प्रतिसादाच्या निमित्ताने....
खरडफळ्यावर एक प्रतिक्रीया आली आहे की मार्गी या मिपाकराने सायकलयात्रा या विषयावर दहा भागांची मालीका लिहीली.
त्यातल्या काही भागांवर अल्प तर काहीम्वर काहीच प्रतिक्रीया मिळाल्या नाहीत. हे असे का झाले असेल?
यावरून एक विचारमंथन करावेसे वाटते.
मिपावर बरेच लिखाण प्रसिद्ध होते.
काही लेखांना वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिलतो तर काहीना अगदीच अल्प मिळतो
काही लेख/ कविता इतके लोकप्रिय होतात की त्यावर विडंबनपर इतर लिखाणही येते.
वस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.
एखादा लेख तुमच्या सामाजीत किंवा राजकीय मताप्रदर्शनाची मागणी करणारा असेल तर त्यावर उलटसुलट प्रतिसाद येणे अपेक्षीतच आहे. याचा अर्थ असा नाही की ते लिखाण साहित्यीक मूल्य मांडणारे असेल.
त्याच प्रमाणे एखादी कथा काही भागांत प्रकाशित झाली असेल तर वाचक थेट कथेच्या अंतीएम भागावरच त्याला मत मांडायला वाव असेल तर प्रतिसाद देतो.
मिपावर फार छान / खूप मस्त अशा प्रतिसादांमुळे तसेही फारसे विचारमंथन होत नाहीच.
मग प्रश्न पडतो की लेखनाला आलेला प्रतिसाद महत्वाचा का मांनायचा ?
प्रतिसाद ही लेखकाला वाचकाने थेट दिलेली पावती असते हे आहेच . त्यामुळे लेखकाचा लिहायचा उत्साह दुणावतो.
पण विरोधी प्रतिसाद आला की तो उत्साह मावळतो हे देखील तितकेच खरे.
काही वेळा प्रतिसाद म्हणजे "तु माझी पाठ खाजव, मी तुझी .." असेही असते.
काही लेखक स्वतःच्या लेखनावर आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद देत प्रतिसदांची सम्ख्या वाढवतात.
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?
पण मूळ प्रश्न आहे की प्रतिसाद आणि लेखनाचा दर्जा यांचा संबंध असतो का?आणी ७व्या ओळीत तुम्हिच उत्तर दिलयवस्तुतः लेखाची क्वालिटी आणि प्रतिसादांची संख्या यांचे कसलेही नाते नसते.मजेशीर आहे धागा. चालु द्या :=)