Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

च — चित्रगुप्त, Wed, 02/01/2023 - 21:13

अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी
सहज फिरायला निघालो होतो
सहज मंजे मुद्दामच …
– मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे
– घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो.
नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले

– मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते.
कोs हं ? … मी कोण आहे ?
मै कौन हूँ ? व्हू आयाम ?

सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे.
या साडेचार फुटी कुडीत अडकलेला -
अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे
मी निर्विकार चेतना आहे
मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे
मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे
मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.
मी अनंत आकाश आहे
मी देहबुद्धीच्या पार - नात्यागोत्यांच्या पार -
भौतिकतेच्या पार – मी केवळ परम चैतन्य आहे.

परम सत्याच्या शोधात निघालेला -
मी एक अविचल साधक आहे.
अंतिम ज्ञानाशी संग करायला निघालेला -
मी एक नि:संग यात्रिक आहे.
भरकटलेल्या मानवाला मार्ग दाखवणारा -
मी एक पथ - प्रदीप, एक दीपस्तंभ -
मी एक निर्भीक, निर्भीड ज्वालामुखी आहे…

– तेवढ्यात कसल्यातरी आवाजाने तंद्री तुटली.
भडक मेकप वगैरे केलेल्या दोन तीन तरुण पोरी
– माझ्याचकडे बघत खिदळत होत्या.
अहाहा … यालाच म्हणतात धुंद सोनेरी सायंकाळ.

अशा धुंद सोनेरी सायंकाळीच
– चिरंतन सत्य उमगतं.
अशा धुंद सोनेरी सायंकाळीच
– जीवात्मा आणि परमात्म्याचं मीलन होतं …
अशा धुंद सोनेरी सायंकाळीच ….

फाssड …
फाssड …

“कौन है बे तू ?
कब से देख रिया हूँ , साले कुछ भी बकेला है..
क्या नाम है बे तेरा ?

“मी … मी… सखाराम गटणे …

“शाम के टेम अंधेरे मे किधर जा रहेला है बे ? “
बेवडा है क्या ? या पागल है ?
ये आपुन का एरिया है –
आपुन का धंदे का टेम हो गया है अब -
दफा हो जा ह्यां से, नै तो इधरिच डाल देगा तेरे को. समझा क्या ?”

– धावतच सुटलो. कसाबसा घरी पोचलो.
– हॅट साला, कुणाला कसली कदरच नाही.
– शांतपणे कसला विचार करू म्हटलं, तर ते नाही… असो.

– तर अशी ही आजची धुंद सोनेरी सायंकाळ.


  • Log in or register to post comments
  • 4334 views


वाचनखूण लावा
| 4334 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 07:07 नवीन
कै च्या कै कविता!! एकदम मनोरंजक. मिपावर हॅश टॅग# एक धुंद सोनेरी/गुलाबी ,सकाळ्/संध्याकाळ सुरु झालाय की काय असे वाटुन गेले क्षणभर. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? यावरुन पुलंच्या "आयाम द हु इन द यु इन द यु" (असामी असामी बहुतेक) ची आठवण झाली. बाकी ते तळ्याकाठी "तशा" मुली भेटतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 02/02/2023 - 07:52 नवीन
तळे तळे पे डिपेंड है बॉस. आपुन ने ऐसा तळा देखेला है. वैसे ये थोडी आपुनकीबी ष्टोरी है. आर आर आबा ने बंबईसे बारबाला लोगोंको भगाया था तब आपुन के गाव मे भी वो छोरियां आ गई थी. तब तळे पे होता था ये झमेला.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 02/02/2023 - 07:33 नवीन
अशाच एका कातरवेळी ती मी आणी तळ्याचा किनारा निरव शांतता अन सुगंधित वारा ओ शाब, काय लाज शोरम बिरोम गुरखा दणादण शिट्ट्या वाजवीत होता.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar गुरुवार, 02/02/2023 - 11:21 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 02/02/2023 - 12:36 नवीन
मजा आली वाचताना. सत्याची खोजचा शेवट असाच काही होतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/06/2023 - 03:16 नवीन
एकदम मनोरंजक !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/06/2023 - 18:16 नवीन
आम्ही पण अशा चार दोन थपडा खाल्या आहेत, पण सत्य शोधायचा कंड काही शमतच नाही पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 04/08/2023 - 05:32 नवीन
एकदम मनोरंजक.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 29 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 41 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 43 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 45 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 49 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा