Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

श
शशिकांत ओक
Sun, 12/18/2022 - 07:19
🗣 73 प्रतिसाद
मिपाकरांच्या माहितीसाठी अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे.. ब्राइट्स सोसायटी सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024 P M: ९१-२२-२५३७ ७३९६ 103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स ठाणे (w)-100602, भारत

राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे

स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004 तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022 वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6

परिषदेचे वेळापत्रक: सकाळचे सत्र 9:00-9:30- चहा आणि नाश्ता 9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे भाषणे 10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS) 10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक). 11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर) १२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार 1:00-2:00 लंच ब्रेक 2:00-5:00 दुपारचे सत्र ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी 2:00-2:30 Speech by Aniket Sule 2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम) निमंत्रक: समीर शिंदे 2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार 3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA 5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश 5:30 पुढे चहा आणि नाश्ता टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.

आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17220 views

🗣 चर्चा (73)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 07:35 नवीन
शुभेच्छा. आजच्याच लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोकरंग पुरवणीत 'असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठं ? लेख आहे. वाचकांनी आनंद घ्यावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 04:44 नवीन
असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? लेख आहे अत्यंत पक्षपाती, एकतर्फी व असत्यकथन करणारा हा आहे. उदाहरणार्थ ही वाक्ये - धर्मप्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत. कोणत्या देवाचे? हिंदू, बौद्ध, शीख, जैन या धर्मातील एकाही देवाने असा आदेश दिलेला नाही. फक्त एकाच पंथातील तथाकथित देवाने हा आदेश दिलाय. मग सरसकटीकरण का? नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही. हास्यास्पद दावा. चीन, कोरिया, बल्गेरिया, रूमेनिया अश्या साम्यवादी देशातील नास्तिक सत्ताधाऱ्यांनी किती कोटी माणसे मारली याची मोजदादच नाही. नास्तिक चळवळीतल्या एका आघाडीच्या दिवंगत नेत्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युची कहाणी जनता विसरलेली नाही. जसे सर्वच आस्तिक पापभीरू, मवाळ असे नसतात तसेच सर्व नास्तिकही बिचारे मवाळ पापभीरू नसतात. खरं तर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बऱ्याचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो? नास्तिक सुद्धा आग्रही असतात. एका कार्यक्रमात तर पाहुण्यांनी साधे दीपप्रज्वलन केले म्हणून नास्तिकांनी टीका केली होती. पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेने कोणत्या तरी समारंभापूर्वी सत्यनारायण पूजा करणार असे सांगितल्यानंतर ना. ग. गोरे व काही इतर नास्तिकांनी आंदोलन वगैरे केले होते. कोणत्याही सरकारी कार्यक्रमात किंवा मंत्री वगैरे असलेल्या कार्यक्रमात एखाद्या भगवा वेषधारी असला किंवा काही पूजा वगैरे धार्मिक कृत्य केले की लगेच यांचा विरोध असतो. आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजलं आहे, सर्व ज्ञान झालं आहे,’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेलं नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे? कोणते आस्तिक मला सर्व समजले आहे असा दावा करतात? नास्तिकांना नीतिमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतिमूल्ये सद्सद्विवेकातून आणि कायद्यातून येतात. अत्यंत हास्यास्पद दावे. चतुर्थी किंवा अश्याच एखाद्या दिवशी मुद्दाम गोमांस चेपणारे, मद्यप्राशन करणारे नास्तिक आहेत. नास्तिकता हा दुराचार अशी मांडणी हिंदू धर्मात तरी नाही. धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात. स्वतः अनुभव घ्या असे हिंदूधर्म सांगतो. खरं तर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’ आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार? तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी! तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 12/19/2022 - 06:11 नवीन
@श्रीगुरुजी, १००% सहमती
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 12/20/2022 - 05:16 नवीन
उभयपक्षांनी आपापली क्षेत्रं राखावीत असं ठरलं तरी प्रत्यक्षात धर्मशास्त्र आपली मर्यादा सोडून सतत सृष्टीची रीती (पाप वाढल्याने कोविड आला), नीती (गरोदरपणी ग्रहण पाळावे) वगैरेबाबत चोंबडेपणा करत असते श्रीगुरूजी बरोबर सहमत आहे. लेखक व लेख दोन्ही एकांगी वाटतात डाॅ सुबोध खरे यांच्या मतांशी सहमत आहे. नास्तिक काय किवां अस्तीक दोघेही आपापली मते मांडताना हिन्दु धरूमा व्यतिरिक्त इतर धर्मा बद्दल बोलतच नाहीत अथवा संभाळून बोलतात. दोन्ही विचारधारा आपापला पंथ वाढवण्यासाठी प्रयत्नशील ,त्यामुळेच राजकीय पक्षां प्रमाणेच यांना जनाधार. काही कट्टर तर काही दलबदलू. काही मध्यमार्गीय.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/20/2022 - 10:04 नवीन
गर्भवतीने ग्रहण पाळावे असे धर्मशास्त्र सांगते? ग्रहण सगळ्यांनीच पाळावे, सगळ्यांनी 6 तास पाळावे, गर्भवतीने 3 तास पाळण्याची मुभा आहे असे माझे अल्प ज्ञान सांगते. हिंदू धर्मशास्त्राने सगळ्या शरीर कष्टाच्या उपासनेमधून बाल, वृद्ध, गर्भार आणि आजारी लोकांना सवलत दिलेली आहे. लोकांच्या अज्ञानातून एखादी घटना घडते आणि मीडियाच्या गोंधळात आपण सरसकट धर्माला नाव ठेवून मोकळे होतो
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 12/21/2022 - 12:01 नवीन
'भाव तेथे देव' असे म्हणतात. नास्तिक्य हा अभावाला पकडून ठेवण्याचा निर्णय असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः. असो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 12/23/2022 - 08:21 नवीन
आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार? तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी! तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात! १००%
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 08:33 नवीन
प्रसन्न जोशी, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही नावे पाहूनच ह्या परिषदेचा अजेंडा काय असेल ह्याची पुरेशी कल्पना येते.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 12/18/2022 - 10:09 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/18/2022 - 10:14 नवीन
अलका धुपकर, यनावाला, अजित अभ्यंकर हे सुद्धा आहेत. या परीषदेस राष्ट्रीय नास्तिक परीषद याऐवजी "राष्ट्रीय निधर्मांध परीषद" असे नाव चपखल ठरेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 10:48 नवीन
यनावाला यांबद्दल आदर आहे, कुणी वंदा अथवा निंदा, आपली नास्तिकमते ते ठामपणे मांडत असतात, बाकी उल्लेखित लोक मात्र जाम दांभिक आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 07:06 नवीन
यना वालावलकर आपलंही पहिलं प्रेम. सनातनी आणि पारंपरिक डोळ्यावर झापड़ लावलेल्या बुजगावण्यांचे प्रबोधन करण्याचे काम त्यांनी कायम केले. अर्थात या क्षेत्रातील सर्वच मंडळीबद्दल मला कायम आदर आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यश राज Sun, 12/18/2022 - 10:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 12/19/2022 - 06:06 नवीन
+ १०० नास्तिक आणि लिब्रान्डु किंवा निधर्मांध यात मूलभूत फरक आहे. नास्तिक असण्याबद्दल आक्षेप नाही. पण आम्हीच सर्वात जास्त विज्ञानवादी किंवा सुधारणावादी असा दंभ घेऊन हि मंडळी वावरत असतात. याशिवाय सर्वात भेकड आणि दांभिक अशी हि जमात आहे. हिंदू बौद्ध जैन अशा चालीरीतींवर टीका करताना हे सर्वात पुढे असतात पण मुसलमानाना काही बोलायचे तर यांची बोबडी वळते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 12/23/2022 - 08:25 नवीन
सुबोध खरे .... १००% अगदी अगदी ... हेच हेच बरेच माझ्यसारखे जवळ जवळ धर्मान्ध्ते पासुन दूर असणारे हिंदू म्हणत आहेत ... पण सरसकट असा काही बोलले कि संघोटे आणि मनुवादी असे बिरुद चिकटवले जाते
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 12/19/2022 - 06:57 नवीन
अगदी हेच लिहायला आलो होतो. टंकनश्रम वाचले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/19/2022 - 02:19 नवीन
फक्त मतं उराशी बाळगून चालत नाही. आस्तिकांच्या मोठ्या सैन्याला एकट्याने भिडायचं असतं. या परिषदेच्या वक्त्यांनी त्यांच्या जीवनातील स्वतःवरचे प्रसंग सांगावेत. फक्त मतं नकोत. यावर चर्चा पुण्यातल्या चौका चौकांत होत असतील. सात फुलांवर होतात का माहिती नाही.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 12/19/2022 - 03:23 नवीन
राष्ट्रीय नास्तिक परिषद ह्याचे उर्दू मध्ये भाषांतर करुन त्याची प्रसिध्दी केले तर काय होईल?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 07:00 नवीन
धाग्यावरील प्रतिसाद वाचल्यावर 'नास्तिक परिषद' योग्य मार्गावर चालली आहे, असे वाटले. परिषदेला अजुन फार काम करावे लागेल असे दिसते. आधुनिक विचार, विज्ञाननिष्ठा, बाळगणे आणि तो विचार नव्या पिढीला देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. बाकी, २०१४ नंतर तर 'ही' बजबजपूरी फार वाढलेली दिसते, असे माझे व्यक्तिगत निरीक्षण आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 07:17 नवीन
या परीषदेत सहभागी होणाऱ्यांची नामावळी पाहिल्यानंतर या परीषदेचा खरा दुष्हेतू काय हे लक्षात आले होते. या परीषदेच्या समर्थकांचे प्रतिसाद वाचल्यानंतर याची खातरीच जाहली. फक्त एकच मुद्दा पटला नाही. या तथाकथित नास्तिक भोंदूंची बजबजपुरी २०१४ पूर्वी सुद्धा अशीच होती. लोकमत बदलण्यासाठी या परीषदेला खूपच परीश्रम करावे लागणार आहेत कारण जनता या भोंदूंना पूर्ण ओळखून आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/19/2022 - 07:47 नवीन
विरोधक परिषदेत जाऊन विरोध करणार की. इथेच पाट्या टाकण्यात धन्यता मानणार हे लौकरच कळेल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 08:29 नवीन
समर्थक, परीषदेत जाऊन समर्थक करणार का इथेच पाट्या टाकण्यात धन्यता मानणार, हे लौकरच कळेल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/19/2022 - 19:29 नवीन
नास्तिक समर्थकांचाच मेळावा आहे हो.. त्यापैकी कोणी इथे का पाट्या टाकेल ? त्यांचा व्यासपीठ आहे की त्यांना
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 19:31 नवीन
येथेसुद्धा नास्तिक समर्थक आहेत की आणि ते येथे पाट्या टाकताहेत की. आपल्या व्यासपीठावर जाऊन बरळण्याऐवजी येथे ते का पाट्या टाकत आहेत?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 12/19/2022 - 12:12 नवीन
भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित माझं निरीक्षणाधारित मत - १. भारतीय धर्म (सनातनी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत इ) धारण करणारे आस्तिक हे त्यांचं आस्तिक्य इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते त्यांच्या आस्तिक्यचे नास्तिकांपुढे प्रदर्शन करत नाहीत. नास्तिकांना ते आस्तिक बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. नास्तिकांना आंधळे, गतानुगतिक, अंधश्रद्ध, बुजगावणे, डोळ्यांवर झापड लावलेले, बजबजपुरीवासी अशी किंवा अश्या प्रकारची इतर नकारार्थी विशेषणे लावत नाहीत. त्यांना "सुधारण्याचा" प्रयत्न करत नाहीत. सदर आस्तिकांचे आस्तिक्य हे व्यक्तिगत असते. त्यांच्या चर्चांमध्ये त्यांचे पूज्य स्थान हा विषय असतो. आणि तो कुणावर लादण्याचा प्रयत्न होत नाही. खरंतर, त्यांच्यालेखी नास्तिक्य हे, नास्तिकांवर चर्चा करावी, इतके दखलपात्र नसते. भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित सदर आस्तिक्य हे अंगिकारलेले असते. आस्तिक परिषद असे काही कुणी कुठे ऐकलेले / पाहिलेले आहे का? --- २. भारतीय नास्तिक्य हे आस्तिक्याच्या आधारावर अस्तित्वात असते. त्यांच्या चर्चांमध्ये इतरांचे आस्तिक्य हाच विषय असतो. आणि स्वतःचे नास्तिक्य इतरांवर लादण्याचा प्रयत्न होत असतो. आस्तिकांची मानहानी करणे, त्यांना न्यूनगंड देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांची अवमानकारक हेटाळणी करणे हीच त्यांची साध्य आणि साधने असतात. --- मागच्या आठ-नऊ वर्षांत वरील क्र २ च्या परिस्थिती काही सकारात्मक फरक पडेल असे वाटले होते. भारतीय धर्मीय आस्तिकांना सन्मानाने शिल्लक राहता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटले होते. पण तसे काही झालेले अजून तरी आढळून आलेले नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 15:06 नवीन
पूर्ण सहयत! या परीषदेसाठी राष्ट्रीय दांभिक परीषद, राष्ट्रीय भोंदू परीषद, राष्ट्रीय ढोंगी परीषद यापैकी एक नाव सुयोग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 12/19/2022 - 13:58 नवीन
नास्तिकांना ते आस्तिक बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात. घरात एक व्यक्ती जरी आस्तिक असेल तर श्रावणात घरातील इतर नास्तिक व्यक्तींना घरात मांसाहार करू देत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 12/19/2022 - 15:00 नवीन
हो, पण श्रावणात हॉटेल मधून मांस गायब करत नाहीत. अरब देशातल्या रमजान सारखे.. तिथे म्हणे रमजान मध्ये दुपारी जेवणच मिळत नाही हॉटेलात.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 12/19/2022 - 17:06 नवीन
हो, पण श्रावणात हॉटेल मधून मांस गायब करत नाहीत एखादे वाक्य उचलून काहीही पर्याय सुचवणे सोडा, बाकीच्या प्रतिसादांचा संदर्भ समजून घेण्याची तसदी घ्या.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 12/20/2022 - 07:46 नवीन
तुमचा प्रतिसाद दोन वाक्यांचा. त्यातलं एक उचललं तर 'एखादं' होत का? काहीही
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 15:12 नवीन
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात. हो का? मग राष्ट्रीय नास्तिक परीषद, देवाला रिटायर करा या शीर्षकाचे अनेक परिसंवाद, यनावालांनी मिपावर पाडलेले डझनभर लेख व नंतर त्या लेखांचे पुस्तक, लोकसत्तात वाचकांच्या पत्रात लिहिलेली पत्र . . . विषय संपविण्यासाठी होते का? हे प्रकार मॉर्निंग वॉकलाच करायचे का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 12/19/2022 - 17:11 नवीन
तुम्ही नका लोड घेऊ.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 17:31 नवीन
निरूत्तर करणारा प्रतिसाद मिळाला की अशी निरर्थक वाक्ये सुचतात. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 12/19/2022 - 17:56 नवीन
निरर्थक प्रतिसादांना निरुत्तर करण्यासाठी हीच वाक्ये योग्य आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 12/19/2022 - 19:02 नवीन
निरर्थक ! ! ! तुमचा नॉटी संजय राऊत झालाय. ख्या ख्या ख्या . . . मविआचा फुसका महामोर्चा प्रत्यक्षात अतिप्रचंड होता अशी पुडी सोडण्यासाठी नॉटीने महामोर्चाच्या नावाने ६ वर्षांपूर्वीच्या मराठा मोर्चाचे फोटो टाकले आणि ही थाप उघडकीला आल्यानंतरही नॉटी नाक वर करून थापेबाजीचे समर्थन करीत होता. नास्तिकांची महती वर्णन करताना, ते आस्तिकांना जास्त समजविण्याच्या भानगडीत न पडता लगेच विषय संपवून टाकतात ही लोणकढी थाप मी लगेच ३-४ उदाहरणे देऊन उघडकीस पाडली. तरीसुद्धा या प्रतिसादाला निरर्थक प्रतिसाद म्हणणे हे, पडलो तरी नाक वर या नॉटी प्रवृत्तीचे अवलक्षण आहे. असो. हलकेच घ्या आणि विनाकारण लोड घेऊ नका, कारण नास्तिक कधीही सुधारणार नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 12/20/2022 - 03:07 नवीन
नास्तिकांची महती वर्णन करताना, ते आस्तिकांना जास्त समजविण्याच्या भानगडीत न पडता लगेच विषय संपवून टाकतात ही लोणकढी थाप मी लगेच ३-४ उदाहरणे देऊन उघडकीस पाडली. हे राम! म्हणूनच मी निरर्थक प्रतिसाद म्हटले होते. मी ठळक केलेल्या वाक्याचा संदर्भ तुम्हाला कळालच नाही. ज्याला कळला तो गप्प बसून आहे ,तुम्ही उगाच चोंबडेपणा करून स्वतःचे हसू करून घेतले, असो. नका लोड घेऊ.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 12/20/2022 - 03:19 नवीन
बापरे, तोंडावर आपटून व हसू होऊनही अजूनही नॉटीपणा सुरूच आहे. आता मूळ नॉटी सुद्धा लाजेल. चालायचंच. नॉटीपणा असला की तोंडावर आपटूनही जितं मया असा जयघोष करावाच लागतो. नॉटी असल्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. चालू दे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 12/19/2022 - 18:44 नवीन
या सभेत कोण काय बोलले? किती सदस्य जमले होते? पुढील काळात अस्तिकांना कसे नास्तिक करायला हवे? नास्तिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाय योजना काय करावी? लेख, मासिके, चर्चा, पुरस्कार परती, या शिवाय इतर जालिम उपाय करायला सामाजिक माध्यमातून भोळसट, मती भ्रम होऊ शकणारे शोधून त्यांना आपल्या बाजूला वळवाचे प्रयत्न कसे करता येतील? यावर चर्चा सत्रे करायला पैशाची तजवीज कशी करायची? नव्या विदेशी एनजीओ कडून अर्थिक मदतीवर बंदी घालण्यात आली तर त्याला कोर्टातून कसा लढा द्यायला हवा? वगैरे विचार मांडले होते का? ते समजून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/21/2022 - 07:25 नवीन
नास्तिक परिषदेविषयी आपली उत्सुकता पाहून आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे काही प्रश्न विचारले त्यावर चर्च झाली की नाही ते माहिती नाही पण आपले प्रश्न बिंदुगामी नक्की आहेत, यात काही वाद नाही. त्यावर सविस्तर कधीतरी एक विवेकवादी म्हणून कधीतरी त्यावर बोलता येईल. सध्या नास्तिक परिषद वृत्तांत. संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही. संविधानात भारतीयत्वाच्या सांस्कृतिक सौंदर्याच्या खुणा आहेत. श्रद्धा जोपासण्याचे स्वातंत्र्य जसे व्यक्तिगत हक्कांचा भाग आहे, तसेच स्वतःला अमान्य असणाऱ्या श्रद्धा नाकारण्याचे स्वातंत्र्यही मान्य झाले पाहिजे. नास्तिक ईश्वरावर, धर्मावर सतत टीका करत असले तरी धर्मचिकित्सा मात्र तितके गंभीरपणे करतांना दिसत नाही. बहुतेक धर्मांधांचा धार्मिक अभिनिवेश हा त्यांना त्यांच्या धर्माच्या असलेल्या अज्ञानातून येतो. गंभीर धर्मचिकित्सा केल्यास धर्मातील परस्पर विसंगती पुढे आणता येतात. नास्तिक स्वतः धर्मापासून मुक्त होऊ शकत असले, तरी आजूबाजूच्या समाजासाठी ते नेहमीच शक्य नसते. अशावेळी गांधी, विनोबा यांचा मार्ग किंवा वारकरी परंपरा हेदेखील सुधारणावादी प्रवाहच आहेत हे लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे- डॉ.विश्वंभर चौधरी. कट्टरवादी हिंदूंनी, कट्टर मुस्लिमांनी व इतर कट्टर धर्मियांनी धर्मपालनाला कर्मकांडाशी जोडले आणि कर्मकांडांच्या दिखाऊपणाला राजकारणाशी जोडून धर्मतिरेक वाढवला. देव-धर्म कलुषित करून निर्बुध्दता जोपासली. विचार केला, तर जीवनात शुद्धता आणणे अजूनही शक्य आहे. साधनेचे सात्विकिकरण करण्यातून सुबुद्धता येईल आणि तेव्हाच इतरांच्या मतांचा आदर करण्याची परंपरा तयार होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन जरी मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे तरी वागणुकीच्या पातळीवर आणल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय समाजाच्या कायदेशीर जबाबदारीचा भाग होणार नाही. धार्मिक भावना दुखावल्या या कारणाखाली दाखल होणारे अनेक गुन्हे खोटे असतात व पोलिसांनाच न्यायाधीश होऊ देणारी प्रक्रिया बंद झाली पाहिजे. संविधानातील कलम २५(१)नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देव ही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मत स्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. अलका धुपकर यांनी लोकशाहीला आणि विवेकाला धर्मांध संघटनांचा कसा विरोध आहे याबद्दल मत मांडले. पत्रकार प्रसन्न जोशी यानी नास्तिकांनी इतर समाजघटकांशी संवाद वाढवण्याबद्दल मार्दर्शन केले. पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषण काठमांडूहून आलेले ‘ह्यूमनिस्ट्स् इंटरनॅशनल’चे उत्तम निरौला यांनी केले. विचारवंत आणि विवेकवादी लोकांना होणाऱ्या त्रासाविरोधात जागतिक पातळीवर आवाज उठवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित श्रोते यांच्यात चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली. प्रामुख्याने शास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांनी सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. ब्राईट्स संघटना काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राइटस् सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. ( वृत्तसौजन्य लोकसत्ता) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/21/2022 - 14:01 नवीन
भारतीय घटनेतील कलम २५(१) मूलभूत तत्व काय आहे पहा त्यांना सरोदे महाशयांनी काय वळण दिलंय ते पहा. संविधानातील कलम २५(१)नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देव ही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मत स्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल

Article 25 Constitution of India -

(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion. (2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law— (a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice; (b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus. Explanation I.—The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion. Explanation II.—In sub-clause (b) of clause (2), the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly. येथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे स्वा . सावरकरांचे अजरामर वाक्य नेहमी आठवते. देवी सरस्वतीचे नग्न चित्र काढण्याबद्दल दातखीळ बसून गप्प असणारे निधर्मांध मात्र प्रेषित महंमदाच्या चित्र काढणाऱ्या चार्ल्स हेब्दोवर टीका करताना किंवा याच घटनेतील "४४ वे तत्व" सरकारने समान नागरी कायदा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे "The State shall endeavour to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India.हे मात्र विसरतात. आपण दुटप्पी आहोत हे सोयीस्कररीत्या विसरतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 12/23/2022 - 08:18 नवीन
या बद्दल दोन वेगळे मुद्दे डोक्यात येतात १) अंधश्रद्धा निर्मूलन ( सर्व देश आणि धर्म यातील ) २) नास्तिकतेचा हट्ट यातील १) ला माझा तर कट्टर पाठिंबा आहे पण २) बद्दल मात्र शंका आहे .. कारण त्यामागे काहीतरी अजेंडा असल्यासारखं वाटतो .. आणि अर्थातच सध्याच्या भारतात अश्या विचारमंथनावाचा दुरुपयोग केलं जाणार हे उघड आहे टोकाची विधाने टोकाचा विरोध आणि पाठिंबा ..... अशा परिषदांमध्ये जे नास्तिक नाहीत त्यांना बोलाया बोलवतात का? नसतील तर मग सगळेच एकतर्फी दिसतंय असो .. ज्या दिवशी अनिस सारखी संनस्था ज्या ताकदीने हिंदू धर्मातील वाईट प्रथांना "एक्सपोस" करेल त्याच ताकदीने इतर धर्मातील वाईट प्रथांना "एक्सपोस" करेल तेव्हाच ते खरे कार्य करणारे असे मी तरी मानतो. तो पर्यंत फक्त एका धर्मावर निशाणा साधणारे एकांगी असेच वाटत राहणार ताकदीने हे अधोरेखित करू इच्छितो .... आवडो ना आवडो भारतापासून ते कॅथॉलिक पगडा असलेले आयर्लंड/ मेक्सिको किंवा फिलिपीं , ते गन आणि गॉड वळला अमेरिका येथे धार्मिकतेचा पगडा आहे हे "कट्टर नास्तिकानी " समजवून घेतलं पाहिजे त्याचा बरोबर आस्तिकांनी अप्पपल्या धर्मातील अन्धश्रद्धा आणि त्यातून होणारी पिळवणूक यावर स्वतःचा कार्य केले तर अनिस ची गरजच राहणार नाही
  • Log in or register to post comments
श
श्रिपाद पणशिकर Mon, 12/19/2022 - 21:23 नवीन
हे बरय राव, म्हणजे धागारुपी काडी घालुन इथे झुंजी तुम्हि लावायच्या अन वरतुन झुंजणार्या कोंबड्यांनाच विचारायचे त्या परीषदे बद्द्लचे अपडेट्स. इधर ऐसाईच कोइ होने का बाबा आदम के जमाने में अबी नाम नयी याद आरे ला हय लेकिन वो बी ऐसाइच काडी वाला धागा डाल के भाग जात था. काय ते जुने मिपा काय त्या जुन्या आठवणि
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/20/2022 - 05:53 नवीन
कोणीतरी नास्तिक माणसाने किंवा अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी त्यांच्या नाडीपट्टीवर पाय दिला असावा. कोणीतरी परस्पर हिशेब चुकते करावे म्हणून त्यांनी नाडी सोडली, सॉरी काडी टाकली असावी असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 12/20/2022 - 05:17 नवीन
मनुवादी आणि भाजप विरोधी परिषद हे नाव दिले असते तरी चालले असते. चुकीचे नाव देऊन खर्‍या नास्तिकांचा अपमान करणे उचित नाही. (अर्थात चार्वाक आणि माल्या यांच्या मार्गावर चालणारे)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/20/2022 - 14:03 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/20/2022 - 14:07 नवीन
https://brightssociety.org/
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 12/22/2022 - 05:13 नवीन
झाकीर नाईकच्या एका युटुब विडिओ मध्ये एका नास्तिकाने झाकीर नायकाला नेहेमीसारखे काहीतरी बाळबोध प्रशन विचारला होता. झा.ना ने त्याला विचारले कि तू कुठल्या धर्माचा वगैरे आहे. प्रश्नकर्त्याने ऐटीत उत्तर दिले कि मी नास्तिक आहे. पुढे झा.ना ने चतुर उत्तर दिले. म्हणजे तुम्ही अर्धे मुस्लीम अगोदरच आहात आता पूर्ण मुस्लीम व्हा. कसे? मुस्लीम प्रार्थनेच्या पूर्वार्धानुसार.. जगात कुठलाही देव नाही... हा भाग तुम्हाला लागु होतो उत्तरार्धानुसार... त्या एका अल्लाशिवाय... हा भाग आत्मसात केला कि झालाकी मुस्लीम. ह्या परिषदे मागचा अजेंडा सुध्दा असाच काहीसा वाटतो. ह्या परिषदेचे हिंदुधर्माव्यतिरिक्त असे किती सदस्य असावेत. कारण विठ्ठलाला काळतोंड्या म्हणणार्याला सुध्दा हिंदु समाजाने वाळीत टाकल्याचे ऐकिवात नाही. जग्गी वासुदेवांच्या म्हणण्यानुसार एका हिंदु घरात वेगवेगळ्या देवांना पूजणारे व नास्तिक असणारे सदस्य असतात व ते नेहेमीसारखेच राहतात.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 12/22/2022 - 05:31 नवीन
माझे अनेक अहिंदू मित्र घरातील अन्य सदस्य आस्तिक असूनही नास्तिक आहेत आणि त्यातील काही अनिसचे कार्यकर्ते आहेत. ह्यातील बरेच अविवाहित आहेत, कारण ..... माहीतच असेल इथल्या अस्तिकांना.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/22/2022 - 08:51 नवीन
हिंदु धर्माने नास्तिकतेला दर्शनाचा दर्जा देउन केव्हाच धर्माचा भाग बनवून पचवून टाकले आहे
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/23/2022 - 10:32 नवीन
परफेक्ट.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा