Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बात निकलेगी तो...

प — प्राची अश्विनी, Wed, 11/09/2022 - 11:48
तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो! नको लिहूस चंद्र बिंद्र किंवा कंकणभरला हात इथं सगळेच ओळखतात "त" वरून ताकभात.. विस्कटलेल्या केसांवरून उगाच करतील भलते तर्क. एका नजरेत ओळखतील सरलेली वयवर्षं.. सहज म्हणून विचारतील इतका तू उदास का रे? उतरलेला चेहरा मग न बोलता सांगेल सारे.. तुझ्या हरेक शब्दाचा अगदी कीssस पाडतील बोलता बोलता हळूच माझं नाव काढतील. तेव्हा मात्र सांभाळ हं, चेहरा ठेव कोरडा एक जरी हलली रेष, अनर्थ होईल केवढा.. आणखी एक गोष्ट तू कटाक्षाने पाळ, कितीही मनात आलं तरी माझा उल्लेख टाळ.. एकदा नाव कळलं की लोकं तिथंच थांबतील काय? आपल्या छोट्ट्या गोष्टीला मग लांबच लांब फुटतील पाय.. म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3547 views

💬 प्रतिसाद
स
सरिता बांदेकर Wed, 11/09/2022 - 15:20 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 11/10/2022 - 02:51 नवीन
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या "काही बोलावयाचे आहे" कवीतेची आठवण आली. मिपावर कवीतेच्या दालनाकडे हल्ली गर्दी मुळीच नसते. काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे कोणास वेळ आहे, प्रदर्शन तयांचे मी मांडणार नाही कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही प्रतीसाद भावनांना इथे मिळत नाही उपेक्षितांचा धनी मी होणार नाही....
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 11/10/2022 - 04:46 नवीन
साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. चांगले वाईट कसेही असो प्रतीसाद मिळायला हवा एवढीच इच्छा व त्यातुन पडलेल्या या ओळी.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/22/2022 - 05:06 नवीन
इतका सुंदर काव्यत्मक प्रतिसाद आल्यानंतर "प्रतिसाद भावनांना...." हे कसं मान्य करायचं?;)
  • Log in or register to post comments
भ
भागो Sun, 11/13/2022 - 07:16 नवीन
छान. आवडलीच.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 11/13/2022 - 07:30 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 11/14/2022 - 07:36 नवीन
कविता आवडली आणि कवीचा भित्रेपणा. मेल्याशिवाय प्रेम भेटत नाही भावा..
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/22/2022 - 05:04 नवीन
सरिता, भागो , चाणक्य, पटाईत सर, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा नाईक Wed, 11/23/2022 - 05:59 नवीन
खूपच सुंदर
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 11/24/2022 - 09:37 नवीन
व्वा, खुप सुंदर कविता. प्रेमात गुपितं काटेकोर पणें सांभाळुन घ्यावी लागतात. ब्रभा झाला तर ....... ही भावना उत्तमरित्या व्यक्त झालीय कवितेतून
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 12:15 नवीन
मस्त आवडली कविता.
म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो! प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
खरंय...! कोणी तरी म्हटलंय. मै चुप रहा तो, और गलतफहमिया बढी वो भी सुना है उसने, जो मैने कहा नही. -दिलीप बिरुटे (गप्प )
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/24/2022 - 13:24 नवीन
सुंदर जमून आलिये.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 11/25/2022 - 12:23 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/27/2022 - 07:03 नवीन
जब प्यार किया तो डरना क्या, लोग क्या कहेंगे सोचना क्या? घाबरुन घाबरुन केलेले प्रेम म्हणजे प्रेम नव्हे, लोक लज्जे खातर मन मारणे काही बरे नव्हे खरे प्रेम निर्भय बनवते, प्रवाहाविरुध्द पोहायला शिकवते लपुन छपून दुनियेला घाबरुन अंधेरेमे होती है चोरी चोरीकी सिर्फ एकही सजा, सदा बनी रहेगी दूरी ऐसे प्रेमीसे दूर ही रहेना गालिब, जो इजहार ना कर सके प्यार किया है प्यार करेंगे ये खुलकर बता न सके पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/27/2022 - 11:34 नवीन
शिल्पा नाईक, बिरुटे सर, स्वधर्म, चौ.को., मिका, पैजारबुवा... धन्यवाद. बात निकलेगी... या प्रसिद्ध नज्म चा हा भावानुवाद करायचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा