Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुणे कट्टा

क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 05/04/2023 - 06:11
🗣 34 प्रतिसाद
मिपा बंद होते. कायप्पावर काही मोजक्याच महाभागांची आभासी भेट होत होती. गाठभेट व्हावी म्हणून कायप्पा वर आवाज दिला. रविवार, दिनांक सात मे तेवीस रोजी साडेदहा वाजता भेटायचे ठरले आहे. जे येतील त्यांच्या संगे व जे येवू शकणार नाही त्यांच्या आठवणीत. आता मिपा सुरू झाले आहे म्हणून जे कायप्पावर नाहीत त्यांच्यासाठी ही साद. मिपा सुरू झाले म्हणून पुण्यातली मिसळ खाऊन तोंड गोड करूयात. क. लो. आ. ता. क. मिपा पुन्हा सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी रक्त आटवले त्यांना धन्यवाद. त्यांची उपस्थित वाछंनिय आहे. श्रमपरीहार्थ निशुल्क मिसळ पाव देउन सन्मान करण्यात येईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6466 views

🗣 चर्चा (34)
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 06:20 नवीन
भेटण्याची जागा-संभाजी उद्यान मुख्य प्रवेशद्वार वेळ - सकाळी साडेदहा दिनांक-७-५-२०२२
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 06:21 नवीन
जंगली महाराज रस्त्यावर, बालगंधर्व रंगमंदिराच्या शेजारी. पुणे
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/04/2023 - 07:58 नवीन
किंवा मार्कर.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/04/2023 - 08:55 नवीन
GRCW+5H Pune, Maharashtra
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/04/2023 - 08:58 नवीन
///dolphin.shame.printing a
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 05/04/2023 - 08:08 नवीन
कट्ट्यासाठी शुभेच्छा! मिसळपाववर एखादी नवीन सुविधा, सर्वरला ताण न देता टाकता आली कींवा एखादी स्पर्धा, एखादी वाचनमालिका नवीन स्वरुपाची असे काहीतरी ठरवा, कींवा त्यावर चर्चा करा, असे सुचवेन.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 08:47 नवीन
उत्साहवर्धक सुचना.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 05/04/2023 - 08:12 नवीन
कट्ट्यासाठी पुण्यात दुसरी ठिकाणे नाहीत काय ?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/04/2023 - 09:00 नवीन
सहमत. मागे मी म किंवा कदाचित मिपाचाच एक कट्टा स्पाइस की काहीतरी जागी झाला होता. तिथे अशी गृपसाठी एकत्र बसण्याची आणि छोटेखानी खान पान व्यवस्था उत्तम होऊ शकली होती. चुभू द्याघ्या. बरीच वर्षे झाली. नाव नीट आठवत नसेलही. म्हात्रे पुलावरून पलीकडे एका निवांत रस्त्याला होते. लग्न वगैरेसाठी लॉन असतात तशा आजूबाजूला दिसल्या. पार्किंगची सोय होती. स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट, मोकळा बगीचा असे सर्व.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 09:14 नवीन
कोथरूड, डि पी रोडवर मल्टी स्पाईस किंवा विष्णूजी की रसोई सुद्धा चांगली ठिकाणे आहेत. दोन्ही ठिकाणी दुपारच्या जेवणाची चांगली सोय आहे. आता कायप्पावर ठरले,मोजक्याच लोकांचा होकार आला आहे. मिपा सुरू झाल्यामुळेच साद घातली. कदाचित पुढे मोठ्ठा कट्टा आयोजित करताना सर्व सूचनांची दखल घेतली जाईल.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 09:04 नवीन
त्याचं काय आहे ना, -पाताळेश्वरला बसू देत नाही. -गुडघे पर्वती चढायला साथ देत नाहीत. -सारसबागेत जोशी अभ्यंकर, जक्कल, प्रकाश हेगडे आठवतात. -शनिवारवाड्यावर गेलो की पुतण्याच्या 'काका मला वाचवा',आशा किंकाळ्या ऐकू येतात. - संभाजी पार्क मधे जुन्या आठवणी,खुणा आजूनही पुसटश्या का होईना दिसतात. वसंत बापटांची ती कवीता आठवते, आजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली ग गाली हसते आजून आपुल्या आठवणींनी शेवंती लाजवंती होते म्हणून संभाजी पार्क. छान गारवा आहे , जवळच बेडेकर मिसळही आहे. या वेळेस इथे भेटू पुढील कट्ट्या साठी तुम्ही ठिकाण सुचवा.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/04/2023 - 09:11 नवीन
वर सुचवलेले ठिकाण, (नाव कोणी स्थायिक पुणेकर कदाचित नेमके सांगतील) येथे: १. बसू देतात, स्वागतही करतात २. एकही पायरी चढावे लागत नाही. ३. कोणीही कोणास ठार मारले नाही. किंकाळ्या नाहीत. ४. झुडपे आहेत. सदाफुली शेवंती शक्यता नाकारता येत नाही. ५. बेडेकर नाही, पण इतर मिसळ आणि अन्य पदार्थ उपलब्ध असल्याचे आठवते. शुभेच्छा. कुठेही कट्टा झाला तरी फोटो वृत्तान्त येऊ द्या.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 09:15 नवीन
वर प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/04/2023 - 12:20 नवीन
आणि परत जाणे हे जंगली महाराज रोडवरील पाताळेश्र्वर फार सोपे ठिकाण वाटल्याने तीनदा येऊन गेलो. आताचे संभाजी उद्यान ही थोडेसेच पुढे आहे. ( दिलेला प्लस कोड पाहिला.) ओके. इंद्रायणी एक्स्प्रेसने साडे नावाला पोहोचता येते. आणि परत अकराला निघालो की भुसावळ एक्स्प्रेस मिळते. दीड तास कट्ट्यासाठी भरपूर होतो. कारण लेखी ओळख झालेल्या मिपाकरांना प्रत्यक्ष भेटणं एवढाच उद्देश असतो. जेवण, हॉटेलिंग यात मला रस नसतो. पण या वेळी येत नाही कारण वसईत जाणार आहे. पुढे कधीतरी मेट्रो सुरू झाल्यावर एक मोबाईल कट्ट्याला नक्की येईन. एक रिटन तिकीट काढून एक तास मेट्रोत फिरायचे.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 05/04/2023 - 14:11 नवीन
परगावी असल्याने येणे शक्य नाहीत तरी मी ही ठिकाणे सुचवू शकतो १. संगीतकार श्रीकांत ठाकरे रस्ता, कुमार परिसर रोड, कोथरूड (खाण्याची ठिकाणे - मुक्ताई कॅफे, माऊली पान शॉप, उसाचा रस वगैरे मिळेल, इतर हॉटेलं ही याच रस्त्यावर आहेत, जरासं चालायची इच्छा असल्यास गांधीभवन जवळच). सध्या बहावा फुलला असावा या रस्त्यावर. वेळ : संध्याकाळ. दुपारी खूप ऊन असेल. खूप लकी असाल तर संजोपराव हेडफोन घालून ट्रॅक सुटमध्ये युट्यूबवर विडिओ पाहत महात्मा सोसायटीकडे चालताना दिसतील. २. जिजाई कॅफे, मुळशी रस्ता. - कट्ट्यासाठी खूप चांगले ठिकाण. पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही. रिक्षा किंवा खाजगी वाहने असतात, मॅनेज होते. पण मस्त जागा. ३. शासकीय तंत्रनिकेतन मैदाना च्या कोपर्‍यावर, खाऊगल्ली शेजारीच आहे. झाडे भरपूर आहेत. मैदानाच्या बाजूला, आत बसायलाही जागा असावी. ४. महात्मा फुले संग्रहालय ५. यशदा ओपन एअर थिएटर जाताना रजिस्टर करावे लागते. यशदामध्ये नेहमी कोणताना कोणता कार्यक्रम, कार्यशाला सुरु असते. फक्त प्रिटेंड करायचे आणि निमूट नाव लिहून आत जायचे. अतिशय शांत जागा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/04/2023 - 16:58 नवीन
>>>खूप लकी असाल तर संजोपराव हेडफोन घालून ट्रॅक सुटमध्ये युट्यूबवर विडिओ पाहत महात्मा सोसायटीकडे चालताना दिसतील अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता. बाय द वे, संजोपराव दिसले तर आमचाही नमस्कार सांगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/04/2023 - 17:02 नवीन
अरे वाह ! लेखन आणि शैली पाहता
फार वाक्ये अर्धवट राहतात तुमची आजकाल. शब्दकोडी सोडवत चला. बाकी उरलेले वाक्य बोलला नाहीत तरी कळलेच. वस्ताद आहात हो तुम्ही मिपाचे. अर्थात तुम्ही जुने जाणते. मिपाचे बारसे जेवलेले.. तुमच्या जाणकार नजरेतून काय सुटेल? या कट्ट्याच्या निमित्ताने संजोपराव उपस्थित होतील आणि तेच हणमंत अण्णा आहेत असे जाहीर करतील असे वाटले होते. पण परगावी असल्याने योग नाही. ;-) ह घ्या.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/04/2023 - 16:01 नवीन
मिपा बद्दल काहीच बातमी नसल्यामुळेच कायप्पावर ठरले. आपली भेट झाली असती तर.... आसो परत कधीतरी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/05/2023 - 01:16 नवीन
आर्मीचे लोक निवृत्तीनंतर बंदूक ठेवून शकतात का? किंवा त्यांचे शस्त्रास्त्रे बाळगण्याचे लायसन आपोआपच रद्द होते. कट्ट्याला हा विषय काढणार होतो. (दुसरे एक आर्मी/डिफेन्सवाले मिपाकर हल्ली दिसत नाहीत मिपावर. )
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 05/05/2023 - 03:42 नवीन
खाजगी बंदूक बाळगण्यासाठी लायसन हे काढावेच लागते. तुम्ही सैनिक असलात तरीही. किंबहुना, तळावर तैनात असणारे सैनिक तर खाजगी बंदूक घरी ठेवूच शकत नाहीत, त्यांना ती सरकारी शस्त्रागारात जमा करावी लागते.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/05/2023 - 07:06 नवीन
शस्त्रास्त्र कायदा सर्वांना सारखाच लागू आहे. सैन्यात असताना सुद्धा दुनळी खरेदी करण्यासाठी परवाना लागतो. तैनात असताना ती दुनळी शस्त्रागारात जमा करावी लागते. सुट्टीवर जाताना बरोबर घेऊन जाऊ शकतात. गावी गेल्यावर जवळच्या पोलीस ठाण्यात सांगावे लागते. निवृत्तीनंतर शस्त्र बाळगण्यासाठी परवाना लागतो. तैनात असताना सरकारी शस्त्रे वापरण्यासाठी परवाना लागत नाही. सैनिक म्हणून कुठल्याच प्रकारची कायद्यात सुट नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/05/2023 - 05:13 नवीन
कट्ट्याला आहेच. फक्त गडबडीत असल्याने थोडे लवकर निघावे लागेल.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/05/2023 - 07:08 नवीन
मिसळी माझ्यातर्फे. पोटात जागा असू द्यात. &#128512
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/05/2023 - 07:56 नवीन
संभाजी उद्यान म्हणजे जवळपास मिसळीचं असं ठिकाण नाहीच, त्यातल्या त्यात जवळ म्हणजे अहिल्यादेवीनजीकचं रामदास किंवा फर्ग्युसन कॉलेज रोडवरील सरमिसळ.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 05/05/2023 - 07:56 नवीन
सेम हियर, भेटीगाठी घेउन निघेन
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/05/2023 - 08:55 नवीन
बेडेकर आहेत ना. मला वाटते आपण तीन चारजण असू. तरी बघू आणखी कोण येतंय ते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/05/2023 - 09:20 नवीन
रविवार म्हणजे बेडेकरला प्रचंड गर्दी. शिवाय बेडेकर म्हणजे लव्ह-हेट :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/05/2023 - 09:40 नवीन
तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं हा हा तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं. भेटूयात तर खरं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/05/2023 - 09:47 नवीन
=)) भेटुयात तर नक्कीच. खाणं हा दुय्यम भाग.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 05/05/2023 - 09:42 नवीन
मला बेडेकर नुसतेच नाव माहिती, सत्तरी आली पण अजून नाही खाल्ली.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 05/05/2023 - 15:31 नवीन
मागे आम्ही सगळे शांग्रीला हॉटेलला भेटलो होतो. पण तो कट्टा अर्थातच सम्ध्याकाळचा होता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 05/07/2023 - 05:50 नवीन
पहिलाच कट्टा असेल, माझ्यासाठी! मिपाच्या भाषेत -- रुमाल टाकून ठेवतो. (थोडासा उशीर होईल, आणि PMPML बस मधेच बंद पडू नये, म्हणजे मिळवलं :-))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 05/07/2023 - 15:25 नवीन
अरे वा! . . . पण फुडं काय झालं? कळवावे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 05/07/2023 - 16:05 नवीन
वृत्तांत मिळाला.. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा