Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

एक झलक तुझी पाहता...

D — Deepak Pawar, Tue, 11/29/2022 - 16:34

एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते
चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते.

रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन
चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण
तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते.

रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे
अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे
उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते.

पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग
पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग
डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.


  • Log in or register to post comments
  • 2822 views


वाचनखूण लावा
| 2822 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Wed, 11/30/2022 - 05:28 नवीन
दिपक भौ कवीता छानच पण शेवटच्या ओळीतला मजनू कुठेतरी पटत नाही. एकदम खड्ड्यात पडल्या सारखे वाटते. डोळ्यांचे गहिरेपण मज सुखावून जाते असे काहीतरी......
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Wed, 11/30/2022 - 10:48 नवीन
कर्नलतपस्वी साहेब मनःपूर्वक धन्यवाद. काही सुचल्यास बदल करतो.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Wed, 11/30/2022 - 15:21 नवीन
पवारसाहेब, मजनूच्या ऐवजी उदय करा. पहिले म्हणजे उदयास डुबवून घेणे म्हणजे आपलं अ‍ॅज अ सनसेट टाईप होईल. नाही का? आणि दुसरं म्हणजे वेल्कम मधल्या शेट्टी बंधूंची आठवण काढल्यासारखे होईल. ;)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 11/30/2022 - 12:24 नवीन
बाडिस
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Wed, 11/30/2022 - 15:07 नवीन
Bhakti मॅडम, बाडिस म्हणजे मला अर्थ कळला नाही.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Wed, 11/30/2022 - 15:22 नवीन
बाडीस = बाय डिफॉल्ट सहमत
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar गुरुवार, 12/01/2022 - 04:42 नवीन
काही सुचल्यास बदल करतो. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 15 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 20 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा