Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काय होते अंतरी...

D — Deepak Pawar, Fri, 01/06/2023 - 04:45
पाहुनी हसताच तू काय होते अंतरी बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी. चांदण्यांचे तेज गाली या फुलांची ओठी लाली तू बटांना कुरवाळता बघ हवेची झुळूक आली वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी. चाहुलीनं या तुझ्या बघ पान पान बहरतं दव भिजले गवत तव पावलानं बिलगतं गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2918 views

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त Sun, 01/08/2023 - 16:03 नवीन
बावरा जीव, चांदणे, ओठांची लाली, बटा कुरवाळणे, हवेची झुळूक, केस वार्‍यावर सोडणे, तिची चाहूल, पाने बहरणे, दवांनी ओले झालेले गवत, बिलगणे, गंध तनुचा वगैरे वर्णनातून "कुच कुच होता है" एवढे समजले. या निमित्ताने आठवलेले लता-मुकेश यांनी गायलेले, जी.एस. कोहली यांच्या संगीताने नटलेले १९६५ चे हे सुंदर गीत ऐका - https://www.youtube.com/watch?v=g6U4GmmnMpw
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 18:13 नवीन
"कुच कुच होता है" एवढे समजले.
चित्र पाहिजे होतं यावर एखादं भारी...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 01/09/2023 - 19:19 नवीन
कुछ कुछ होता है =))) कुच ह्या शब्दाचा मराठीत अर्थ वेगळा आहे ;) बरेच दिवसांनी उत्तम विनोद पाहिला , बेक्कर हसतोय =))))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/08/2023 - 18:09 नवीन
चाहुलीनं या तुझ्या बघ पान पान बहरतं
आवडली कविता. मला प्रेम कविता आवडतात, म्हणून ही कविताही आवडली. लिहिते राहा....! ख्वाहिशें कुछ कुछ यू भी अधूरी रही. पहले उम्र नही थी , अब उम्र नही रही. -दिलीप बिरुटे (इश्क मे डूबा ) ;)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/09/2023 - 03:56 नवीन
मस्त दिपक भौ, शायर नसिर काजमी जी की एक गझल याद आयी, दिल में इक लहर सी उठी है अभी कोई ताज़ा हवा चली है अभी गुलाम अली जी की बेहतरीन आवाजाने इसे चार चांद लगाये है l https://youtu.be/VoAlBP16mG8 बाकी कवीता वाचताना खालील शब्द अपसुकच आले. तुझ्या येण्यानं सखू काळीज माझं धडधडतयं तुझ्या पिरतीच पांखरू मनात बघ कसं फडफडतयं
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Mon, 01/09/2023 - 11:52 नवीन
चित्रगुप्त सर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, कर्नलतपस्वी आपले मनःपूर्वक धन्यवाद. चित्रगुप्त सर आपण लिंक दिलेले गाणे ऐकले खूप छान आहे. कर्नलतपस्वी सर आपण लिंक दिलेली गजल सुद्धा ऐकली छान आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर आपण नेहमीच प्रोत्साहन देता त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा