हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती.
(खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा)
कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे
खालिद
आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
हा अभिप्राय मिळाला असता तर आमची लेखणी धन्य झाली असती.
(खरोखर चेंदामेंदा करणारा अवांतर आहे हा)
कृपया वरील अभिप्रायाने पामराला उपकृत करावे
खालिद
आमच्याकडे सर्व जिवंत क्रिकेट सामन्यांचे दुवे मिळतील
६. आपल्या लेखणात पु.लं दिसले
७. मागील भागांपेक्षा हा भाग उत्तम जमला आहे
खरच,
आपण जिंकलत (आपल्या रूममेटसना)
तोडलत (आमच्या मनांना)
चेंदामेंदा केलात (सर्व पाककृतींचा)
आपल्या कडे केवळ क्रिकेट्चे सामनेच ज्यास्त दिवस जिवंत राहू शकतील.
कृपया हलकेच घ्या.
हा विनोद आहे (सांगावं लागतय, काय करणार?)
रेवती
ह्म्म्म्म !!
लिहलेला प्रकार आवडला. गमतीचा भाग सोडला तर तुमच्या पाककृतीला मी फक्तं स्वयंपाकाचा कंटाळा म्हणेन... नेमक्या वेळी काम निघने किंवा हातात गुणच नसने ह्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी तुमची पाककृती म्हणजे आपल्यावरची जबाबदारी लवकरात लवकर कशी टाळायची याचे उत्तम उदाहरण आहे असे वाटते. २-३ जणांबरोबर अपार्ट्मेंट शेअर केल्यावर स्वयंपाकाची जबाबदारीसुद्धा २-३ दिवसात एकवेळ येते, मग फक्त १०-१५ मिनीटे जास्त घालुन तोच पदार्थ व्यवस्थीत का बनवु नये? नपेक्षा बनवता येतोच (स्वानुभवावरुन)!!! (कृपया हलकेच घेणे)
थोडा वेळ दिल्यास चांगला स्वयंपाक येतो. त्या आले व लसूण पेस्टमुळे फार वाईट वास येतो असे मला वाटते. त्याऐवजी आले व लसूण विकत आणून शक्यतो ठेचून घ्यावे. कांदा कोणत्या साईजमध्ये कापता त्यावर तुमच्या भाजीची चव अवलंबून असते. सांबार-डोसाभाजी वगैरे सोडल्यास शक्यतो बारीक कापावा म्हणजे चांगला परतला जातो. अमेरिकन कांद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो. (तीच गोष्ट कोबी, फ्लॉवर, बीन्स या भाज्यांची). एक प्रॉब्लेम म्हणजे अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी ग्यास शेगडी नसल्याने इलेक्ट्रिक शेगडीवर भांड्याला समप्रमाणात उष्णता मिळत नाही त्यामुळे हलवत बसणे क्रमप्राप्त होते.
कडधान्ये आदल्या रात्री भिजत घालावीत म्हणजे दुसऱ्या रात्रीपर्यंत चांगली फुगतात व लवकर शिजतात. क्यान्ड पदार्थांतील प्रिझर्वेटिवांची ग्यारंटी नसते. जर कॉलेस्टेरॉलची काळजी नसेल तर किसलेल्या खोबऱ्याची पिशवी आणून ठेवा. लसणाबरोबर थोडे खोबरेही टाकले तर भाजीला खरपूस चव येते.
आमटीत कोकम/ड्राय मॅंगो पावडर टाकली तर लिंबापेक्षा वेगळी आंबट चव येते. डाळीत पालक वगैरे चिरून-शिजवून टाकावा म्हणजे बरे लागते.
आपला,
(स्वयंपाकी) तरला आजानुकर्ण दलाल
काही प्रतिक्रियांवरून आपल्याला अंदाज आला असेलच, की आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
आपली ट्रेड सीक्रेट्स अशी चारचौघांत जाहीर करायची नसतात. बाकी लेख छान.
असेच म्हणते!
तरी बाकीचे म्हणतात त्यात तथ्य आहे असे सांगावेसे वाटते.विद्यार्थीदशेत असताना काही करणे कठीण जात असले तरी कॅन्ड फूड जरा बेतानेच. त्यापेक्षा कडधान्ये आणून घरात ठेवली, वेळेवर भिजत घातली तर महिनाभरात कमी खर्चात बरे अन्न खाता येऊ शकते. आणि चवही अधिक चांगली येते.
फरसबीच्या शेंगा, हिरवे वाटाणे, फ्लॉवर वगैरे टाकून बिशी बेळे भात करता येईल. रोज रोज तीच कडधान्याची भाजी खाण्यापेक्षा असे करुन पाहा.
कमीत कमी भांडी घासायला लागतात त्यात चायनीज पदार्थही बनवायला फार सोपे आहेत. फ्राईड राईस, कुंग पाऊ वगैरे घरी बनवता येईल. इटालियन पास्ते तर खूपच सोपे आहेत.
खालिदपंत लवकर असे पदार्थ करायला शिका म्हणजे लग्नानंतर फार त्रास होणार नाही.
आपला,
(ब्याचलर) आजानुकर्ण
श्टाईल लै भारी आहे पाकृ सांगायची! कॉलेज मधे असतांना उपलब्ध साहित्यात दोन घास बनवायच्या स्मृती जाग्या झाल्या. हे प्रयोग मित्रांच्या रुमवर व्हायचे - पण अमेरिकेत नाहि तर पिंपरी येथे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
लिहिले आहे खालिदपंत. विद्यार्थी'दशे'तले दिवस आठवले. याच मॉडेल पाककृतीवर बेतलेल्या अनेक भाज्या-कम-आमट्या पचव्यावा लागल्या आहेत :).
एकदा तर रूममेटने छोल्यांच्या कॅनमधले जास्तीचे पाणी फेकून न देता या पाककृतीत वापरले. तेव्हा त्या डिशवर आलेला सुरेख फेस पाहून इतरांच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला होता ;). [बाकी तोंडाला फेस येणे यातून उद्भवणारे पीजेज फारच अवांतर होतील, तेव्हा लिहीत नाही :).]
अमेरिकेत रहाणार्या भारतीय शाकाहारी विद्यार्थ्यांना सूचना:
अमेरिकेत जे बीन बरिटोज मिळतात त्यात बहुदा बेकन (डुक्कर) चा स्टॉक (चव येण्यासाठी) घातलेला असतो....
कुठल्याही बर्गर प्लेसमध्ये जे फ्रेंच फ्राईज (बटाट्याच्या सळ्या) मिळतात त्या बहुदा चिकन फ्राय केलेल्या तेलातच फ्राय केलेल्या असतात...
एंजॉय!!!!
ही ही ही हा हा हा...
(पाताळविजयम....)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी