ओटीटीला मराठीत ......
मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे. ओटीटी हा शब्द मनोरंजन विश्वात पावलो पावली वापरला जातो.
वृत्तपत्रे, मासिके, छापील माध्यमे तसेच आंतरजालीय विश्वात देखील ओटीटी या शब्दाने धुमाकूळ घातलेला आहे.
ओटीटी या शब्दाला योग्य मराठी शब्द अद्याप वाचण्यात ऐकण्यात आलेला नाहीय.
ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तरी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो.
तर, OTT ला खालील पैकी कोणता शब्द चपखल वाटतोय?
१. वरतून मंच
२. वरताण माहितीरंजन
३. उच्चरंजन मंच
अर्थात याचे लघुरूप म्हणून (काळाची गरज) वरतून, वरताण, उच्चरंजन असे शब्द आपण मराठीत रुळवू शकतो.
तुम्हाला दुसरा कुठला योग्य शब्द माहित असेल, सुचत असेल तर तो प्रतिसादात नक्की लिहा.
आंजावा
.... थोडे स्टायलिश म्हणायचे असेल तरआंजावाही
नभोवाहिनी
हे नाव उपयुक्त वाटते. छोटे आणि बोलला ही सौपे