Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

आणि बाकी शून्य...

प — प्राची अश्विनी, Wed, 02/01/2023 - 06:52

तुझा फोन आला ना की,
चेह-यावर molar to molar हसू उमटतं..
हातातलं काम तिथंच थांबवत मी तव्याखालचा विस्तव विझवते.
केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखते.
मग फोन घेऊन मी कोलाहलापासून दूर बाल्कनीच्या कोप-यात जाते.
आणि रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणते.
सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून तू पटकन कामाकडे वळतोस.
माझं हसू तीन चतुर्थांश होतं..
ते बोलणं पण म्हणता म्हणता संपून जातं.
आता हसू बरोब्बर निम्मं...
मग तू म्हणतोस, "बाकी काय म्हणतेस?"
आवडलेली कविता, नावडलेलं गाणं..
पाहिलेली वाट, तुझं न येणं..
दाटलेला हुंदका, तुला न कळणं...
माझे वेडे हट्ट, तुझं शहाणं वागणं...
बाकी किती नी काय काय असतं.
पण फोनमधून ऐकू येतो reverse horn चा, गाडी पार्क केल्याचा वगैरे आवाज.
तुझ्या आवाजातली आवराआवर पण ओळखू येतेच की मला.
"बाकी काही नाही, ठीक." म्हणून मी गुपचूप फोन ठेवते.
हसू आता डायरेक्ट मायनस मध्ये पोचलेलं असतं.
..
आणि इथं बाकी असतो पोळपाटावर अर्धवट लाटलेला शून्य ....


  • Log in or register to post comments
  • 2849 views


वाचनखूण लावा
| 2849 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Wed, 02/01/2023 - 08:10 नवीन
आवडलीच! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/01/2023 - 16:31 नवीन
झकास...! आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 02/02/2023 - 12:30 नवीन
कविता अनेकदा वाचली. बाकी स्त्रियांच्या मनातले भाव कळणे अशक्यच. काही शंका. मनावर घेऊ नका. तू पटकन कामाकडे वळतोस नवरा कार्यालयात आहे reverse horn चा, गाडी पार्क केल्याचा वगैरे आवाज घरी पोहचला ?? नवरा घरी आल्यावर हसू माइनस मध्ये. (36 वर्षांचा अनुभव)(/सौला वाचनाची आवड नाही, बिनधास्त लिहू शकतो) अर्धवट लटलेला शून्य म्हणजे पोळी. बहुतेक आज नवरा घरी जेवणार...
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/02/2023 - 15:05 नवीन
मला नाही वाटत की हे नवर्‍याबद्दल आहे! ;-)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/03/2023 - 05:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 18:10 नवीन
माझे ईंटरप्रिटेशन नवरा परगावी/परदेशात आहे. बायको ईथे झुरते आहे. नवराही झुरत असेलच, पण तो जास्त प्रॅक्टीकल आहे/ईमोशनल कोशंट कमी आहे. बायको फोनसाठी काम थांबवुन आलेय, नवरा मात्र कामासाठी फोन थांबवायला बघतोय. थोडक्यात काय "मेन्स ऑन मार्स, वुमेन ऑन व्हीनस"
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 02/02/2023 - 22:08 नवीन
आता मंडळी आपापल्या कल्पनेच्या पोळ्या लाटतच आहेत, तर आम्ही सुद्धा एक पोळी लाटतो: यातला 'तो' म्हणजे सायबांचा डायवर आहे, आणि मेमसाबच्या कीचनात पोळ्या लाटणारी 'ती' त्याची एकतर्फी 'सजणी' आहे. दुपारी काम आटोपल्यावर ती सगळ्या मालिका, पिच्चर वगैरे बघत असल्यानं - 'molar to molar हसू' - केसांची बट मागे सारत स्वतःला उगा आरशात निरखणं - रिंग थांबायच्या जssस्ट आधी हॅलो म्हणणं - आवडलेली कविता - नावडलेलं गाणं - पाहिलेली वाट - त्याचं न येणं - दाटलेला हुंदका - त्याला न कळणं - वेडे हट्ट .... वगैरे - मालिका आणि पिच्चरात दाखवतात तसं - 'किती नी काय काय' - ते सगळं आपणही करावं, हे तिचं स्वप्न आहे. साहेब आणि मेमसाब दोघांना त्यांच्या हापिसात गाडीतून सोडून येताना तिला फोन करून - सुरवातीची औपचारिक चौकशी आटपून - मेमसाबनं तिला आठवणीनं करून ठेवायला सांगितलेल्या कामांबद्दल 'तो' तिला निरोप देतो आहे. निरोप सांगून झाल्यावर तो बेसमेंटमधे गाडी पार्क करून, बाकीच्या डायवरांबरोबर पत्ते कुटत, तंबाखू चोळत बसणार, हे तिला ठाऊक आहे. शेवटी 'मायनस मधे पोचलेलं हसू' आवरून ती पुन्हा पोळ्या लाटायला आलेली आहे. बिचारी. (बॅकग्राउंडला "तेरा जाना, दिल के अरमानों का लुट जाना" गाणं वाजतं आहे). Image removed.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 02/03/2023 - 07:50 नवीन
अनेक वर्षांनी हे गाणे पुन्हा पुर्ण ऐकले. काळजाचे पाणी पाणी झाले.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 02/03/2023 - 12:44 नवीन
प्रतिसाद वाचून उगाच शोभा गुर्टू यांच्या बैठकीच्या लावणीची आठवण झाली. पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा बाकी कल्पनाविलास सत्य असेल असे वाटत नाही. फोन जरी त्याचा असला तरी गाडीचा रिव्हर्स हाॅरन ओळखीचा वाटत नसल्याने उरले सुरले हसू गायबलेले दिसते. धिरे धिरे मचल ऐ दिले बेकार कोई आता है -अनुपमा मालकीण किंवा सखू कोणीही असो, दोन रात्रीतला आता संपला वेडेपणा वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा विमान हळुहळू खाली उतरते. बाकी Men are the men असे कहीसे म्हणतात म्हणे. कविता प्रतिसाद सह आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 02/03/2023 - 05:03 नवीन
अरारारा . कवितेचा बाजार उठवला की.:) अजून version पण येऊद्यात .
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 02/03/2023 - 13:43 नवीन
वाह :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा