Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

अंडा बुर्जी - एक पाकृ / एक कला (वाचोगे तो जानोगे)

प
पांथस्थ
Tue, 12/16/2008 - 20:16

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16898 views

💬 प्रतिसाद
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 20:30 नवीन
अंडा बुर्जी जशी हातगाडीवर मिळते तशी आजतागायत कोणत्याही हॉटेलात खायला मिळाल्याचा अनुभव माझ्याकडे तरी नाही... जाताना हायजीनचा विचार मात्र करू नये.... आपल्याला तर बॉ आश्चर्य वाटतं त्या हातगाडीवाल्यांचं पांतस्थांनी जबरा लिवलंय .. डायरेक्ट अनुभवलेलं ... पांतस्थ... पाकृ बरोबर असेच किस्से पण लिवत जावा बॉ .. अंमळ मजा आली ... जाऊन देत लै अवांतर झालं .. जास लिवलं तर संपादक बाबा कात्री लावायचे आणि एखादी खरड पडायची ;) - (अंड्याची सर्व अपरूपे चापून खाणारा) टारझ्या
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:01 नवीन
हायजीनचा विचार मात्र करू नये...
एकदम बरोबर टारोबा. तेलच जास्त आहे, तिखट्जाळ आहे, गाडी स्वच्छ नाहि, ताट्ल्या धुत नाहिये....ह्या मंडळींनी घरिच बुर्जी खावी माझा अनुभव असा आहे कि गाडी जेवढी कळकट्ट, कसेतरी कांदे/टोमॅटो वापरलेले तेवढि बुर्जी चवदार! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 12/16/2008 - 20:32 नवीन
परत भूक लागली मला..
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 12/16/2008 - 20:32 नवीन
पाकृ आणि त्यानंतरचे वर्णन आवडले. बुर्जीर्गही विशेष. गोवा गाड्या रत्नागिरीजवळ लांज्याला हटकून थांबत. तिथे एका गाडीवर मिळणार्‍या आम्लेट-पावाची आणि बुर्जीची चव तुमच्या लेखाने पुन्हा आठवली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/16/2008 - 21:05 नवीन
फोटू पाहून संपलो...! पांथस्था, वर्णनही अगदी करेक्ट केलं आहेस रे. तुझी निरिक्षणाला दाद देतो.. मुंबईत रात्री कुठल्याही भूर्जीपावाच्या गाडीभोवती अगदी अशीच परिस्थिती असते..! झमझम बारची नौकरी संपवून घरी परतताना बर्‍याचदा ठाणे ठेसनाच्या बाहेर रात्री एक दीडच्या सुमारास मी अगदी मनसोक्त भूर्जीपाव चापायचो त्याची आठवण झाली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 12/16/2008 - 21:19 नवीन
अशी गाडीची बुर्जी (आम्ही भुर्जी म्हनायचो) खायची चटक मला कालेजात शिकत असताना लागली ती आज्पर्यंत कायम आहे. आजकाल २ दिवसाआड तरी मला भुर्जी लागते. कालेजात आम्ही बास्केट्बॉलचा सराव करत असताना खेळुन झाल्यावर सर्वजन आमलेट / भुर्जी शोट खेळायचो. ग्राउंड च्या मध्यावरुन प्रत्येकजन ५ बास्केट करायचा प्रयत्न करी. ज्याच्या सर्वात कमी बास्केट होत किंवा ज्याचा फेकलेला बॉल बास्केट च्या जाळीला टच करत नसे तो सर्वांना आमलेट / भुर्जी खाउ घाली. आज ही प्रतीक्रिया लिहीताना त्या मंतरलेल्या दिवसांची अठवण झाली. धन्यवाद पांथस्था. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/16/2008 - 21:26 नवीन
लाजवाब कृती आणि जीवघेणे फोटू!! आणि कातिल वर्णन! एकदम सह्ही!! (तू असतोस कुठे? भारतात की अमेरिकेत की अन्य कोठे? भारत किंवा अमेरिकेत असलास तर तुझ्याकडे एकदा सविस्तर आलं पाहिजे! :B ) अरे कालेजात असताना रात्री मेसच्या भुक्कड वातड चपात्या तोडण्यापेक्षा आम्ही हॉस्टेलकरी मंडळी रात्री ९-९.३० ला टोळक्याने गाडीभोवती जमत असू. आमची वाटच बघत बसलेला असायचा जसा काही तो. गाडीशेजारीच लाकडी बाकडी टाकलेली. प्रत्येकी एक डबल अंडाबुर्जी + २ पाव हे मिनिमम ठरलेलंच त्यामुळे तयारच करायला घ्यायचा. फटाफट वाफाळती बुर्जी आणि खरपूस भाजलेले पाव समोर आले की कधी ताटली रिकामी व्हायची समजायचे नाही! मग लागेल तशी पुढची ऑर्डर (लेडीज हॉस्टेलवरुन कोणी दर्शनीय 'सामान' गाडीवर आलेलं असेल तर आणखी एक डबल बुर्जी फस्त! ;)). वरुन एकेक कप पेश्शल चा मारला की तबियत एकदम खुष! सुट्टा मारणारे लगेच त्यांच्या चैतन्यकांड्या शिलगवायचे आणि रमतगमत आम्ही हॉस्टेलला परतायचो. चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/17/2008 - 05:54 नवीन
पांथस्थाचा उत्तम लेख...फोटो मस्त आणि पुढचे चित्रदर्शी वगैरे वर्णन त्याहून मस्त..... ... मीही हॉस्टेलवरच पहिल्यांदा भुर्जी खायला शिकलो...नंतर बर्‍याचदा नाटकाच्या प्रॅक्टिसनंतर रात्री दीड दोनला बुर्जी की भुर्जी कार्यक्रम... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:16 नवीन
क्या बात है. साला तुम्हि पण आमच्या कालीज चे (काळिज खल्लास व्हायचे म्हणुन कालीज - कॉलेज नव्हे) दिवसांची आठ्वण करुन दिलीत बघा. सामान हा शब्द शाळेत असतांना फक्त वापरायला मिळाला बाळगायला कधिच नाहि :( इथे बेंगळुर मधे बुर्जी पण न्हाय आणि पेश्शल तर अजिबात न्हाय. मी बेंगळुरुमधे ऑक्ट २००४ मधे आलो. आल्या आल्या एक अंडागाडी वाल्याकडे गेलो. तर तिथे बुर्जीच न्हाय. फक्त आम्लेट आणि अंडा राईस. म्हटलं काहि नाहि तर आम्लेट दे बाबा. तर गड्याने एका पानावर आम्लेट दिले पावच नाहि. म्हणे आमच्या इथे असेच खातात. त्या दिवशीच मला जाणिव झाली की मित्रा - 'तु गलत जगह फस गया है'. करता काय. असो, आमची घरगुती गाडी बेंगळुरात पुट्टेनहळ्ली भागात लागते. सर्व मिपाकरांचे स्वागत आहे. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 12/16/2008 - 21:40 नवीन
वाचा और जाना! मी शाकाहारी.म्हणजे अंडी शाकाहारी नाही असे मानणारी . त्यामुळे मला पाकृ पेक्षा नंतरचेच वर्णन आवडले. समोर देखावा उभा राहिले. म्हणजे `दे ` म्हणणारा आणि `खावा ` म्हणणारा सुध्दा. क्लास! मीनल.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/16/2008 - 23:15 नवीन
लै मस्त फोटू आणि रेसिपी.... अमेरिकेचा विजा पहिल्यांदा मिळाला तेव्हा दुपारी ष्टाईलमधे मी आणि बायको ऑबेरॉय टॉवर्समधे जेवायला गेलो होतो -- सेलिब्रेशन म्हणून ! उगाच काहीतरी खाल्यासारखं वाटलं च्यायला !! रात्री पुण्यात आल्यावर स्टेशनसमोरच मस्त अंडा-बुर्जी, पाव आणि चहा पोटात टाकलं तेव्हा कुठे खर्‍या अर्थाने सेलिब्रेशन झालं ते आठवलं :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:19 नवीन
मी आणि बायको ऑबेरॉय टॉवर्समधे जेवायला गेलो होतो
तिथे एक प्लेट कांदा काटके ला अशी मुन्ना छाप आर्डर नाय दिलीस का? =)) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Wed, 12/17/2008 - 10:56 नवीन
आणि एसी इधर घुमा पण! - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 12/16/2008 - 23:22 नवीन
स्टेशनावरची बुर्जी आठवली आणि जीव कासावीस झाला. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/17/2008 - 03:01 नवीन
मोठा चवदार लेख आहे. मी कधीही गाडीवरची बुर्जी खाल्लेली नाही पण तुमची गोष्ट वाचून तो अनुभव मिळाला. गाडी भोवतालच्या वातावरणाचे अगदी तंतोतंत वर्णन केलेत. असच काहीसं वातावरण, संवाद भेळेच्या गाडीपाशीही अनुभवायला मिळतात. रेवती
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 12/17/2008 - 03:25 नवीन
मी शाकाहारी आहे पण तुम्ही जे वर्णन केल आहे ते खल्लास आहे. :) पाकृ विथ फोटु देण्याची तुमची कल्पना भारीच आहे. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 12/17/2008 - 03:32 नवीन
फोटो , पाकृ नेहमीप्रमाणे छानच पण ते पुढचे वर्णन जास्त चविष्ट. मध्यरात्री बर्‍याच टपर्‍यांवर भुर्जी खाल्ली आहे. पुण्यात जंगली महाराजरोडवर त्या दुचाकी पुलाच्या अलिकडच्या पदपथावर कुल्फीवाला व पलीकडे भुर्जीवाला दोघांना गब्बर केले आहे. :-)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 07:29 नवीन
ती भुर्जीची गाडी पप्याची! म्हणजे आधी त्याचे वडिल चालवायचे ते वारल्यापासून पप्या चालवतो. आणि कुल्फीवाला सोमनाथ :) पांथस्थ, लय भारी वर्णन हो महाराजा...एकदम तंतोतंत !!!!! मजा आली... आम्हीतर च्यामारी, कट्ट्यावर दंगा करुन भूक लागली की भुर्जी खायला रात्री अपरात्री जायचो त्याची आठवण झाली. आणि हो, टार्‍या म्हणतो तसं ते 'हायजीन-फियजीन' गप घरी फ्रीजमध्ये ठेऊन मगच ह्या गाड्यांवर यावं तरच मजा येते. एकदा पप्याच्या अंडाभुर्जी गाडीवर लय गर्दी होती तेव्हा आमची ऑर्डर मिळायला वेळ लागायला लागला तसं पप्याला आपणतर कांदाही कापून दिला आहे :) भुर्जी के लिये साला कुच भी करेंगा :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:34 नवीन
एकदा पप्याच्या अंडाभुर्जी गाडीवर लय गर्दी होती तेव्हा आमची ऑर्डर मिळायला वेळ लागायला लागला तसं पप्याला आपणतर कांदाही कापून दिला आहे भुर्जी के लिये साला कुच भी करेंगा
धमाल्या कडक रे मित्रा! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/17/2008 - 03:54 नवीन
पाकृती आणि भुर्जी वर्णन जब्रा !!! (चखण्याला अंडाभूर्जीचाच आग्रह धरणारे अनेक मित्र आहेत) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:20 नवीन
चखण्याला अंडाभूर्जीचाच आग्रह धरणारे अनेक मित्र आहेत) हरकत नाही, आम्ही औरंगाबादेत येऊ तेव्हा आपणही चकणा म्हणून अंडाभूर्जीच ठेवा.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Wed, 12/17/2008 - 05:26 नवीन
गाडीवरची बुर्जी खाल्लेली नाही पण एकुण वर्णनाने डोळ्यासमोर तंतोतंत चित्र उभे राहीले... निरिक्षण शक्ती दांडगी आहे तुमची पांथस्थ ....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 12/17/2008 - 06:05 नवीन
गाडीवर बुर्जी खायला काही वेगळीच मजा आहे.घरी पण बुर्जी व ऑम्लेट स्वःत करुन खाताना खुप मजा येते. खुप वर्षापुर्वी सुरभि कार्यक्रमात हैद्राबाद येथील स्पेशल ऑम्लेट वर झलक दाखवली होती. त्यात दोन अंडी एका मगामध्ये जोरात फेटुन त्याचे फेसाळ मिश्रण तो ऑम्लेटवाला तयार करत असे. त्याची ती ऑम्लेट एक ताट भरुन मोठी होत असे.सदर ऑम्लेट हैद्राबादमध्ये खुप फेमस आहे म्हणे .त्याची पा़कृ कुणाला माहित असेल तर इथे देणे. पाथंस्था बद्दल नवीन असे काय लिहणार. आता तो राहतो कुठे शोधुन सरळ जेवायलाच जायला पाहिजे :D जबराट सुगरण्या आहे तो. वेताळ
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:39 नवीन
वेताळा तु सरळ गाडी पकडुन ये बेंगळूर ला... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Wed, 12/17/2008 - 07:29 नवीन
अंडा बुर्जी खाण्याच्या गडबडीत मीठ विसरलात कि ... :-) असो..पण बुर्जी जबराटच दिसते आहे.......:-) आम्ही मीठ वरुन भुरभुरुन घेउ ...;-) अंडा बुर्जी बनविणे हि कृति नसुन कला आहे. ज्या मिपाकरांनी रस्त्याच्या कडेला गाडिवर बुर्जी खाल्ली आहे त्यांना हे नक्कीच पटेल कॉलेजात असताना रात्री ३ वाजता शिवाजीनगर्,पुणे स्टेशनबाहेरील बुर्जी आठवली हो... मजा आली..... (कॉलेजच्या आठवणीने कासाविस झालेली)स्मिता श्रीपाद
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:35 नवीन
अंडा बुर्जी खाण्याच्या गडबडीत मीठ विसरलात कि ...
ह्याला म्हणतात जागरुक खवय्ये. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Wed, 12/17/2008 - 07:52 नवीन
मीठाचं खाणार त्यालाच,चव कळणार ..:-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:25 नवीन
मीठाचं खाणार त्यालाच,चव कळणार .. वा! :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 12/17/2008 - 07:43 नवीन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. मला वाटतं इथे दर्दी बुर्जी प्रेमींची चांगलीच गर्दी आहे. तेव्हा एक धागा "आपली आवडती बुर्जी ठिकाणे" असा सुरु करावा असा विचार आहे? काय म्हणता मंडळी?? - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 07:53 नवीन
होऊन जाऊ द्या शेठ!!! शुभस्य शिघ्रम्...शिघ्रम् शिघ्रम्.... :)
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Wed, 12/17/2008 - 08:32 नवीन
लवकर हा धागा सुरु करा........ आज संध्याकाळचाच बेत करतोय...... पुण्याचा बुर्जी प्रेमी.... निखिल
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 12/17/2008 - 07:59 नवीन
जबरा... मस्त. फोटू १ नंबर.. :) मला नागपूरच्या सावजी ची आठवण झाली.. अवांतरः याला फक्त जीव घेणं असंच म्हणतात...!!!! कुठून दुर्बुद्धी झाली अन् नॉन्व्हेज खाणं सोडलं असं वाटायला लागलंय.. म्या बिच्चार्‍या शाकाहारी माणसावर किती अत्याचार करायचे... हां???? :( :''( =(( :W (दुर्दैवी शाकाहारी) मुमुक्षु :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 12/17/2008 - 14:47 नवीन
हाहाहाहा हाहाहाहाहाहा मस्त रे भौ आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Wed, 12/17/2008 - 14:56 नवीन
अंडा बुर्जी बनविणे हि कृति नसुन कला आहे. जबरा अनुभव अनेक... स्मुती जाग्या जाहल्या
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 12/17/2008 - 14:58 नवीन
ठॅक ठॅक ठ्क ठ्क ठुम ठॅम आणि मग उलथण्याला लागलेले मिश्रण काढायला एक मोठा ठणाण ठणण... मस्त.. मस्त.. वर्णन एकदम आवडले. भुर्जी आवडतेच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति गुरुवार, 12/18/2008 - 08:08 नवीन
अ॑डा भुर्जी छानच. मसाला तिखट ऐवजी का॑दा लसुण मसाला घालावा. मस्तच चव येते.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 12/07/2012 - 18:31 नवीन
हिरवी चटणी असते. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, मीठ हे पातळसर वाटून तयार केलेली चटणी घालून केलीत तर मस्त टेस्टि होईल ;) तिखट कमी वाटले तर वरतून इतर मसाले घालावेत.
  • Log in or register to post comments
आ
आचरट कार्टा Sun, 01/25/2009 - 09:36 नवीन
कालथ्याने किंवा चक्क सुरीने (हे म्हणजे अगदीच.... असो) अंडं फोडलं बुर्जीवाल्याने, की समजावं, आज अवघड आहे. एक्स्पर्ट बुर्जीवाला सरळ अंडं हातात घेतो, कढईच्या कडेवर नजाकतीने मारतो, अन कढईत रिकामं करतो, ती लय बघण्यासारखी असते... आहाहा... नुस्तं बघूनच भूक वाढते. आणि फोटो ही तर एकदम अडस कल्पना... (अडस हे रत्नागिरीकरांनी "भन्नाट" या शब्दाला दिलेलं तेजस्वी भावंड! :) ) स्वगत: आज बुर्जी खाल्ल्याशिवाय चैन नाही पडणार... :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 01/25/2009 - 10:21 नवीन
मिपाकरांपैकी ज्या स्त्री सदस्यांना गाडीवर भुर्जी खाण्याच्या आनंदापासून वंचित रहावे लागले असेल त्यांना सर्व समाजातर्फे क्षमस्व. ज्यांना टोमॅटोच्या फोडी आवडत नाहीत त्यांनी कांदा टोमॅटो एकदम परतावेत म्हणजे शिजून पल्प होतो. नंतर अंडी घालावी (वाकडा विचार करू नका). मी गरम मसाल्याऐवजी काळा (गोडा) मसाला घालतो.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 01/25/2009 - 19:43 नवीन
वा...वा पांथस्था , काय वर्णन केलंत ...एकदम जबरा. फोटू आणि रेसिपी क्लासच . एक रेसिपि बुक काढा आता राव. फोटू, रेसिपीज आणि त्यासोबत केलेलं आठवणींचं लेखन...जबरदस्त कलेक्शन होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 12/07/2012 - 14:31 नवीन
आज घरी बायको नसल्याने बुर्जीची पाककृती शोधत होतो. माझ्यासाठी हा अन्नदाता धागा.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 12/07/2012 - 18:26 नवीन
बॉइल्ड भुर्जी नामक एक प्रकार आहे, उकडलेल्या अंड्यांची भुर्जी. केली की फोटूसकट टाकीन इथे. भुर्जीच्या गाडीजवळ गोटी-सोड्याच्या गाड्या उभ्या असतात. त्या कशाला? हा विचार कधीच मनात न आलेल्या मिपाकरांचे अभिनंदन. भुर्जीच्या गाडीवर, किंवा त्या सोड्याच्या गाडीवर, उत्तम स्वस्त देशी/विदेशी दारू ओपन एयर मिळते हे किती लोकांना ठाऊक आहे इथे?
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Fri, 12/07/2012 - 18:41 नवीन
:) अनेक वर्षे अशा गाडीवर भुर्जीपाव खाल्लाय. एक लमाणी जोडपं ही गाडी चालवीत होतं. आणि इच्छुकांना स्टीलच्या ग्लासातून दारू सर्व करीत असत. मोठ्या पसरट तव्यावर उलतन्याचा खट-खट आवाज करत भुर्जी होत आली असताना लिंबू पिळून केलेल्या भुर्जीची चव अजून तोंडात रेंगाळत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 12/07/2012 - 22:49 नवीन
लै लहानपणापासून माहीत आहे. भुर्जीच्या गाड्या दोनच ठिकाणी असायच्या आधी. एकतर स्टेशन/स्टँडजवळ नायतर थेटराजवळ. आता बर्‍याच ठिकाणी दिसतात. तिथे दारू मिळते पण वाईनशॉप मधुन घेऊन येणारे जास्त्त असतात. कारण बारचा रेट आणि भुर्जीची टेस्ट. (मात्र तिथे उत्तम दारू मिळते हे नवीनच कळले. कारण तेथेच जास्त ब्रँड डुप्लिकेट जातात)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 58 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा