Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

वार्तालाप : मनातील मूषक वृतीला दूर करा.

व
विवेकपटाईत
Mon, 03/20/2023 - 06:51
🗣 3 प्रतिसाद
अप त्यम् परिपन्थिनम् मुषीवाणम् हुरःचितम् । दूरम् अधि स्रुतेः अज॥ (ऋ.१/४२/३) आपल्या मनातील मूषक प्रवृती म्हणजे दुर्विचार. बिना कष्ट करता दुसर्‍यांच्या वस्तु हडपण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी कपट कारस्थान रचणे, दुसर्‍यांना धोका देणे, चोरी,डाका, रिश्वत घेऊन कार्य करणे, इत्यादि-इत्यादि. या ऋचेत ऋषि आपल्या मनातील मूषक वृतीला दूर करण्याची प्रार्थना परमेश्वराला करत आहे. आपल्याला माहीत आहे उंदीर सदा कुरतडत राहतो. तो शेतातील, घरातील अन्न-धान्य कागद, कपडे इत्यादि काहीही सोडत नाही. सर्व काही तो त्याच्या बिळात सतत एकत्र करत राहतो. दुसर्‍यांची संपती हडपण्याची त्याची हाव कधीच संपत नाही. परिणाम उंदीराचा शेवट पिंजर्‍यात होतो किंवा विषाक्त पदार्थ खाऊन तो मरतो. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात: नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे अति स्वार्थ बुद्धीन रे पाप सांचे. घडे भोगणे पाप तें कर्म खोटे न होतां मनासारिखें दु:ख मोठें. अति स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन सदा सर्वकाळ दुसर्‍यांच्या द्रव्याची अर्थात जे आपल्या कष्टाचे नाही, हाव धरण्याने पापांचा संचय होत राहतो. अखेर अश्या खोट्या कर्मांचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि मनाला त्याचे मोठे दु:ख होते. आजकाल संपूर्ण समाज या मूषक वृतीने ग्रसित आहे. काही काम न करता वीज, पाणी, जेवण सर्व फुकट पाहिजे ही मनोवृती समाजात बळावत आहे. व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. परिणाम स्वरूप या खोट्या कर्मांचे फळ समस्त समाजाला भोगावे लागेल. भूक, अराजकता आणि हिंसेने जनता त्रस्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही स्वत:ची आणि समाजाच्या मूषक प्रवृतीला आळा घालण्याची गरज आहे. असो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1876 views

🗣 चर्चा (3)
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 03/20/2023 - 11:17 नवीन
व्होट बँक साठी यु हिट बुल्स आय!! आम्ही सगळे भाऊ भाऊ, आम्ही सगळे मिळुन खाऊ!! रच्याकने----शेतकर्‍यांचे सरकार- हा पण असाच एक पॉप्युलर जार्गन आहे व्होट बँक साठी
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 03/25/2023 - 06:46 नवीन
छान लग.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/29/2023 - 12:13 नवीन
> व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. इथे राजनेता मंडळींची चूक नाही. जनता आधीपासूनच मूषक वृत्तीची आहेत. फुकटे, आळशी आणि मिळेल ते ओरबाडायचे हि संस्कृतीच आहे. माझे ते माझे आणि दुसऱ्याचे ते सुद्धा शक्य झाल्यास माझे अशी प्रवृत्ती आधीपासूनच जनतेची आहे. राजकारणी मंडळी फक्त त्याचा फायदा घेतात. > देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. बहुसंख्य भारतीय सरकारी नोकरीच्या मागे का लागले आहेत ? हेच कारण आहे. फुकटे !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा