Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काहीतरी सलत असतं...

D — Deepak Pawar, गुरुवार, 02/02/2023 - 11:25
काहीतरी सलत असतं आपणास मात्र कळत नसतं कुणाच्यातरी आठवणीने मन आतल्याआत जळत असतं होवून कधी बेभान झुलत असतो फुलासारखं आपण सुध्दा फुलत असतो कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं. असं कसं कुणावरही आपण प्रेम करुन बसतो पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं अन् आपण आयुष्यावर रुसतो ती आपल्याला झिडकारते किंवा तो आपल्याला झिडकारतो कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं. दीपक पवार. https://youtu.be/vsStJxhSSDU

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2366 views

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त गुरुवार, 02/02/2023 - 12:01 नवीन
आवडली कविता. एक प्रकारचा निरागस भाव आहे, तो खासच. "पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं ... अन् आपण आयुष्यावर रुसतो" हे असं केलं तर कसं वाटेल ? -- -- पण त्याचं आपल्याकडे लक्षच नसतं ... मग आपण आयुष्यावर रुसतो...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/02/2023 - 15:34 नवीन
छान प्रयत्न. आवडली.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 17:37 नवीन
का कोणास ठाउक, पण पाड्गावकरांच्या या कवितेची आठवण झाली https://www.linespeaks.com/2020/09/Mangesh-padgaonkar-marathi-kavita-me-tila-vicharal.html
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 02/03/2023 - 03:00 नवीन
अफलातून कविता आहे. राजेंद्र भौ लि॔कबद्दल धन्यवाद. दिपक भौ तरल लिहीता. पण खरंच का एवढं आयुष्य तरल असतयं. अन् आपण आयुष्यावर रुसतो म्हणतात आयुष्य एक प्रवास असतो जाणारा क्षण पुन्हा येत नसतो आयुष्यावर रूसून काही उपयोग नसतो कारण तिच्या लेखी आपण कुणीच नसतो
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Fri, 02/03/2023 - 05:24 नवीन
चित्रगुप्त सर, अत्रुप्त आत्मा सर, राजेंद्र मेहेंदळे सर, कर्नलतपस्वी सर आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. चित्रगुप्त सर आपण सांगीतल्या प्रमाणे बदल करतो.
  • Log in or register to post comments
भ
भागो Mon, 02/13/2023 - 07:27 नवीन
छान हुरहूर लावणारी. युट्युब पण छान आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/13/2023 - 13:03 नवीन
प्रेम हे असंच असतं, दुर दुर पळतं सारखं सारखं खुणावत, एक दिवस अदृष्य होतं आपल्याशी काहीतरी जोडत आणि आपल्यातलं काही खोडत. मस्त सुरेख कविता, दीपक पवार !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा