र १९६० उजाडले का बुवा.... दीडशेहून अधिक काळ या देशावर राज्य करून येथील अर्थ व्यवस्था खिळखिळी केली,जाती,धर्म यांची भुतावळ व दोन फाळण्या करून या देशाला पंच्याहत्तर वर्षात चार युद्ध करावी लागली. तुम्हांला काय सांगायच तुम्ही ज्या आरशात बघतायं त्याचा दोष नाही म्हणता येणार कारण शेवटी डोळे तुमचे आहेत. जयचंद होता म्हणून घोरी आला,नजीब खान होता म्हणून अब्दाली आला. असेच काही लोक होते म्हणून साहेब रुजला, फोफावला. दुसर्‍या महायुद्धात सायबाला मदत करा म्हणजे स्वातंत्र्य मिळेल म्हणण्या पेक्षा सुभाषचंद्र बोस यांना साथ द्या म्हणले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. जाऊ द्यात, तुम्ही काय ते काय आपलेच दात आणी आपलेच ओठ.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sun, 09/10/2023 - 04:58 नवीन
खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल. मला आजही आठवतंय माझ्या गावाहून पुण्याला यायला अख्खा एक दिवस जायचा, अत्ता एका दिवसात जाऊन येऊन होतय. गावाहून तालुक्याला जायला तासन् तास एसटी ची वाट बघायला लागायची आज कोणीही एसटी साठी थांबत नाही. माझ्या लहानपणी परीक्षा असली की पोरांच्या नाकात काजळी जमा होत असे कारण लाईट ही नसायचीच. आज गावात २४ तास लाईट असती. सणाच्या दुसऱ्या दिवशी गावातील काही आया बाया भिक मागायला नक्कीच येत असत आज तसा विचारही कोणी करत नाही कारण गावातच रोजगाराच्या संधी तयार झाल्यात. उन्हाळा आला किंवा घरी कोणी पाहूणा आला की आमच्या अंगावर काटे येत असत कारण पाण्याची सोय नव्हती आज घरा घरात पाणी आलय. सगळेच प्रश्न संपलेत असं नाही आजही आपण बऱ्याच गोष्टीत मागे आहोत पण हळू हळू आपलीही प्रगती चालू आहे. त्यामुळे आजचा भारत आणि प्रगत देशामधील की दरी आहे कदाचित काही दशकात नक्कीच कमी झालेली असेल.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 09/10/2023 - 07:10 नवीन
खर तर आपल्यात आणि युरोप - अमेरिकेत राहणीमानाचा दृष्टीने भरपूर दरी आहे हे कोणीही मान्य करेल. पण कदाचित २०-३० वर्षांपुर्वी ही दरी मोठी असेल. अतिशय कठीण परिस्थितीत संघर्ष करुन आयुष्य या टप्प्यावर पोहचले. कधी वाटले नव्हते अम्रीका,फ्रान्स बघायला मिळेल. प्रथमदर्शनीच काय कळाले... आई बाप मुला नातवंडांना भेटायला आली की यांना भिती वाटते. बेबी सिटींग करता आलात का म्हणून चौकशी करायला घरी येतात. यांना यांच्या डे केअर व्यवसायाचे नुकसान दिसते. कधी कधी तुम्ही खरचं नोकरी करता का म्हणून घर तपासायला येतात. कोण कधी कुठे बंदूक काढेल सांगता येत नाही. शेव रेवड्या घ्याल तसे तिथे बंदूक मिळतात. मांजर हरवली तर सगळ्या पंचक्रोशीत हॅण्ड बिल्स लावतात. आईबाप मात्र मुलांना भेटायला आल्यावर हॉटेलात रुम घेऊन राहातात. १०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात. फुकट हेल्थ केअर म्हणून दामदुप्पट विमा उकळतात. मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते. लहान अबोध बाळक काही कारणास्तव रात्री अपरात्री यदाकदाचित रडले तर कडक सुटाबुटात काॅप्स दारात हजर. आमच्याकडं बघा सगळंच मोकळं ढाकळं. आणखीन असे कितीही लिहू शकतो. आता यावर कडाडून हल्ला होण्याची शक्यता नाकारत नाही. पण अम्रीके व भारत यांची तुलना करणे म्हणजे संत्रे इक्वल टू एपल म्हणण्या सारखे आहे. चांदणे भौ,आपल्या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस, जनता,भाजप्पा कोणीही असो देश पुढे नेत आहेत. जनता जागृत होत आहे. स्वातंत्र्य पुर्व पिढी संपत आली आहे. नव्या पिढीने अटकेपार नव्हे तर चंद्रावर झेडें लावलेत. सुंदर पिचई,नडेला आणी अनेक भारतीय विद्वान कित्येक परदेशीयांना आपल्या पंखा खाली घेऊन आकाश भ्रमंती करता आहेत. आता, उडदा माजी काळे गोरे असणारच. थोडा वेळ द्या. उल्टी गंगा वाहाण्यास सुरवात झाली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:40 नवीन
१०४ ताप आल्याशिवाय दवाखान्यात येवू नका म्हणून सांगतात. याचा अर्थ निशाकाळजी पणा असतो असे म्हणेन बरोबर नाही येथेही डॉक्टर किरकोळ तापला उगाच औषध देत नाही . पाणी / अर्रम आणि पॅरासिटोमॉल वर भागवा म्हणतो नाण्याची दुसरी बाजू पण बघा सार्वजनिक आरोग्य यासाठी सरकार जागरूक असते ,, उदाहरण आपली पॅथॉलॉजिकल चाचणी मधून काही सार्वजनिक आरोग्यास धोकादायक जसे कि लिजीनर्स डिसीज वैगरे तटी बी तर इ चहसानी हि खाजगी असली तरी सरकारी + खाजगी यंत्रणा अशी आहे कि लगेच नोंद होते आणि बुलावा येतो अर्थात हे मी ऑस्ट्रेल्या तील वैद्यकीय अनुभवातून सांगतोय .. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्राचे काम कदाचित वेगळे असावे .. ( हायला अमेरिकेचं मानाने मग आमची / इंग्लंड ची सिस्टीम म्हणजे कम्युनिस्ट कि ) मुलांना थोडे जरी रागावलात तर पोलिसांना फोन करेन म्हणून धमकी मिळते. इथे मात्र पाश्चिमात्य देशात "फ्रीडम ऑफ .. चा गैरवापर "असे मान्य आहे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 09/10/2023 - 11:19 नवीन
माझ्या भारतातल्या, अमेरिकेतल्या आणि फ्रान्समधल्या (दीर्घ म्हणता येईल अश्या) वास्तव्यातून जाणवले ते असे, की आपापल्या दृष्टीकोणातून अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी (चांगल्या - वाईट म्हणा हवेतर) सगळीकडेच असतात. आपले वय, संस्कार, व्यवसाय, आवडीनिवडी, मनोभूमिका, जबाबदार्‍या, वगैरेनुसार आपले मत बनत जाते. मी वयाच्या चौतिसाव्या वर्षी अमेरिकेतील एका संग्रहालयात चित्रकार म्हणून काम केले होते, पण तेंव्हा आपण तिथे कायमचे रहावे, असे वाटले नाही. तरूण वयातही तिथले मला आकळलेले जीवन आपल्याला मानवणार/झेपणार नाही, असे वाटले. दिल्लीत रहाणे आणि अमेरिकेत रहाणे, यात त्याकाळी जो फरक होता, त्यात मला दिल्लीत रहाणेच जास्त पसंत होते. मात्र पुढे दिल्लीतली गर्दी, प्रदूषण बेसुमार वाढल्यावर मात्र ते नकोसे झाले. -- आता सगळ्या व्यापातून मुक्त झाल्यावर मला कुठेही राहिले तरी फारसा फरक पडत नाही. काही मिळवण्याची इच्छा आणि जबाबदारी काहीच नसल्याने आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे,आणि छंद चालवता आले पाहिजेत, येवढेच पुष्कळ वाटते. लोकांचे म्हणाल तर मला सगळीचकडे चांगले लोक भेटतात, किंवा कशाचा आग्रह नसल्याने सगळेच चांगले वाटतात असेही म्हणता येईल. -- बाकी राजकीय सत्ता मिळवणे, ती टिकवून ठेवणे, सरकार चालवणे हा वेगळाच प्रकार असतो, त्याविषयी काहीच बोलायची माझी कुवत नाही, आणि आवडही नाही. माध्यमातून जे काही आपल्याला खरे-खोटे कळत असते, त्यातून आपली मते बनत असतात, त्यांनाही खरेतर आपल्या वैयक्तिक जीवनात काहीच अर्थ नसतो. उगाचच्या टिवल्याबावल्या, तात्पुरते मनोरंजन एवढेच.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sun, 09/10/2023 - 11:20 नवीन
भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 09/10/2023 - 14:21 नवीन
यात करायचं/ठरवायचं काय? चांगलंच. आता तुमचीच लोकं तुम्हाला फसवू लागली किंवा अप्रामाणिक झाली तो तुमचा दोष. दोन घरं पुढे आणि तीन घरं मागे अशी चाल सुरू होते. चाललेल्या दोन घरांचा डांगोरा पिटतात. (डंका वाजवतात).
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 09/11/2023 - 06:40 नवीन
यावर सोप्पा उपाय आहे. तोंड फिरवून उभे रहा. दोन घरं पुढे हे आता दोन घरे मागे होईल आणि तीन घरे मागे हे तीन घरे पुढे होईल. हाकानाका.... कसे !
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/11/2023 - 02:45 नवीन
भारताला स्वातंत्र्य मिळाले हे चांगले का वाईट? हा काय खोडसाळ प्रश्न, चांगले कि ,,,,शेवटी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य .. गुलामी ती गुलामी च्यामारी आमचं आजा / पंज्यानी नि राणी ला "राम राम ठोकला" आणि काही वर्षांनी देश बदलल्याने आम्हाला राणीला "राम राम " करावं लागतो ( दोष आमचा ) २००० साली प्रयत्न झाला राणीला येथूनही "राम राम टाटा करण्याचा.".. पण हरलो तुम्ही भारतवासी जिकलात तर करा कि आनंद .. कशाला असले दळभद्री प्रश्न विचारताय ?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 09/11/2023 - 06:43 नवीन
यात काय खोडसाळपणा ते कळाले नाही. अहो वरती अनेक जण त्यांचे आईवडील आजोबा नाकर्ते होते त्याचे खापर सरकारवर फोडत होते म्हणुन विचारले की नक्की काय समजायचं आमच्यासारख्या दरिद्री भारतीयांनी ते परदेशात राहून श्रीमंत झालेल्या महान लोकांना विचारत होतो. तुम्ही नका फार मनावर घेऊ.. :)
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 09/12/2023 - 23:46 नवीन
स्वातंत्र्य मिळाले ? गोरा साहेब गेला आणि आपला साहेब आला. सामान्य जनतेला किती फरक पडला हे आपण कोण आहात ह्यावर अवलंबून आहे. सामान्य जनतेचा मानेवरील जोखडाचे नाव फक्त बदलले. लगान दुगना नाही तरी GST तिप्पट झाला ! भारत इंग्रजाच्या गुलामीत जास्त काळ राहणे शक्यच नव्हते आणि असला तरी भारतीयांना ब्रिटिश नागरिकांच्या बरोबरीने हक्क मिळणे सुद्धा कमीच शक्य होते. ब्रिटिश सत्तेखाली भारतीय नागरिकांना कमी राजकीय हक्क असते पण जास्त अभिव्यक्ती आणि आर्थिक हक्क असते असे मला तरी वाटते. सध्या देशांत जे कायदे आहेत उदाहरणार्थ आरक्षण, RTE, SC/ST कायदे इत्यादी असणे शक्य झाले नसते. भारतीय लोकांना सध्या जास्त राजकीय हक्क आहेत आणि कमी अभिव्यक्ती तसेच आर्थिक हक्क आहेत. राजकीय हक्कांचा वापर करून इतर हक्क मिळवता येतात पण त्यासाठी समाज प्रगल्भ असणे गरजेचे आहे. भारतीय समाज तसा अजून तरी नाही. पण आर्थिक हक्क जास्त मिळाले म्हणून जनता राजकीय हक्क मिळवू शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 09/13/2023 - 16:45 नवीन
आपल्या एकंदर आकलनशक्तीचे कौतुक वाटते.... लगे रहो !!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 09/10/2023 - 15:15 नवीन
कुणाला फ्रेंच गुएना बद्दल माहीती आहे का? तिथल्या नागरीकांना फ्रेंचचं नागरीकत्व असते नी सर्व सुविधा असतात असे वाचले होते, त्याचे काही फायदे तोटे?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 09/11/2023 - 06:44 नवीन
तसे तर फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते. त्यांना सांगायला पाहिजे असं नका करु म्हणून.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/11/2023 - 12:31 नवीन
फ्रान्समधील नागरीकांणा पण फ्रेंच नागरीकत्व असते म्हणे. तिथे काही दिवसांपूर्वी सरकारविरुध्द लोक बोंब मारत होते.
पुष्कळ गुंतागुंतीचा विषय आहे, आणि त्यामागे गेल्या काही शतकातल्या विविध गोष्टी आहेत. ब्रिटिश, युरोपियन, अमेरिकनांनी केलेल्या अगणित जुलूमांचे परिणाम आता प्रकट होऊ लागलेले आहेत. त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 09/12/2023 - 09:15 नवीन
>>>त्यांचा सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता त्यांचे रक्षण करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा त्यांचा बळी घेणार देवाक ठाऊक. कोणास ठाऊक सर्वशक्तीमान, परम दयाळू गॉड आता सर्वनाश करणार की सर्वशक्तिमान परमदयाळू खुदा वाचवणार !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा