Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सध्या मी काय पाहतोय ? भाग ११

म
मदनबाण
Fri, 03/10/2023 - 17:34
🗣 59 प्रतिसाद
माझ्या आयुष्यातील छोटासा भाग चाळीत गेला आहे, त्यामुळेच चाळी बद्धलची आत्मियता अजुनही मनात कुठेतरी घर करुन आहे. गिरगाव मध्ये गेलो तर तिथल्या एका चाळीत आजही जाणे होते.चाळीचा अनुभव, तिथली माणुसकी, तिथला लोकांचा असलेला मनमोकळेपणा हे एक वेगळच जगं आहे. चाळ हा असा अनुभव आहे जो शब्दात देखील व्यक्त करणे मला कठीण आहे.मला चाळ संस्कृतीचा बालपणी आनंद मिळाला याचा मला अधिकचा विशेष आनंद आहे. गच्चीत जाऊन आराम खुर्चीत बसुन निरभ्र आकाश बघण्याचा जो आनंद मला तिथे मिळाला होता, तसाच तो आनंद मला परत कधीच मिळाला नाही... जशी सवड मिळेल तशी या भागात भर घालत राहीन, आपणही आपली भर जरुर टाका. :)

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21220 views

🗣 चर्चा (59)
B
Bhakti Tue, 03/26/2024 - 17:29 नवीन
भ्रमयुगम्.. मल्याळम हिंदी डब्ड पाहिला.काल पौर्णिमा त्यात रात्री १२ वाजेपर्यंत दातखीळ बसू पर्यंत हा थोडासा भयपट सिनेमा पाहिला.तुंबाडची आठवण आली,पण तुंबाड इतका भारी नाहीये.पूर्णपणे कृष्णधवल असल्याने जास्त भयकारक वाटतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/30/2024 - 05:44 नवीन
आर्या चा शेवटचा सिझन पाहुन ही वेब सिरीज एकदाची पाहुन संपवली ! होय, संपवली कारण ती पाहण्याचा रस उरलाच नव्हता ! प्रार्थना बेहेरेचा मस्का पाहिला... म्हणजे तीची प्रमुख भुमिका असलेला मस्का चित्रपट ! कथा चांगली वाटली, या चित्रपटाचा दुसरा भाग अजुन आला नाहीये याचे नवल वाटले ! THREE THOUSAND YEARS OF LONGING हा जरा वेगळा चित्रपट पाहिला ! कथा ज्या प्रमाणे उलघडुन सांगितली आहे ते आवडले, विशेष म्हणजे या चित्रपटातील संवाद मला आवडले ! एखाद दुसरे नग्न दृष्य आहे ते सोडुन चित्रपट ठीक ठाक वाटला. चक्क Pulp Fiction पाहिला ! [ डाऊनलोड मारुन बराच काळ पडुन होता, पाहु की नको या विचारात बराच काळ दुर्लक्ष करुन पडीक ठेवला होता.] The Dictator बद्धल खूप ऐकलेले होते, तो देखील पाहिला. माझी लईच फेव्हरेट असलेल्या नित्या मेननची Kumari Srimathi ही वेब सिरीज पाहिली ! :) अगदी गोंडस हापूस हो ! :))) वेब सिरीज ठीक-ठाक आहे, हापूस च्या आपलं Kumari Srimathi च्या पुढच्या सिझनची वाट पाहणे आले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 04/10/2024 - 08:31 नवीन
बात पते की एकटेपणाची समस्या . . . त्यावर शोधलेली युक्ती आणि आलेले अनुभव . . . सुरेख शेवट !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 04/16/2024 - 16:18 नवीन
सापळा सुंदर मराठी रहस्यपट + भयपट समीर धर्माधिकारी आणि चिन्मय मांडलेकर यांची जुगलबंदी उत्तम !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/28/2024 - 05:59 नवीन
Of human bondage (१९२४) सॉमरसेट मॉम यांच्या “ऑफ ह्यूमन बाँडेज” या साडेसहाशे पानांच्या बृहदकादंबरीवर आधारित. 1980 च्या दशकात मी ही कादंबरी संपूर्ण वाचली होती. ती आत्मचरित्रात्मक आहे. तिचा आवाका खूप मोठा असून तो एक तास वीस मिनिटाच्या चित्रपटात बसवणे तसे अवघडच होते. तरी पण त्या कालानुरूप एकंदरीत ठीक वाटला. Bette Davis या गाजलेल्या अभिनेत्रींनी त्यात नायकाच्या प्रेयसीची भूमिका केली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/22/2025 - 11:16 नवीन
या मधल्या काळात बरंच काही कंटेट पाहुन झाले, सवड झाल्यास त्यावर बहुतेक लिहीन. बर्‍याच वेब सिरीज मधुन माझ्या टकुर्‍यात अजुन जे नाव लक्षात राहीले ते म्हणजे: Renegade Nell जालावर वाचन करताना कुठुन तरी मला या वेब सीरीज बद्धल समजले आणि मी ही वेब सिरीज पहायचे ठरवले. याला मुख्य कारण म्हणजे ॲक्शन आणि फँटसीने भरलेली ही ब्रिटीश वेब सिरीज आहे. कथा18व्या शतकातील इंग्लंडमध्ये घडते, जिथे नेल जॅक्सन नावाची धाडसी आणि हुशार स्त्री खोट्या आरोपांमुळे देशातील एक कुख्यात गुन्हेगार बनते. जादुई शक्ती असलेल्या "बिली ब्लाइंड" नावाच्या आत्म्याच्या मदतीने तिचे जीवन बदलते आणि ती आपले खरे भविष्य शोधण्याचा प्रयत्न करते. यातली मुख्य भूमिका [ नेल जॅक्सन ] साकारणार्‍या लुईसा हारलंड या आयरिश अभिनेत्री चा अभिनय मला फार आवडला. जुना काळ उभारणे व त्या काळातील वेशभूषा पहायला मिळणे याचा अनुभव फार कमी वेब सिरीज मध्ये घेता येतो, जो अनुभवण्यात मला अधिकचा रस होता. १ सिजन झाल्यावर डिस्ने ने बहुतेक पुढे काही करण्याचे रद्द केले आहे, परंतु अधुन मधुन सिजीन २ बद्धल चर्चा पहावयास मिळते. जर हा दुसरा सिझन आलाच तर मी तो नक्की पाहिन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सुंदरी... :- Sanju Rathod Ft. Yashika Jatav | G-Spark |
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/13/2025 - 06:03 नवीन
बर्‍याच काळाने एक हलका-फुलका छान मराठी चित्रपट पाहिला. घरतांच्या कोकणातील वाड्यात साजरा होणारा उत्त्सव, त्यांच्या पिढीतील नातवाची दिल्लीवाली गर्लग्फ्रेंड बरोबर गणपतीच्या काळातच तिथे त्यांच्या घरी पोहचते व तिथे गणपती उत्सवाच्या संपूर्ण काळात राहण्याच्या उद्देशाने तिथे आलेली असते, तिचा अर्थातच दुसरा उद्देश देखील असतोच. संपूर्ण कुटंबाने एकत्रपणे पहावा असा हा चित्रपट आहे. निकीता दत्ता ने क्रिती अहुजा या नावाने दिल्लीवाली गर्लफ्रेंड साकारली आहे. ती साडीत अगदम मस्का खारी दिसते ! :) काम छान केले आहे. घरत गणपती - Official Trailer

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/19/2025 - 13:56 नवीन
हिंदोळा लघुपट https://youtu.be/tFqBzt8VFJw?si=LA-G18Y77jYxFuUd शुभांगी गोखले ,ऋषी देशपांडे. मैत्रीचे नाते वय वाढले तरी म्हातारे होत नाही !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/20/2025 - 06:19 नवीन
आवेषम या चित्रपटाचे Odimaga हे गाणं कुठुनतरी माझ्या पाहण्यात आलं होतं आणि त्यावेळीच मी हा चित्रपट पहायचे ठरवले होते. आवेषम ही २०२४ चा मल्याळम चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन जितू माधवन याने केले आहे. तीन मित्र अजू, बिबी आणि शांतन बंगलोरमध्ये अभियांत्रिकी अभ्यासासाठी येतात आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांशी भांडणात पडतात. ते स्थानिक गुंडा रंगाने मदत मागतात, जो त्यांना मारहाण करून शिकवण देतो पण नंतर त्यांचा मित्र बनतो. रंगाच्या मदतीने ते सिनियर्सला धडा शिकवतात, पण नंतर रंगाचा खरा चेहरा उघडतो. शेवटी मित्र रंगाला सोडतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात. आवेषम चित्रपटातील मुख्य पात्रं ही तीन मित्र आणि गुंड रंगावर केंद्रित आहेत. फहाद फसील रंग याने रंगा (रंजीत गंगाधरन) शक्तिशाली गुंड्याची भूमिका अगदी जबरदस्त साकारली आहे आणि त्याच्या गाण्यातली त्याची मनमोकळ्या स्टाईल ने मला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेरित केले. टाईमपास म्हणुन हा चित्रपट पाहण्यास हरकत नाही.काहींना चित्रपट तितकासा आवडणार नाही, कारण बर्‍यापैकी एकसुरी चित्रपट आहे. याच चित्रपटाचे Illuminati हे गाणं देखील हिट झालेले आहे. आजच्या स्वाक्षरीत दिलेल्या गाण्याने आता माझ्या मनाचा ठाव घेतला असुन त्यामुळे Officer On Duty पहावा का? या विचारात सध्या आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Neon Ride | Officer On Duty |
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा