Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - एप्रिल २०२३

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 04/04/2023 - 09:15
🗣 57 प्रतिसाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान कर्नाटकात कोलार जिल्ह्यात एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. राहुल म्हणाले होते- " नीरव मोदी, ललित मोदी .. अच्छा .एक छोटासा सवाल आहे . या सर्व चोरांचे नाव मोदी कसे ?" यावरून सर्व मोदींचा अपमान केला म्हणून पूर्णेश मोदींनी खटला दाखल केला. माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारच्या खटल्यात संबंधित आरोपीला 'माझा उद्देश सगळ्या मोदींना चोर म्हणायचा नव्हता पण तसा अर्थ निघत असला तर त्याबद्दल माफी' असे म्हणून सोडून द्यायचा पर्याय देत असते. तो जर फिर्यादीने मानला तर खटला बंद होतो आणि पुढे काही होत नाही. अन्यथा खटला पुढे चालू राहतो आणि मग आरोपी नक्की काय म्हणाला आहे, त्यातून अर्थ काय निघतो हे बघितले जाते. या खटल्यातही तसेच झाले असायची शक्यता आहेच. पण 'मी माफी मागायला सावरकर आहे का' या नेहमीच्या खाक्याला अनुसरून राहुल गांधींनी तशी माफी मागायला नकार दिला असेल तर मग फिर्यादीने ती माफी मान्य करायचा किंवा नाकारायचा प्रश्नच येत नाही. अशाप्रकारच्या खटल्यात जास्तीत जास्त २ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होते. सुरतमधील संबंधित कोर्टाने जास्तीतजास्त शिक्षा राहुल गांधींना दिली असे दिसते. आता त्या कोर्टाने असे का केले असावे? तर त्याचे उत्तर दुसर्‍या एका खटल्यात लपले आहे. त्याचे झाले असे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना उद्देशून राफेल विमानखरेदी प्रकरणात 'चौकीदार चोर है' ही घोषणा राहुल गांधींनी केली होती. या प्रकरणी चौकशी व्हावी म्हणून अरूण शोरी आणि यशवंत सिन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या सुनावणीत राफेल व्यवहाराची सगळी कागदपत्रे बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाने मागितली तेव्हा (किंवा त्या सुनावणीदरम्यान कधीतरी) राहुल गांधींनी 'बघा सुप्रीम कोर्टाने सुध्दा चौकीदार चोर है' हे मान्य केले असे म्हटले असे विधान केले. त्याविरोधात भाजप नेत्या मिनाक्षी लेखींनी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला अशी याचिका दाखल केली. त्याप्रकरणी परत कोर्टाने आम्ही कधीही चौकीदार चोर है असे म्हटलेले नाही हे स्पष्ट करत राहुल गांधींना माफी मागायचा पर्याय दिला. तो पर्याय स्विकारणे नाहीतर तुरूंगात जाणे हे दोनच मार्ग शिल्लक राहिल्यावर राहुल गांधींनी निमूटपणे कोर्टाची माफी मागितली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की यापुढे राहुल गांधींनी जाहीर वक्तव्ये करताना काळजी घ्यावी. आता पूर्णेश मोदींनी दाखल केलेल्या खटल्यात राहुल गांधी संधी दिल्यावर माफीही मागत नाहीत आणि २०१८-१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने काळजी घ्या असे स्पष्टपणे सांगितलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करतात असे सुरतच्या कोर्टाला वाटले असायची शक्यता आहे. त्यामुळे त्या कोर्टाने राहुल गांधींना जास्तीतजास्त म्हणजे २ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली. आता गुन्हा कितपत मोठा आहे आणि दोन वर्षे तुरूंगात धाडण्यायोग्य आहे का याविषयी बरेच लिहिले आणि म्हटले गेले आहे. पण त्यामागे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कानपिचक्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले हा पण महत्वाचा मुद्दा आहे हे पण महत्वाचे आहे. काहीही असले तरी कायद्याच्या आणि कोर्टाच्या दृष्टीकोनातून ती शिक्षा दिली गेली आहे. राहुल गांधींची आजी इंदिरा गांधींची लोकसभेवर झालेली निवडही अशा वरकरणी क्षुल्लक वाटणार्‍या कारणांमुळे कोर्टाने रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी देशात आणीबाणी लादली आणि तो निर्णय फिरवला. आता राहुल कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. एका अर्थी आजीचे पाप नातवाला भोगायला लागत आहे असे म्हणायचे का? आपल्याकडे ज्याला पितृदोष म्हणतात तो हाच का? आता राहुल गांधींनी या शिक्षेविरोधात अपील केले आहे. ते कायद्याच्या प्रक्रीयेप्रमाणेच आहे. आता वरचे कोर्टही राहुल गांधींना माफी मागायचा पर्याय देईल. ते तो निमूटपणे स्विकारतात का हे बघायचे. पण दरम्यानच्या काळात परत एकदा 'माफी मागायला मी सावरकर थोडीच आहे' हे त्यांनी बोलून घेतलेले आहे. तेव्हा परत माफी मागणे प्रशस्त दिसणार नाही हे पण तितकेच खरे. या प्रकरणी राहुल गांधींविरोधात खटला चालवून त्यांना शिक्षा करण्यापर्यंत आपला मुद्दा पूर्णेश मोदींनी सोडला नाही हे चांगले झाले. अन्यथा दुसर्‍या बाजूने वाटेल ते बोलायचे, तेवढ्यापुरता खटला दाखल करायचा पण तो पूर्णत्वाला न्यायचा नाही असे उजव्या गटाकडून अनेकदा झाले आहे. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लालकृष्ण अडवाणी कोईमतूरमध्ये भाषण करायला जाणार होते त्यापूर्वी तिथे बॉम्बस्फोट झाले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये रा.स्व.संघाचा हात आहे आणि त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे हे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी एकदा नाही तर दोनदा म्हणाले होते. संघाने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला पण तो असाच अर्ध्यात सोडला. केजरीवालांनाही अरूण जेटली आणि नितीन गडकरी या दोघांनीही असेच स्वस्तात सोडले. गांधीहत्येमध्ये रा.स्व.संघाचा हात होता असा आरोप राहुल गांधींनी भिवंडीच्या सभेत केला होता त्याविरोधातही तिथल्या कोणी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. त्याचे काय झाले माहित नाही. निदान एकदा तरी बेताल बडबडीबद्दल कोणालातरी असे अडचणीत पकडले हे चांगले झाले.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13294 views

🗣 चर्चा (57)
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 04/11/2023 - 10:05 नवीन
राजस्थानात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. त्या राज्याचा इतिहास पाहता बहुतेक वेळा सत्ताधारी राज्य सरकार विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत होते. त्यामुळे ही निवडणुक काँग्रेसने जिंकली तर आश्चर्य वाटेल. त्यात आता सचिन पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोतांवर नाराज आहेत आणि बंड करत आहेत अशा बातम्या आहेत. त्यांनी २०२० मध्ये लॉक डाऊन चालू असतानाही अशोक गेहलोतांविरोधात बंड केले होते पण ते बंड तेवढ्यापुरते शमले. आता निवडणुकीच्या तोंडावर परत बंड होत आहे असे दिसते. सचिन पायलटांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी अगदी कसून काम केले होते. २०१३ च्या विधानसभा आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा राजस्थानात धुव्वा उडाला. त्यानंतरच त्यांनी चार वर्षांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी काम सुरू केले. जानेवारी २०१८ मध्ये अजमेर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली होती. २०१४ मध्ये सचिन पायलट स्वतः तिथून पराभूत झाले होते. तेव्हा त्यांना ती निवडणुक लढविणे सहज शक्य होते. पण त्यांनी ती निवडणुक लढवली नाही तर अजमेर आणि अल्वर या दोन्ही जागा पक्षासाठी जिंकायच्याच या उद्देशाने तयारी केली आणि तसा प्रचारही केला. त्या दोन्ही जागा पक्षाने जिंकल्याही. त्यानंतर वसुंधराराजे सरकारविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा उठवून काँग्रेसने २०१८ ची विधानसभा निवडणुकही जिंकली. त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री केले जाईल अशी सचिन पायलटची अपेक्षा होती. पण राहुल गांधींनी राजस्थानात अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशात कमलनाथ या जुन्या नेत्यांनाच मुख्यमंत्री केले तर सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे या तरूण नेत्यांना डावलले. २०२० मध्ये सुरवातीला मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी बंड केले आणि कमलनाथांचे सरकार खाली खेचले. काही महिन्यांनंतर सचिन पायलट यांनी तोच प्रयोग राजस्थानात करायचा प्रयत्न केला पण ज्योतिरादित्यांप्रमाणे संख्याबळ त्यांच्यामागे नसल्याने तो प्रयोग फसला. तेवढ्यापुरते सचिन पायलट गप्प बसले पण नंतर कधीतरी ते बंडाचा झेंडा फडकावणार हे तेव्हाही दिसतच होते. ती वेळ आता येत आहे असे दिसते. एक गोष्ट कळत नाही. राहुल गांधी त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेत तीन साडेतीन हजार किलोमीटर्स चालले. त्यातून भारत कितपत जोडला गेला याची कल्पना नाही (जोडायला तुटलेला कधी होता हा पण प्रश्नच आहे म्हणा) पण काँग्रेसलाही नवसंजीवनी मिळाली अशी काहीही चिन्हे नाहीत. यात्रा पंजाबातून काश्मीरमध्ये जात असतानाच पंजाबमध्ये मनप्रितसिंग बादल पक्ष सोडून गेले. गेल्या २-३ दिवसात ए.के.अँटनींचे पुत्र अनील अँटनी सोडून गेले. चक्रवर्ती राजगोपालाचारींचे पणतू सी.आर.केसवन दोनेक महिन्यांपूर्वीच सोडून गेले होते. आता सचिन पायलट बंडाच्या पवित्र्यात आहेत. तेव्हा राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेस तरी जोडली गेली की नाही हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 04/11/2023 - 10:39 नवीन
मुंबई का अगला महापौर उत्तर भारतीय तय करेंगे : भाजप नेते कृपाशंकर सिंह
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 04/11/2023 - 15:28 नवीन
मुंबई का अगला महापौर उत्तर भारतीय तय करेंगे : भाजप नेते कृपाशंकर सिंह
मराठी माणसांची बाजु घेणारा कोणता पक्ष आहे? सगळे एका माळेचे मनी आहेत.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 04/12/2023 - 05:11 नवीन
दिल्लीचे मूल निवासी जाट, गुज्जर , बनिया रेगड समाजाने कधीही "मराठी मराठी" सारखे तुणतुणे वाजविले नाही. जेंव्हा प्रगति होते ती कधीच एका जातीची होत नाही. महागाई दर 12 टक्के हून 6 टक्के वर आली तर त्याच्या फायदा सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना झाला. बाकी दिल्लीत बांगलादेशी ( 20 टक्के (त्यात बांगलादेशी 10 टक्के ) थोक मते), उत्तर प्रदेश आणि बिहार . मुंबईत ही बांगलादेशी, उत्तर प्रदेश बिहार आणि दक्षिण भारतीय जास्त आहेत. बाकी मराठी आणि गुजराती किती टक्के मतदान करतात हा ही एक मोठा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 04/12/2023 - 09:14 नवीन
दिल्लीचे मूल निवासी जाट, गुज्जर , बनिया रेगड समाजाने कधीही "मराठी मराठी" सारखे तुणतुणे वाजविले नाही.
तरीही किती दिल्लीकर मुंबईला येतात आणि किती मुंबईकर दिल्लीला जातात ह्याची आकडेवारी येऊ द्यात. उत्तर भारतीयांची मुळ अडचण संख्येच्या जोरावर दांडगडगिरी करणे ही आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 04/12/2023 - 09:25 नवीन
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नावच नाही आहे. 2021 मधे सक्तवसुली संचालनालयाने या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीच्या विरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही. त्यामुळे आता याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 04/12/2023 - 16:01 नवीन
शोधा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा