Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

दे दवांचे प्याले

च — चांदणे संदीप, Wed, 12/14/2022 - 10:13

कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले

जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले

माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले

भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले

घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले

- संदीप चांदणे


  • Log in or register to post comments
  • 2366 views


वाचनखूण लावा
| 2366 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Wed, 12/14/2022 - 19:09 नवीन
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले भावनांचं जबरदस्त शब्दांकन!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/14/2022 - 19:33 नवीन
मग? इतकी सुरेख कविता लिहिली म्हणून रुपाली ने काय बक्षीस दिले? ता.क. :-चारचौघात न सांगता येण्यासारखे बक्षीस मिळाले असेल तर व्यनी किंवा कायाप्पा वर संदेश पाठवा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 12/15/2022 - 06:24 नवीन
इतक्या छान कवीतेनंतर "रूपाली",मधे रूपाली बरोबर एक डेट तो बनती है भाई. @सं.चा. कवीता आवडली यात शंकाच नाही. कवीतेचा अकृतीबंध सुरेश भट यांच्या गझले सारखा तर रूप पैठणी नेसून नखशिखांत सोन्याने मढलेल्या घरंदाज स्त्री सारखा वाटतो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/15/2022 - 01:16 नवीन
एकदम जबरदस्त संदीपशेठ.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 12/15/2022 - 13:39 नवीन
आवडलीये कविता संदीपशेठ! बढिया है!! :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 12/29/2022 - 04:14 नवीन
आवडलीच !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 12/29/2022 - 07:31 नवीन
कविता आवडली. अवांतरः मला नेहमी प्रश्न पडतो, की अलिकडल्या काही वर्षांपासून मराठीत 'राहिलेले' 'वाचलेले' साठलेले' 'माळलेले' 'गोठलेले' ..... असे 'ले'कारांत शब्द अनुक्रमे ' राहिले होते' 'वाचले होते' 'साठले होते' ... या अर्थाने सुद्धा वापरले जात आहेत. वस्तुतः 'वाचले होते' आणि 'वाचलेले' अशा दोन्ही शब्दरुपात फरक आहे. उदाहरणार्थ : "हे पुस्तक मी पूर्वी बरेचदा वाचले होते, पण आता पूर्वी वाचलेले काहीच आठवत नाही" "तिथे बरेच पाणी साचले होते, पण असे साचलेले पाणी प्यायला वापरावे की नाही, हा प्रश्नच होता" असो. या सुंदर कवितेबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 12/29/2022 - 07:39 नवीन
वरती लिहील्याप्रमाणे मलाही कवीवर्य सुरेश भट यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/09/2023 - 07:22 नवीन
संदीप शेठ, कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 31 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 43 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 45 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 47 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 51 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा