Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

लिही रे कधीतरी...

प — प्राची अश्विनी, Tue, 01/24/2023 - 06:43

लिही रे कधीतरी.
काहीही, अगदी काहीssही चालेल.
पत्र, कविता, दोनोळीची चिठ्ठी पण पळेल.
पण कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे.
शब्दांवर बोट अस्संss फिरवता आलं पाहिजे.
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन,
वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन.
अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप..
मात्रेवर चढताना लागेल धाप..
खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन,
काय बरं लिहाताना अडखळलं पेन?
पण "माझ्यासाठी" लिहिलंस! हे खासंखास
जणू प्रत्यक्ष भेटीचाच होईल भास.
....म्हणूनच म्हटलं, लिही की रे कधीतरी....


  • Log in or register to post comments
  • 8863 views


वाचनखूण लावा
| 8863 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Tue, 01/24/2023 - 06:56 नवीन
कविता आवडली. एकतरी ओळ अशी लिहावी शहाणी' हे उगीचच आठवले. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 01/24/2023 - 07:01 नवीन
संदीप खरेय :)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 01/24/2023 - 08:07 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 01/24/2023 - 08:10 नवीन
खरंच!! सध्याच्या ऑनलाईन जमान्यात माणसाचा माणसाशी संबंधच संपत चालला आहे की काय असे वाटते. पुर्वी कसे, पत्र आले की माणुसच भेटल्याचा आनंद व्हायचा. त्यामुळे कविता भावली मनाला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/25/2023 - 13:08 नवीन
मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 01/24/2023 - 09:00 नवीन
क्या बात!सुपर्ब!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/24/2023 - 09:45 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Tue, 01/24/2023 - 09:54 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Tue, 01/24/2023 - 17:41 नवीन
खूप सुंदर. >>खोडलेलं अक्षर पाहून विचारात पडेन, काय बरं लिहाताना अडखळलं पेन? हे फार आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/25/2023 - 13:07 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/24/2023 - 19:07 नवीन
अत्यंत आवडले. हाताने लिहीण्याची बातच न्यारी. आता दुर्मिळ होत चालेली ही गोष्ट पुन्हा नव्याने सुरु करायला हवी. कुणास ठाऊक, पुढे भविष्यात कधीतरी निव्वळ ते हस्तलिखित आहेत, एवढ्याच कारणाने सुद्धा फाटक्या तुटक्या कोणत्याही कागदाच्या तुकड्यांचे लिलाव 'सॉदबीज' वगैरे करतील आणि मोठमोठ्या संग्रहालयांमधे जतन करून ठेवले गेलेले ते तुकडे तेंव्हाचे लोक अश्चर्याने बघतील. "उदाहरणार्थ त्या काळी लोक हाताने 'शाई' नामक पदार्थ वापरून लिहीत वगैरे असत ... आता कुणी विचारेल की 'शाई' म्हणजे काय, तर सध्या यावर संशोधन सुरु आहे... 'कोसला'
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/25/2023 - 13:07 नवीन
हे आठवत नाहीये. कोसला वाचून कैक वर्षे झाली. पुन्हा वाचली पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 01/25/2023 - 07:46 नवीन
लिही की रे कधीतरी.... लिहिणाऱ्या ने लिहीत जावे वाचकाने प्रतिसादत जावे लिहीणे वाचणे अदान प्रदान भावनांच्या कुस्तीचे जणू मैदान आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Wed, 01/25/2023 - 09:54 नवीन
कधीतरी...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/29/2023 - 06:42 नवीन
गुरुजींचा प्रतिसाद वाचल्यावर तुमचा प्रतिसाद समजला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/25/2023 - 13:09 नवीन
सगळ्यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/25/2023 - 14:57 नवीन
हात आणि पेनने लिहिणारी मला वाटतं ही आपलीच पिढी अखेरची. पत्रं लिहिण्यातली मजा इथून पुढच्या लोकांना माहितीच नाही होणार :(
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/29/2023 - 06:46 नवीन
खरंय. मागे Netflix वर Her नावाचा पिक्चर पाहिला होता. त्यातल्या भविष्यकाळातल्या नायकाचा पत्र लिहायचा job असतो. आजोबांना, प्रेयसीला इ. Orderप्रमाणे पत्र लिहायची. ते आठवलं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/26/2023 - 11:36 नवीन
''कागदावरच्या शाईला हुंगता आलं पाहिजे'' क्लास. आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/26/2023 - 13:22 नवीन
रे कधीतरी
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/26/2023 - 13:23 नवीन
लिहिलं बरं "रे कधीतरी".
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/26/2023 - 13:25 नवीन
कविता छान आहे. कोणीतरी लिहिलेले पत्र घरी येऊन ७-८ वर्षे तरी झाली असावी.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 01/28/2023 - 19:31 नवीन
प्राचीताई तुमच्या कवितेत इंदिरा संत यांच्यासारखी नजाकत आणि हळूवारपणा आहे. कृपया लिहीत रहा. कधीतरी नाही ....नेहमीच.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/29/2023 - 06:47 नवीन
खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/02/2023 - 15:37 नवीन
मस्स्स्स्स्स्त! बोलले मन .. श्ब्दान्चे धन साठलेले अजर्व, खुले पान
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 02/07/2023 - 06:16 नवीन
धन्यवाद अ.आ.!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 02/27/2023 - 17:27 नवीन
मग कान्याच्या मागे खांब खांब खेळेन, वेलांटीच्या तळ्यात डुबकी मारेन. अनुस्वाराच्या डोक्यावर हलकी थाप.. मात्रेवर चढताना लागेल धाप..
अवघड आहे असं सुचणं! _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा