Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारतीय आकाशात अवतरला अजस्त्र पक्षी

प
पराग१२२६३
Wed, 02/22/2023 - 19:19
🗣 2 प्रतिसाद
B-1B अलीकडेच बेंगळुरूजवळच्या यलहंका हवाईतळावर पार पडलेल्या Aero India 2023 हवाई प्रदर्शनात अमेरिकेच्या बी-1बी या व्यूहात्मक बाँबफेकी (Strategic Bomber) विमानांनी अचानक लावलेली हजेरी आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या एफ-35 लाटनिंग-2 या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी त्यात घेतलेला सहभाग या विशेष लक्षवेधक घटना ठरल्या. याच प्रदर्शनात रशियाच्या United Aircraft Corporation नं असं जाहीर केलं की, या कंपनीनं आपल्या नव्या Tu-160M या व्यूहात्मक बाँबफेकी विमानाचे नामांतर तेरेश्कोव्हा/Tereshkova (रशियन नाव – Tерешкова, रशियन उच्चार – तिरिष्कोवा) असं केलं आहे. ही विमानं मात्र एअरो इंडियामध्ये सहभागी झाली नव्हती. बी-1बी आणि टीयू-160एम या विमानांचा समावेश जगातील प्रमुख Strategic Bombers मध्ये होतो. सध्या रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांकडे अशी विमानं आहेत. बदलत्या सुरक्षाविषयक परिस्थितीत भारतही आता अशी विमानं हवाईदलात सामील करण्याच्या विचारात आहे. एअरो इंडियात सहभागी होण्यासाठी बी-1बी लान्सर या स्वनातीत अवजड बाँबफेकी (supersonic heavy strategic bomber) विमानांनी प्रशांत महासागरातील गुआममधील अमेरिकन हवाईदलाच्या अँडरसन तळावरून उड्डाण केलं होतं. गेल्या एअरो इंडियामध्येही हे विमान सहभागी झालं होतं. अमेरिकेच्या महावाणिज्यदुताच्या मते, भारताबरोबरच्या अमेरिकेच्या वाढत्या व्यूहात्मक भागीदारीचं (strategic partnership) महत्व या विमानानं या प्रदर्शनात पुन्हा एकदा सहभागी होऊन अधोरेखित केलं आहे. अमेरिकेच्या हवाईदलात असलेलं बी-1बी हे आधीच्या बी-1 विमानाची सुधारित आवृत्ती आहे. हे आकार आणि वहन क्षमतेच्या दृष्टीनं जगातील सर्वात मोठं लढाऊ विमान आहे. बी-1बी हे विमान पारंपारिक शस्त्रास्त्रं मोठ्या प्रमाणात वाहून नेऊ शकतं. रडारच्या नजरेपासून लांब राहू शकणारे हे विमान उंचावरून उडत असताना 1.25 मॅकचा वेग (ताशी सुमारे 1325 किमी) गाठू शकते. हे विमान त्यावरील शस्त्रास्त्रं, इंधन यांसह जास्तीत जास्त 216 टन वजन घेऊन उडू शकते. रशियन मिग-31 वरच्या रडारच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी बी-1बीवरच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. बी-1 विमानाच्या विकासाचा कार्यक्रम 1982 मध्ये सुरू झाला होता. ऑगस्ट 2019 मध्ये बी-1बीमध्ये सुधारणा करून त्याची शस्त्रास्त्रवहन क्षमता वाढवली गेली. त्यामुळं आता या विमानातून 2300 किलो वजनाची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रंही वाहून नेता येऊ शकतात. हे विमान अण्वस्त्र हल्ल्यासाठीही उपयोगी ठरतं. अमेरिकन हवाईदलासाठी नवीन व्यूहात्मक बाँबफेकी विमानांचा – B-21 – विकास केला जात आहे. ते विमान हवाईदलात सामील झाल्यानंतर बी-1बी आणि आधीच्या B-52 Stratofortress विमानांना हळुहळू सेवानिवृत्त केलं जाणार आहे. 18 फेब्रुवारी 2023 ला उत्तर कोरियानं डागलेलं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Inter-continental Ballistic Missile) जपानच्या सागरी क्षेत्रात पडलं होतं. उत्तर कोरियाच्या त्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनं तातडीनं जपान आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलांसोबत संयुक्त सराव केला. त्यामध्ये बी-1बी विमानं सामील झालेली होती. उत्तर कोरियानं काही आगळीक करण्याचा प्रयत्न केलाच, तर अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांकडून त्याला किती तातडीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं, हे दर्शवण्यासाठी हे सराव केले गेले होते. तेरेष्कोवा/टीयू-160एम (TU-16M) टीयू-160एम हे विमान रशियन एअरोस्पेस फोर्सेसकडं नुकतंच सुपूर्द करण्यात आलं आहे. आधीच्या टीयू-160 विमानाचं अत्याधुनिकीकरण करून ही आवृत्ती विकसित करण्यात आलेली आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यात येत असून टीयू-160एम2 ही नवी आवृत्तीही काही वर्षांमध्ये रशियन एअरोस्पेस फोर्सेसमध्ये सामील होणार आहे. टीयू-160एम हे जगाच्या लष्करी वैमानिकी इतिहासातील सर्वात मोठं, सर्वात वजनदार, स्वनातीत विमान आहे. व्हॅलेंटिना तेरेष्कोवा (रशियन भाषेतील नाव – Валентина Терешкова/वल्येंचिना तिरिष्कोवा) या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. त्यांचे नाव या विमानाला देण्यात आलं आहे. हे विमान रशियन एअरोस्पेस फोर्सेसच्या दीर्घपल्ल्याच्या बाँबफेकी ताफ्याचा आधार असणार आहे. लिन्क https://avateebhavatee.blogspot.com/2023/02/blog-post_22.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2126 views

🗣 चर्चा (2)
स
स्वराजित Tue, 02/28/2023 - 08:14 नवीन
खुप छान महिती.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 03/01/2023 - 13:33 नवीन
खुप छान महिती.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा