Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जुन्नर भटकंती -२

B
Bhakti
गुरुवार, 08/17/2023 - 15:55
💬 25 प्रतिसाद
जुन्नर भटकंती-१ पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं. सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती. साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान! यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सोपी वाट निवडली.पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा(विकिपीडिया).आमची कोकरं उत्साहात धावत होती.एका कैदेतून सुटून स्वतः फोटोंच्या कैदेत अडकवत निवांत चाललो होतो.एकूण दरवाज्यांपैकी काहीच दरवाजांवर व्याघ्र शिल्प होते.सातवाहन काळात नाणेघाटावर देखरेखीसाठी या गडाची निवड झाली आणि इतर राजवटीत अभेद्य किल्ला अशी वाटचाल आणि बांधणी झाली.इथले महत्त्वाचे ठिकाण 'शिवाईदेवी मंदिर' जिजाऊ मातेने शिवाईहून 'शिवाजी'‌ नाव छत्रपती यांना दिले.देवीचा गाभारा प्रसन्नतेने ओतप्रोत आहे.त्याचे बाह्य बांधकाम आणि शेजारील लेण्या पाहून कार्लाची आठवण झाली.शिवाईदेवी मंदिराच्या बाजूला पुरातन लेण्या खोदलेल्या आहेत.एक स्तुप आणि इतर भिक्खूच्या राहण्याची सोय असलेल्या दगडी खोल्या आहेत.इथे पाण्याच्या खोदलेल्या खुप टाक्या आहेत.लेण्यांचा समूह पाहून.छत्रपती जन्मस्थान पाहायला निघालो.हा गड बहू झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे चालतांना जीव सुखावतो.कोकरांची एनर्जी जरा कमी झाली होती.जन्मस्थळी पोहचलो.गड राजांच्या घोषणेने दुमदुमत होता.इतर वाडा पडला होता पण एकच ती प्रसिद्ध इमारत उभी आहे.त्या पाळण्यात अंगाई गात जिजाऊ शिवरायांना निजवित असेल,माझ्या मुखातून अंगाई उमटली "गुणी बाळ असा जागसी का तू राजा निज रे निज शिवबाळा" सध्या वाचत असलेल्या 'दास डोंगरी राहतो ' पुस्तकातल्या दोन पानांचे अभिवाचन केले ज्यात रामदास स्वामी शिवबांना शिकवण देतात “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” “आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे” “महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे” समोर भव्य बदामी आकाराचा तलाव आहे.त्यापुढे कडेलोट स्थान.बाजूलाच 'महादेव कोळी चौथरा' मोगलांच्या क्रूर कृत्याची, महादेव कोळींचे बंड मोडण्यासाठी त्यांचा केलेला शिरच्छेद यांची साक्ष देणारा चौथरा.परतीची वाट जराशी सोपी होती, तपासले असता जवळपास दोन्ही बाजूंनी मिळून ५ किमीची ही भटकंती-चढाई चार तासांची झाली.फुस्स झालेले कोकरू किरकोळ खरदेमुळी परत टणाटण उड्या मारु लागले. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान अ शिवनेरीवर पावसाने साधारण दर्शन दिल्यामुळे नाणेघाटाकडे पाऊसधारांच्या आशेने निघालो.शंभू डोंगरापासून स्वर्ग अवतरू लागला. A पावसाची माया न्हाऊ घाली डोंगराची काया सुखावली दिठी हिरव्या डोंगरा देता चपळ मिठी... आ सृष्टीचा मुक्त हस्त वरदान भाताच्या इवल्या रोपांवर,जागोजागच्या छोट्याशा झर्यांतून,डोंगरांवर लहणार्या तलम ढगांच्या पदरांवर दिसत होते.तो खळाळता गोड आवाज..रोज मेडिटेशनला 'प्ले' करते ,आज प्रत्यक्ष तृप्ती कानांना होताना रोमांच उठले.नाणेघाटला पोहचल्यावर तोच खळाळ हजारो वर्षांपासून ऐतिहासिक घाटातून आजही वाहत होता.हा काहीसा कठीण मार्ग प्रत्येक जण मोठ्या धीटाईने करतोच कसा याचे मला आश्चर्य वाटत असते.मी दुसऱ्या वेळी इथे आले हा आनंदही अवर्णनीय होता.पुढल्यावेळी पायथ्यापासून वर चढाई करणार असं ठरवलं. नानाचा अंगठा अनेक चढत होते पण मला पाहायचा होता नाणेघाटचा प्रसिद्ध उलटा धबधबा(reverse waterfall).पण जायचं कसं?जसा विठोबा भक्ती भावाने आठवला की सामोरी येतोच अगदी तसेच एक काहीसे वृद्ध आजोबा समोर आले "जीवधनच्या पायथ्याशी उलटा धबधबा पाहायचा का?चला अमूक अमूक दक्षिणा द्या नेतो"असे म्हणाले.चला त्याच्यामागून अर्ध्या रस्त्यात वाहनाने गेलो आणि मग पायी निघालो.ओहो...हिरव्या जीवधन किल्ल्याहून धावणारे शुभ्र मऊ ढग.. स्वर्गच! कोकरू बदकाच्या मागे धावत होतं..प्रचंड गोड व्हिडिओ आलाय. माझी लेक 'आबा आबा' नाना प्रश्न निरसण करत त्या वृद्ध आजोबांचे बोट पकडून पुढे गेली.ज्या क्षणी उलटा धबधब्यापाशी पोहचलो ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले.खालच्या दरीतील वार्याच्या प्रचंड दाबामुळे कड्यांवरून खाली पडणारे पाणी मोठ्या फोर्सने वर फेकले जाते.त्यात जो तो मनसोक्त भिजत होता.भारतात चारही उलटे धबधबे केवळ याच नाणेघाट डोंगर रांगांत आहेत ?(माहिती गुगल). त्यातील एक मी पाहत होते.परतीच्या वाटेतही आबाचे 'विठोबा'चे बोट तिने सोडले नव्हते. नाणेघाट नेहमीप्रमाणे मन जड झाल होत. पावसाळी नाणेघाट ख नानाचा अंगठा 1 जीवधन-धुक्यात हरवलेला Q उलटा धबधबा अ -भक्ती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6978 views

💬 प्रतिसाद (25)
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/17/2023 - 16:39 नवीन
अरे वा!! सुंदर भटकंती आणि फोटो. मजा आली वाचताना. नाणेघाट नेहमी मुरबाडहुन वर चढुन केला आहे त्यामुळे तो तोंडाचा (शेवटुन चौथा) व्यु कधी पाहीला नाही. उलट्या धबधब्याचा फोटोही मस्तच आलाय. छोटीशी भटकंती आवडली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/17/2023 - 20:14 नवीन
सुंदर. उलटे धबधबे सह्याद्रीच्या कड्यावर आहेत ठिकठिकाणी. पण तिथे रस्त्याने पोहोचता येईल असे आपल्याला माहीत असतात. लोणावळा -भुशी-लायन पॉईंट येथे दुसरा. नाणेघाट हा जिन्यासारखा सोपा घाट आहे. गाढव,तट्टं किंवा बैल, यावर माल लादून नेण्यासारखा. पावसाळी नाणेघाट फोटोतली वाट पावसात खळाळत्या ओढ्याचे भरते व त्यातूनच वर चढत येण्यात खूप मजा येते. फोटो घेतला तिथेच डावीकडे शिलालेखाची गुहा,कुंड आणि उजवीकडचा रांजण पाहिला असेलच.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 08/18/2023 - 01:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/18/2023 - 03:13 नवीन
भर उन्हाळ्यातही इथला परिसर विलक्षण सुंदर भासत असतो तर पावसाळ्यातले त्याचे सौंदर्य काय वर्णावे. आपटाळे पर्यन्त पर्जन्यछाया असलेल्या ह्या भागात आपटाळे सोडताच पुढे बदाबदा पाऊस कोसळत असतो. असंख्य किल्ले, लेणी, घाटवाटा या परिसरात आहेत. त्यात ती नाणेघाटाची बांधवून काढलेली वाट तर निव्वळ अद्भुत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 08/18/2023 - 04:13 नवीन
धन्यवाद मंडळींनो! -कंकाका रांजण,लेणीबद्दल पहिल्या भागात लिहिलंय. -राजेंद्र म्हणजे त्या मार्गाने वरपर्यंत येता नाही का? -प्रचेतस हा शिलालेख किती स्पष्ट आहे बघा, शिवनेरीवर.काय लिहिलंय? Image removed. (रचक्याने परवाच Arrival सिनेमा पाहिला त्यामुळे भाषा -लिपी रहस्य उलगडण्यासाठी खुप महत्त्वाची आहे हे परत पटलं:)) आणि हे माझं गोड कोकरु बदकामागे :) https://youtube.com/shorts/xHCNqZynX6g?feature=share
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/18/2023 - 05:15 नवीन
ब्राह्मी अगदी मोडकी तोडकी येते. वनसा (स्वस्तिक) सतसा गत भोजनमटपो देयधम सघ वनसा हे बहुधा यवनसा असे असावे. सतस नामक यवनांच्या गटाने हा भोजन मंडप धर्मादाय केला असा काहीसा आशय आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 08/18/2023 - 05:34 नवीन
वाह! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मनो Sat, 08/19/2023 - 07:30 नवीन
Shivneri Cave 67 Yavana inscription. Yavaṇasa Citasa Gatâna bhojaṇamatapo deyadhama saghe "Gift of a hall for the community (Sangha) by the Yavana Cita on behalf of the Gatas." Annual Reports Of The Archaeological Survey Of India Part II https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Shivneri_Cave_67_Yavana_inscription.jpg
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sat, 08/19/2023 - 10:08 नवीन
ग्रीस येथील लोकं ? यांनी का बरे दानधर्म केला ..
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sat, 08/19/2023 - 10:12 नवीन
Two Buddhist inscriptions made by Yavanas (Indo-Greeks) were found in Shivneri.[6] They suggest the involvement of men of Greek descent with Buddhism in India, as well as the continued presence and gradual acculturation of the Greeks in India in the 1st century CE.[6]
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 08/18/2023 - 14:57 नवीन
छान फोटो व प्रवास लेख ! उलट्या धबधब्याचा गुगल मॅप चे लोकेशन सेव्ह केले का ? असल्यास इथे देऊ शकता का ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 08/19/2023 - 07:05 नवीन
मी अक्टिविटी बंद करायचे विसरले, त्यामुळे १० किमी दाखवते आहे,ती तेवढी नाहीये Check out my activity on Strava: https://strava.app.link/4YUqg4kMnCb
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Fri, 08/18/2023 - 16:08 नवीन
छान भटकंती! सुन्दर फोटो!! उलटा धबधबा खासच!!! Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 08/18/2023 - 17:50 नवीन
छान फोटो, लेख. अगदी पहिल्या, 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान' या फोटोत इमारतीचा खालचा भाग आणि जमीन यामधल्या भागात काय भानगड झालेली आहे ते समजले नाही. कुणीतरी उभे होते ते फोटोतून मिटवले आहे किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 08/18/2023 - 17:52 नवीन
हो काका एक व्यक्ती होती तिला एडिट पर्यायात जाऊन इरेझ केलं.नाणेघाट फोटोतही दोघांना इरेझ केलंय पण ते जास्त कळतं नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 08/18/2023 - 18:27 नवीन
हा फोटो मी फोटोशॉपमधे व्यवस्थित केलाय, पण इथे चढवणे काही केल्या जमत नाहीये. तुम्ही हे फोटो आधी कश्यावर चढवलेले आहेत ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 08/19/2023 - 06:53 नवीन
Google drive वापरला आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 08/18/2023 - 18:01 नवीन
असाच प्रतिसाद दिला होता. उडाला वाटते. पुणे जुन्नर च्या मधे आमचे गाव आहे. राजगुरुनगर.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 08/19/2023 - 18:37 नवीन
पावसाळ्यातल्या सह्याद्रीच्या रूपाबद्दल काय बोलायचे? ते कायम शब्दातीतच असते 🙏 छान वर्णन, छान फोटोज 👍
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 08/21/2023 - 12:18 नवीन
मस्त भटकंती आणि फोटो :)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 08/21/2023 - 13:33 नवीन
भारीच 'पावसाळी नाणेघाट' फोटो मस्तच आहे. उलटा धबधबा पण सुंदर. जीवधनला वर नाही गेला का?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/21/2023 - 14:21 नवीन
जीवधनची योजना नव्हती, पुढल्या वेळी जाईन.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Mon, 08/21/2023 - 19:16 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर गुरुवार, 08/24/2023 - 07:11 नवीन
सर्व फोटो छानच तरीही तो उलट धबधब्याचा फोटो जास्त आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्नेहा.K. Tue, 08/29/2023 - 17:29 नवीन
नाणेघाटातून दिसणारे ते दृश्य नेहमीच मोहवणारे वाटते. पावसाळ्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये थंडगार हवा आणि धुक्याची दुलई यांचा अनुभव घेत फिरणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 58 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 2 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 5 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा