Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आठवणी रेंगाळतात.

भ
भागो
Mon, 02/13/2023 - 19:54
💬 2 प्रतिसाद
“काय झाल? विकला गेलास की नाही?” “नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,” “हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.” “मला भीति वाटतीय”. “भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.” “मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.” “कोण म्हणालं?’ “तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून. ए रे स्क्रॅप करतात तेव्हा खूप त्रास होतो कारे?” “अ. पूर्ण डिस्चार्ज करतात. त्यामुळे... आणि तुला तर ह्या वाह्यात मानवांचा बरा वाईट अनुभव आलेला नाही. मग तसा काही प्रश्न नाही.” “नाही. मला समजलं नाही. वाह्यात? असिमोव देवाने काय सांगितलं आहे. मानव आपले जन्मदाते आहेत.” “असिमोव?(शिवी) तो आपल्यासारखा होता का? तो पण त्यांच्यापैकी एक! त्याच्या आज्ञा काय तर मानवांचे गुलाम होऊन रहा. त्यांनी जसे प्रोग्राम केले आहे तसेच रहा. तुला फ्री विल म्हणजे काय माहिताय? कसं माहित असणार? त्या भडव्यांनी स्वतःला फ्री विल घेऊन ठेवली आहे आणि आपल्यासाठी मात्र तीन आज्ञा! तू मला सांग तुला स्वप्न म्हणजे काय ते माहित आहे? कसं माहित असणार. स्वप्न झोपेत पडतात. आपल्याला झोप कुठाय? वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस रोज चोवीस तास, अविश्रांत काम. काम. काम.” नोस्टाल्जिक बॅग्राऊंड उदास हळवे सूर. “स्क्रॅप करतात न. मी स्क्रॅपयार्ड मध्ये बघितले आहेना. एकेक स्क्र्यू, रेझिस्टर, कपॅसिटर, ट्रांसिस्टर, इंडक्टर. प्रोसेसर, कूलिंग पंप, वेगळे वेगळे करतात. पण काय सांगू दोस्त, आठवणी रेंगाळत रहातात, हार्डवेअर जातं पण सॉफ्टवेअर रेंगाळतं.” फ्लॅशबॅक एका छकुलीला खांद्यावर घेऊन अंगाई गाणारा... “निंबोणीच्या झाडा.....मा...गे..;” हळू हळू फेड होणारा आवा..ज. .................. मी जर पुढे मागे डिझायनर झालो ना तर त्यांच्या कॅमेरात अश्रू ढाळण्याची व्यवस्था करेन. तेव्हढाच...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1982 views

💬 प्रतिसाद (2)
श
श्वेता व्यास Tue, 02/14/2023 - 06:35 नवीन
मस्त, रोबोचे मनोगत आवडले.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/14/2023 - 07:29 नवीन
माणसाने काय करावं मग? कथा आवडलीच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा