Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विसरु नकोस नाते

स — सागरसाथी, Sun, 01/22/2023 - 09:49
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5907 views

💬 प्रतिसाद
ह
हेमंतकुमार Tue, 01/31/2023 - 04:38 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 02/02/2023 - 07:18 नवीन
तू सांगीतले ते, सर्व लक्षात आहे. उगाच कवडसे मनाचे दवडू नकोस बाई.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 02/02/2023 - 07:19 नवीन
तू सांगीतले ते, सर्व लक्षात आहे. उगा कवडसे मनाचे दवडू नकोस बाई.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 02/02/2023 - 12:18 नवीन
वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. कविता आवडली
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/02/2023 - 15:30 नवीन
छान लिहिलेत! आवडले. लयीत बसण्यासाठी किंचित बदल करावासा वाटला - नात्यास नाव अपुल्या देवू नकोस काही, स्वप्नातील गाव, इतके, व्यापू नकोस बाई. / स्वप्नामधील गावा व्यापू नकोस बाई. दरवळला सुगंध वाऱ्यावरी कधीचा, श्वासास दोष इतका, देवू नकोस बाई. माझेच वागणे जर होता कधी निराळे, विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. तुझाच रंग लेवून मी रंगलो कधीचा, विसरुन स्वप्न नाजुक, जावू नकोस बाई.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/02/2023 - 18:01 नवीन
मीटर मधे बसायला असे करता येईल का? नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही "स्वप्नात गाव" इतके व्यापू नकोस बाई. "वार्‍यावरी सुगंध" हा पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल वागणे जे माझे जगा विरुद्ध "खोडुनी विचार" माझे काढू नकोस बाई. मिसळून रंग "तू"झा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न "हळवे" जावू नकोस बाई.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/02/2023 - 21:17 नवीन
हेही छान आहे! आवडले! :-)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/29/2023 - 17:22 नवीन
+1
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sat, 07/29/2023 - 15:54 नवीन
सर्वांचे आभार, वृत, लय शिकण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन नक्की उपयोगी ठरेल.
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sat, 07/29/2023 - 15:54 नवीन
सर्वांचे आभार, वृत, लय शिकण्यासाठी तुमच्या मार्गदर्शन नक्की उपयोगी ठरेल.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 07/29/2023 - 17:21 नवीन
कल्पना व शब्दसंपदा चांगली वाटली. गेयतेकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र सूचना करतो
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sun, 07/30/2023 - 09:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 07/30/2023 - 07:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Sun, 07/30/2023 - 09:53 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 07/30/2023 - 11:14 नवीन
कविता लयीत व मीटरमध्ये बसत नसल्याने तसेच गेय नसल्याने विरस झाला. मुळात अशी कविता कवी लीहूच कशी शकतो हा प्रश्न पडला. शेवटी "तूम तो ठेहरे परदेसी" ची चाल लावून पाहिली. ती लागली आणि मी कवीला माफ केले. पुढच्या वेळी कवीने काथ्याकुट सदरात धागा काढून लय, मीटर आणि गेयता वगैरे गोष्टींच्या विषयी सूचना मागवून त्यानुसार कविता लिहावे असे मी कवीला सुचवतो.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 07/30/2023 - 13:15 नवीन
"नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही." असे काही आम्ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात कॉलेजात असताना बरळायचो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा