Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सध्या काय वाचताय?

प
प्रचेतस
Sun, 08/13/2023 - 15:55
💬 74 प्रतिसाद
बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली- हाकामारी -हृषीकेश गुप्ते. ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती. नव्या दमाचा ताकदवान लेखक. मात्र रूढार्थाने हाकामारी ही भयकादंबरी नाही. पण त्यात भयाचा आकळ सतत जाणवत राहतो. कोकणातल्या गोठणे गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी, जसा हलकेच सुरू होणारा पाऊस मुसळधार होऊन सर्व जमीन पाण्याने भरून काढतो तशी ही कादंबरी झिरपत झिरपत जाऊन मनोव्यापारांचे एक अनोखे जग आपल्यासमोर पुढे करते. कधी त्यात बालपणीचे स्मरणरंजन येते, वाड्यातले गूढरम्य विश्व उभे राहते तर हाकामारीचे परंपरागत संदर्भ येत राहतात आणि आपण ज्याची कल्पनाही केली नसेल अशा एका दुर्दैवी घटनेने कादंबरीची समाप्ती होते. कादंबरीचे भयकारी मुखपृष्ठ बघून कादंबरी वाचण्यास सुरुवात केल्यास सुरुवातीलाच काय पण आपण कादंबरी संपवत आलो तरी मुखपृष्ठ आपल्या वाचनाशी विसंगत वाटत राहते. मात्र शेवटच्या काही पानात त्या मुखपृष्ठाचा अर्थ अचानक उलगडतो आणि लेखकाचंच एक वाक्य आपल्या मनात रुंजी घालू लागतं. रुबीक क्यूबचं कोडं सुटतं तेव्हा प्रत्येक वेळी मनात आनंदाची कारंजीच उडायला लागतात असं नाही. कधी कधी कोडं सुटल्यावर मेंदूतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यागत सर्वव्यापी वेदना शरीरभर पसरतात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 18277 views

💬 प्रतिसाद (74)
क
कंजूस Wed, 08/16/2023 - 16:44 नवीन
लादेन मोहिमेचं वर्णन विकिपेजवर आहेच. पण ओबामांचे पुस्तक आल्यावर त्याचे कथानक पाहून विकिपेज अद्ययावत केले किंवा ही माहिती अगोदरच बाहेर फुटली होती ते आता कळायला मार्ग नाही. सैन्याच्या (झालेल्या )योजना प्रकाशित कोण करू शकतो आणि किती वर्षांनी यांचे नियम काय. सैनिकांनी गुप्ततेची शप्पत घेतलेली असते.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ गुरुवार, 08/17/2023 - 08:40 नवीन
स्टीफन किंग च Shawshank Redemption ही दिर्घकथा वाचली नुकतीच, (कथेचे पुर्ण नाव Rita Hayworth and Shawshank Redemption), सिनेमा हा कथेचा जवळ जवळ जस ते तस adoption आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकरांचा "जागर" मधील एक लेख वाचला (सेक्युलिरिझम आणि इस्लाम) आणि आता "शिवरात्र" मधील "गोळवळकर गुरुजी आणि गांधिजी" हा लेख वाचत आहे. ही पुस्तकं साधारण ७० च्या आसपसची आहेत पण संदर्भ जवळ जवळ आज ही लागू आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/17/2023 - 08:57 नवीन
नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक म्हणून खुशवंत सिंग प्रसिद्ध होते. पंचवीस एक पुस्तकं आहेत. ट्रेन टु पाकिस्तान गाजलेलं. एखादं वाचून लेखक आवडल्यास इतर पाहता येतील. एक आत्मचरीत्रही आहे. परंतू ज्या पुस्तकांमुळे खुशवंत उदयास आले ते 'हिस्ट्री ओफ सिखिझम' दोन मोठे खंड आहेत. ते माझे वाचायचे बाकी आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/17/2023 - 15:01 नवीन
माझ्या पाविपत जिंकतो तर (http://misalpav.com/node/46116) धाग्या वेळी मी पानिपत युध्दाबद्दल इतर राज्यातील लोकांची मते काय हे वाचत होतो तेव्हा खुशवंत सिंग ह्यांचं पानिपताबद्दलचं नत सापडलं. त्यांनी लिहीलं होतं की पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी…..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/23/2023 - 06:49 नवीन
>>>पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी….. अरे देवा...! ज्योतीषशास्त्राचा अभ्यास अजूनही परफेक्ट नै असे वाटते. ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा पण पकडल्या गेले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/24/2023 - 14:07 नवीन
पोलिसांणी त्याण्णा पकडायचा मुहुर्त जोतिषाकडूण आधीच काडुन ठेवलावता म्हने !
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 08/17/2023 - 12:08 नवीन
नुकतेच जेम्स सुझमन यांचे ‘Work The History of How We Spend Our Time’ हे पुस्तक वाचले. ज्यांनी युवाल हरारी यांचे सेपियन्स वाचले असेल त्यांना अधिक रस वाटेल असे पुस्तक आहे. लेखक हे सोशल आंथ्रापोलॉजिस्ट असल्याने त्यांनी अगदी उत्क्रांतीपासून माणसाच्या ‘कामा’चा उगम कसकसा होत गेला हे भरपूर पु्रावे देऊन सांगितले आहे. एवढा विस्तिर्ण कालपट जेंव्हा समोर येतो, तेव्हा आजची मानवी आव्हाने खूप तात्कालिक आणि बिनमहत्त्वाची वाटू लागतात. आपण हे जे करतो त्याला फार सिरियसली घेऊ नये असे लेखकाला सुचवायचे आहे. पुस्तकात इतके रोचक संदर्भ येतात, की तेच वाचत एक वर्ष निघून जाईल असे वाटते. लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पुस्तकाबाबत, पण आवरतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 08/19/2023 - 15:05 नवीन
नुकतेच वाचले ...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 08/19/2023 - 18:08 नवीन
मस्त! येउद्या त्याचा पुस्तक परीचय…
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/24/2023 - 13:49 नवीन
पुस्तक, सिनेमा , नाटक , कविता इत्यादी साहित्याचे रसग्रहण मी तरी करत नाही....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 08/21/2023 - 17:21 नवीन
धागा पाहून आठवलं अश्यात काही वाचलं नाही मिपा सोडून. मग आसपास शोध घेतला तर एस एल भैरप्पा यांची गृहभंग सापडली. कादंबरी जुनीच आहे 80-81 सालची. पण आता पुनर्मुद्रण केलं आहे. नेहमप्रमाणेच अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. वाचाण्या सारखी आहे बाकी परिचय करून देता येणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/22/2023 - 01:10 नवीन
गृहभंग वाचली आहे. मोठ्या होत जाणाऱ्या कुटुंबातील भांडणं याशिवाय काही नाही. कुटुंब कर्नाटकातील आहे, त्यांचे प्रश्न आणि समाज इतर ठिकाणी नसतात.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 08/22/2023 - 02:22 नवीन
लास्ट होरायझन वाचणार आहे. शांग्रीला बद्दल उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 08/23/2023 - 11:37 नवीन
अल्बर काम्युचे "परका" नुकतेच संपवले. पुन्हा एकदा शांतपणे वाचणार आहे. https://www.amazon.in/Paraka-Albert-Camus-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/dp/939162913X
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/23/2023 - 13:26 नवीन
छान . पुस्तके वाचण्यासाठी एक मोठ्या स्क्रीनचा टॅब शोधत होतो. Archive org वर काही चांगली कॉपीराइट फ्री पुस्तके pdf scan copy मिळतात ती मोबाईलवर वाचता येत नाहीत. आताच वर दिलेलं Albert Camus (उच्चार अल्बेह कम् यू)चं मूळ 'The stranger ' घेतलं. टॅबवर छान वाचता येत आहे. --------------- रीअलमी pad 2 - tab हल्लीच Flipkart वरून घेतला. Made in china. Color UI 4 based on ANDROID 13 आहे. ( १ ऑगस्ट २०२३ ला आला). 6*+128(20k), 8*+256(23k) दोन मॉडेल्स आहेत. इन्स्पिरेशन ग्रीन कलर छान आहे. दहा गुणीले सहा इंच दृष्य मोठी खिडकी मिळते. 450nits brightness. इतर प्लस पॉइंटस - Mtk g99 processor - 3'60k Antutu score. Medium gaming ok. Android 13 ready. Play store वरची सगळी apps मिळतात. No bloatware, no ads. 256 gb पैकी फक्त 17 gb used for OS and imp Google apps. --------------- Tab साठीचे यूट्यूबवर रिव्ह्यू मागच्या वर्षीपासून पाहिल्यावर लक्षात आले की प्युअर Android देणाऱ्या मोटोरोलामध्ये वाईफाई प्लस कॉलिंग आहे पण फोनचीच स्क्रीन मोठी केली आहे. Customized नाही. Tab साठीची गूगल ने काढलेली Android 12 L अजून फक्त नेक्सस फोल्डेबल फोनलाच दिली आहे. कधी येईल माहीत नाही. इतर काही Tab मध्ये कॉलिंग सिम सोय नाही. ______________________ या रीअलमी tab 2 मध्ये दोन विंडो, तीन tabs एकाचवेळी चालतात. फास्ट आहे. Customisation भारी आहे. जियो न्यूज appमध्ये इंडिया टुडे साप्ताहिक मोबाईलवर वाचण्यासाठी जड जाते. शिवाय हल्लीच त्यांनी डाऊनलोड ओप्शन मोबाईल appमधून काढला आहे. म्हणजे वारंवार नेट वापरायला हवे. डाऊनलोड करून प्रवासात वाचता येणार नाही. स्क्रीनशॉटही घेता येत नव्हता. पण रिअलमी pad 2 मध्ये डाऊनलोड ओप्शन आहे, स्क्रीनशॉटही घेता येतो. मोठं पान वाचता येतं. माईनस पॉईंटस - १) 3.5 mm audio socket/jack नाही. पण ४ Dolby Atmos speaker चांगले आहेत. २) OTG USB कनेक्ट होत नाही. पण nearby share किंवा InShare वापरून फाईल्स ट्रान्स्फर करता येत आहेत. ३) ओएस अपडेट्स Android 14? याचा वादा केलेला नाही पण सिक्युरिटी अपडेट्स येत आहेत.एक आली. __________________ त्यातला त्यात बरा आहे. यापुढे आणखीही चांगले (5G) येतील. Tab (Android) आणि कंपूटर (Microsoft) या दोन स्वतंत्र वेगळ्या वस्तू आहेत. एकमेकांना बाद करून शकत नाहीत. (Acer extensa, I3 12th gen N305,8+512ssd PCIe ,३५ह कंपूटर ठीक वाटतोय.) माहिती नेट वरची आहे, सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/24/2023 - 13:26 नवीन
The stranger Albert Camus. वाचलं. लेखकाच्याकडून एक हत्या होते. खटला चालतो. वकिलांची तपासणी,उलट तपासणी. मग कोर्ट दोषी ठरवते. फाशी. इथपर्यंतचे घटना, विचार लेखक स्वतः सांगतो. साधी सोपी भाषा आणि एकूण तुरंगातले विचार. बरंय.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण गुरुवार, 08/24/2023 - 16:30 नवीन
अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/The_Stranger_(Camus_novel) त्यातुन उद्धृत : Considered a classic of 20th-century literature, The Stranger has received critical acclaim for Camus' philosophical outlook, absurdism, syntactic structure, and existentialism (despite Camus' rejection of the label), particularly within its final chapter.[3] Le Monde ranked The Stranger as number one on its 100 Books of the 20th Century.[4] The novella has twice been adapted for film: Lo Straniero (1967) and Yazgı (2001), has seen numerous references and homages in television and music (notably "Killing an Arab" by The Cure) and was retold from the perspective of the unnamed Arab man in Kamel Daoud's 2013 novel The Meursault Investigation. तसेच In his 1956 analysis of the novel, Carl Viggiani wrote: On the surface, L'Étranger gives the appearance of being an extremely simple though carefully planned and written book. In reality, it is a dense and rich creation, full of undiscovered meanings and formal qualities. It would take a book at least the length of the novel to make a complete analysis of meaning and form and the correspondences of meaning and form, in L'Étranger.[5] Victor Brombert has analysed L'Étranger and Sartre's "Explication de L'Étranger" in the philosophical context of the Absurd.[6] Louis Hudon dismissed the characterisation of L'Étranger as an existentialist novel in his 1960 analysis.[7] The 1963 study by Ignace Feuerlicht begins with an examination of the themes of alienation, in the sense of Meursault being a 'stranger' in his society.[8] In his 1970 analysis, Leo Bersani commented that L'Étranger is "mediocre" in its attempt to be a "'profound' novel", but describes the novel as an "impressive if flawed exercise in a kind of writing promoted by the New Novelists of the 1950s".[9] Paul P. Somers Jr. has compared Camus's L'Étranger and Sartre's Nausea, in light of Sartre's essay on Camus's novel.[10] Sergei Hackel has explored parallels between L'Étranger and Dostoyevsky's Crime and Punishment.[11] आपण वेळ काढून वाचलात त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/24/2023 - 21:49 नवीन
बरोबर. हे सर्व सांगायचं आहे पण लेखक ते इतक्या सहजपणे पोहोचवतो. एक चांगलं पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 08/24/2023 - 17:24 नवीन
खून दिवसांपूर्वी वाचलं होता असं वाटतं. नायकाला एक प्रेयसी असते, आईचा दूरच्या गावात मृत्यू होतो, एका शेजार्याचे कुत्रे हरवलेले इ. अशी कथा असेल तर वाचले होते, पण त्याला ग्रेट का म्हणतात ते समजले नव्हते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/24/2023 - 21:43 नवीन
हेच ते पुस्तक. आपण,वाचक, किंवा मी पुस्तकाची रूपरेषा (gist) दहा ओळीत सांगतो पण ( १)त्यातील घटना, पात्रं ,त्यांचे संवाद "मनुष्याच्या जगण्याच्या आणि एकमेकांशी संपर्क/संबंध ठेवण्याच्या 'प्रवृत्ती' व्यक्त करतात. (२) मनुष्य हा रूढार्थाने समाजप्रिय आहे,समाजात राहतो तरीही तो एकटाच असतो. एकटेपणा टाळण्यासाठी खटपट करतो. (३) काही लाभासाठी तो इतरांशी संपर्क ठेवतो पण तेच लोकही याच नियमाने बांधलेले असतात व गुप्त संघर्ष सुरू असतो. मित्रप्रेमाला जागणारे ही कुणाला तरी शत्रू मानतात. (४)प्रत्येकजण आपल्या स्वार्थापुरता घटनेपुरता विचार करत असतो. (५)आईचं शेवटचं दर्शन घेणं टाळणे,सिगारेट पिणे,न रडणे या सर्व गोष्टींकडे पुढे हत्येच्या खटल्यात 'एक निर्ढावलेला थंड रक्ताचा गुन्हेगार' म्हणून पाहिलं जातं. तर अशा आरोपीस 'In the name of French people....' must be hanged. ( Why not German or British?) ही आणि अशी बरीच तत्वं किंवा existansialism नावाचं लेबल जोडलेला विषय रूक्षपणे चर्चा न करता कथानकात लेखक मांडतो ते कथा वाचताना जाणवत राहातं. हेच लेखनाचं सामर्थ्य. दुसरं एक वेगळं उदाहरण द्यायचं तर बालकवींची 'औदुंबर' नावाची छोटीशी वर वर निसर्ग कविता वाटणारी शेवटच्या दोन ओळींत,एका शब्दात ('असला') खूप मोठं तत्वज्ञान सांगून जाते. जे हजारो पानांचं विवेचन सांगू शकणार नाही. किंवा इतर लेखक,कवींना मांडता येत नाही आणि 'दुर्बोध' नावाचा शिक्का बसतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/24/2023 - 14:08 नवीन
हाकामारीचा आटोपशीर परिचय लेख आवडला !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/28/2023 - 02:59 नवीन
महाभारत जालावर कुठे मिळेल. कोणते चांगलं? मराठी http://www.esahity.com (या साईटवर >> धार्मिक पाहा. साईट बरीच जुनी आहे पण त्यांनी https secure केलेली नाही अजून. तरी सेफ आहे.) इथे मराठीतले खंड आहेत.फ्री डाऊनलोड. ......... Google search "महाभारत book pdf" खूप साईट्स येतात. फ्री डाऊनलोड. archive dot org वर कॉपी आहे ती ,गोरखपूर गीता प्रेस प्रकाशित आहे तीच इतर साईटवाले देतात. हिंदीत आहे. बरीच पुस्तके आहेत पण चांगले कोणते किंवा काय हे अभ्यासूंनी सांगावे. सामान्य वाचकांस एवढा वेळ नसतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 08/28/2023 - 03:03 नवीन
Sanjeev sabhlockcity यांचं डिजिटल पीडीएफ २८० पानी इंग्रजी घेतलंय. ते मोबाईल Kindle appवर वाचणं सोपं पडेल. त्या appवर डिक्शनरी असते. प्रवासात उपयोगी. ((लहानपणी मी सी. राजगोपालाचारी यांचं छोटंसं पुस्तक (महाभारत ५००पाने आणि रामायण,इंग्रजी) वाचलं होतं. तेवढं पुरेसं झालं. ))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/04/2023 - 20:21 नवीन
लेखक: विनायक पुरषोत्तम डावरे परम मित्र पब्लिकेशन्स -------- नेता निवडायचा असेल तर अशी पुस्तके उपयोगी पडतात
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा