पापा की परी
सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. ४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले.
आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू :
१. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते.
२. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य.
३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत.
४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली.
हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते.
१. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत.
२. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत.
३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे.
४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते.
५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली.
६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे.
--
हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे.
--
घटस्फोट
बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता.
नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते.
काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो.
हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;)हो, बहुसंख्य विवाह ठरवून होतात. या लेखात बहुतांशी मुलींना दोष दिला असून मुले पापभीरू दाखविली आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजू समसमान आहेत. मुलीने विवाह करण्यापूर्वी खालील मुद्दे पहावे. १) मुलगा किमान आपल्याएवढा तरी शिक्षित असावा व किमान आपल्याएवढा तरी कमावता असावा. अन्यथा मुलीला भविष्यात न्यूनगंडातून निर्माण झालेल्या पुरूषी अहंकाराचा त्रास होऊ शकतो. २) मुलगा पूर्ण निर्व्यसनी असावा. नेहमी नाही, कधीतरीच मित्रांबरोबर अपेयपान करतो असे सांगितले असल्यास विवाह टाळावा कारण कधीतरीची वारंवारता भविष्यात (विशेषतः चाळीशीनंतर मोठ्या प्रमाणात वाढते). ३) लग्न न करणारी किंवा घटस्फोट होऊन माहेरी आलेली किंवा नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी राहणारी बहीण मुलास असल्यास विवाह टाळावा कारण अशी बहीण असूयेतून किंवा नैराश्यातून भावाच्या प्रपंचात हस्तक्षेप करते. ४) आपली गुंतवणूक किती, आईवडीलांकडे किती संपत्ती आहे, आईवडीलांनी आपल्या नावावर काय ठेवले आहे याची माहिती मुलीनं विवाहानंतर काही वर्षे तरी नवऱ्यास देऊ नये. नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतरच आवश्यक वाटल्यास सांगावे. ५) मुलीने आपले आर्थिक व्यवहार स्वत:च करावे. सर्व काही नवऱ्याच्या हातात देऊ नये. ६) विवाह ठरल्यानंतर विवाहापूर्वगच्या काळात नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा. तो धरसोड वृत्तीचा आहे का, व्यसने लपविली आहेत का, काही भानगडी होत्या/आहेत का, पैशामागे आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यातील काही गोष्टी आढळल्यास विवाह टाळावा. हे सर्व मुद्दे मुलांकरिता सुद्धा लागू आहेत. अजून एक - लग्नानंतर लगेच किंवा लग्नापूर्वीच शक्य असल्यास मुलाच्या आईवडीलांनी आपल्या मुलाचा संसार वेगळा थाटून द्यावा. भविष्यात मतभेद होऊन कटु मनाने वेगळे होण्यापेक्षा लग्न होतानाच आनंदाने वेगळे राहिल्यास कटुता निर्माण होण्याची शक्यता कमी असते व दोन्ही जोडप्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते. तसेच लग्नानंतर दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी मुलामुलीच्या प्रपंचात हस्तक्षेप टाळावा.तडजोड न करता हे झाले असते का?आयुष्यात सगळं काही असेल पण जोडीदारबद्दल प्रेम / ओढ नसेल तर अशी तडजोड असू नये इतकंच मला वाटतं.. बाकी शिक्षण, उंची , पगार ई तडजोडी दुय्यम आहेत..अर्थात ज्याचा त्याचा विचार आणि दृष्टीकोन.. पण तडजोडी होतात हे वास्तव आहेच...तडजोडी झाल्याच नसत्या तर कदाचित हा प्रतिसाद लिहायला मी अस्तित्वात नसतो किंवा वाचायला तुम्ही (कृपया व्यक्तिशः घेवु नका) अॅरेंज मॅरेज ही संकल्पना मोडीत काढायला हवी.. किमानपक्षी पहिली पायरी म्हणून घरच्यांनी बाळासाठी/बेबीसाठी स्थळ बघणे, पारखणे, छाननी करणे व निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणे हे तरी बंद करावं. (वरच्या एका प्रतिसादात मी हेच म्हंटलंय)शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे.अगदी. आणि त्याबरोबर लनाआधी शरीरसंबंध असणे हे काही पाप नाही.