अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या माझ्या काही आठवणी!
ह्या आहेत माझ्या अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या, लाँग ड्राईव्ह्च्या काही आठवणीं - तत्कालीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या:
१. नकाश्यांचे पुस्तक (अॅटलास):
अगदी सुरूवातीला अॅटलास हा एकच आधार असायचा.
आम्हाला कुठे नवीन ठिकाणी जायचे असल्यास आधी जवळच्या गॅस स्टेशनला जाऊन त्या स्टेट / शहराच्या नकाश्याचे पुस्तक विकत घ्यावे लागायचे.
नाही मिळाले तर तसेच निघून पडायचे, आणि त्या राज्याच्या सिमेवर हायवेच्या वेलकम सेंटर मधून नकाशे विकत घ्यायचे; मग हायलायटरने डेस्टिनेशनचा रस्ता ट्रेस करून पुढची वाटचाल करायची. कधी तर फक्त फॉलकलर्स बघायला रात्री गाडी चालवून सुर्योदयच्या वेळी कुठल्यातरी कॅम्पींग साईट ला पोहोचायचो.
मी ड्रायव्हर असायचो आणि बायको नेव्हिगेटर - ती पुढ्यात नकाशाचे पुस्तक+चिप्स्+कोक/कॉफी+मराठी कॅसेटी/सिडीजचा भला मोठ्ठा आल्बम असे सगळे सांभाळत मला डिरेक्शन देत असायची. लांबलचक हायवे वर तिला कधीतरी झोप लागायची, मग मी हळू आवाजात गाणे ऐकत शक्य तितका पल्ला गाठायचो.
आताही कधी आब्बाचे फर्नँडो/डॅन्सिंग क्वीन किंवा महानोरांचे गडदं जांभळं कानावर पडलेकी मला त्या कॅसेट्स अन आमचे ते विशी पंचविशीतले अपस्टेट न्यु यॉर्क आणि न्यु इंग्लंडचे नोमॅड दिवस आठवतात.
तर अश्या प्राचीन काळात अस्मादीक अमेरिकेत स्थायीक झाले. :))
२. मॅपक्वेस्ट:
२००१ पासून पुढील ३-४ वर्ष मॅपक्वेस्ट मुळे सोपी गेली. आता स्टार्ट टू डेस्टिनेशन नेमका मॅप ऑनलाईन प्रींट (की प्रिंट?) करायची सोय झाली होती.
मी तेव्हा $१२५ ला घेतलेला ब्रदर कंपनीचा लेसर प्रींटर तब्बल १६ वर्ष विना तक्रार चालला.
मग तो टा़कून देतान उगीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावर प्रिंट केलेले नकाशे, त्या ट्रिपा, मुलींचे मुझिक क्लासेस चे नोटेशन्स, मॅथ होमवर्क, देशी रेसिपीज, ग्रीन कार्ड, नागरिकत्वाच्या सतराशे साठ डॉक्युमेंट्स, असो.
बाकी गमतीजमती वर सारख्याच. फक्त एकदा रात्री रस्ता न समजल्याने नुवर्कच्या "वेगळ्याच" भागात गोल गोल फिरलो, आणी शेवटी एका पट्रोलींग करणार्या पोलिसाकडे जाऊन "काका मला वाचवा" केले, त्याने मग नीट हायवेला लावून दिले.
३. जिपीएस (गार्मीन / टॉमटॉम):
२००५-२००६ मध्ये पहिले जिपीएस विकत घेतले. आधीपण ते बाजारात होतेच, पण नवीन टेक्नॉलॉजी असल्याने किमती अव्वाच्या सव्वा असायच्या.
आमच्या थोरलीचा जन्म पण तेव्हाचाच, त्यामुळे सौ. अन ती मागच्या सिट वर, अन मी एकटा पुढे. आमच्या कॅसेटी मात्र आता कायमच्या माळ्यावर गेल्या होत्या. त्यांची जागा नर्सरी र्हाइम्सच्या सिडीनी घेतली होती.
अजून एक आठवते. युट्यूब चा जन्म (२००६) झाला होता, पण फोनचा इंटरनेट डाटा आवाक्याच्या बाहेर, मग आम्ही घरून डिएसेल वर कूलटोड.कॉम वरून गाणे डाऊनलोड करायचो अन् सिडी बर्न करून बरोबर घ्यायचो.
४. गुगल मॅप्स / अनमिमीटेड इन्टरनेट:
शेवटी २०१० मध्ये पहीला स्मार्ट्फोन घेतला, अँड्रॉइडवर गुगल मॅप्स, युट्यूब, स्वस्तातले इंटरनेट ह्यामूळे आमाच्या लाँग ड्राइव्हज आधीपेक्षा थोड्या इझी झाल्या होत्या.
शेन्डेफळ ३-४ वर्षाचे झाल्यावर थोरली व ती मागे बुस्टर सिट्स वर, कधी मुव्ही बघ्यायच्या, तर कधी वेगवेगळे हायवे गेम्स खेळायच्या, तर बर्याचदा "आर वी देर यट?" चे पालुपद लावायच्या.
अशीच अजून एक आवडती आठवण आहे: आई व घरात एकंदरीत सर्वांचेच जी ए खूप आवडीचे आहेत.
त्यांनी अनुवादीत केलेल्य रान आणि गाव ह्या कॉनरॉड रिचरच्या कादंबर्या ओहायो व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर घडतात.
एकदा आई भरतातून आली असताना तिला त्या भागात घेऊन गेलो होतो. आणि एका ओव्हरलूक पॉईंट वरून व्हॅलीचे विहंगम द्रुष्य तास दिड तास बघत बसलो .
बायको आणि मुली एकमेकांकडे बघत होत्या, हा काय प्रकार आहे म्हणून.
असो, ह्या आहेत माझ्या आठवणी. ह्यात अमेरिका स्पेसिफीक असे विशेष काही नाही. पण १-२ लेख मिपावर वाचले अमेरिकेतले, आणि वाटले संगवेसे.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments