Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

छ
छोटा डॉन
Sat, 12/13/2008 - 20:51
💬 21 प्रतिसाद
  • महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - २

Book traversal links for महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

  • महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - २ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7109 views

💬 प्रतिसाद (21)
स
स्वप्निल.. Sat, 12/13/2008 - 22:50 नवीन
डॉन भाऊ, मस्त लेख आहे..माझे पण काँग्रेसबद्दल असेच काहिसे मत आहे..त्यांची जातीयवाद विरोधी इमेज खोटी आहे..सगळ्यात जास्त जातीचे राजकारण मला वाटते काँग्रेसच करते.. >>तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सगल मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. >>प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे १००% सहमत!!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 12/14/2008 - 01:01 नवीन
प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले?
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Sun, 12/14/2008 - 11:08 नवीन
धर्माचे म्हणायचे होते..चुकुन जातीचे लिहिल्या गेले.. ....असो ते माझे वैयक्तिक मत आहे.... स्वप्निल
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sun, 12/14/2008 - 14:30 नवीन
>> प्रत्येक पक्षाच्या जाती ठरलेल्या आहेत. सहमत आहे ह्या वाक्याशी. आज बहुतांश पक्षांची तशीच इमेज आहे. भाजपा म्हणजे "ब्राम्हणांचा, बनियांचा, उच्च्वर्णीयाम्चा" पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस जरी दावा करत नसले तर बहुसंख्य नेत्यांच्या नावांवरुन तो सरळसरळ "मराठा समाज" डोमीनेटेड पक्ष आहे असे दिसते आहे, शिवसेनाचा तसा अजुन काही "जातीयवादी" चेहरा दिसला नाही, बसपा नेहमीच "बहुजन समजाच्या" मागे उभी राहिली आहे व त्यांनीसुद्धा बसपाला बर्‍यापैकी हात दिला आहे. तसे सध्या बसपाने पुर्वी "४ जुते" मारलेल्या "ब्राम्हण वर्गाला" सुद्धा चुचकारायला सुरवात केली आहे म्हणुन बेहनजींच्या खास गोटात सध्या मिश्रा, शर्मा, त्रिवेदी सारखी नावे प्रामुख्याने समोर येत आहेत, समाजवादी पक्षाचा "मुस्लीम अनुयय" हा काही लपुन राहिलेला नाही पण त्यांनी बर्‍याच वेळा "बहुजन समाजाचा" तारणहार बनण्याचा प्रयत्न केला, दक्षिणेत तर द्रविडी-अद्रवीडी वाद हा खुप जुना आहे व त्यावर अजुन मते मागीतली जातात... राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर ह्यांनी अजुन तरी "सर्वसमावेशक" हा चेहरा टिकवण्यात यश मिळवले आहे पण जेव्हा जेव्हा संधी मिलेल तेव्हा हा पक्ष "जाती आणि धर्माचा" फायदा घेण्याचा चान्स सोडत नाही. आजही गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंतच्या तिकीटवाटपात बहुसंख्यवेळा या गोष्तींचा विचार होतोच. शिवाय आरक्षण, नामांतरे, खास आयोग, योजना वगैरे ह्या बहुसंख्य वेळा काँग्रेसकडुन प्रमोट केल्या गेल्या आहेत. नुकतेच उठलेले "ओबीसी आरक्षणाचे" वादळ हे काँग्रेसच्याच एका मंत्र्याच्या डोक्यातुन निघालेली पिल्लु आहे व ह्यात सरळ सरळ जातीच्या आधारे आपली "वोट बँक" मजबुत करण्याचे इरादे आहेत हे स्पष्त आहे. >>प्रमोद महाजन गेल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे काय होत आहे? मुंडेंना प्राथमीक अवस्थेत "मागासर्गीय उभरते नेतॄत्व" म्हणुन महाजनांनी प्रोजेक्ट केले ही जरी खरी गोष्त असली तरी जसा काळ गेला तसा मुंडे हे "सर्वांचेच नेते" झाले. त्यांच्यामागे जरी वंजारी समाज मोठ्ठ्या संख्येन उभा असल्याचे खरे असले तरी ही मुंडे सध्या खास करुन त्या वर्गाचे नेते नव्हे तर "सर्वांचेच नेते" म्हणुन प्रोजेक्ट होत आहेत. >>छगन भुजबळ, नारायण राणे यांना शिवसेना का सोडावी लागली. छगन भुजबळ ह्यांच्या शिवसेना सोडण्यामागे "मंडल आयोग" हे एकमेव न्यात कारण असल्याचे मानले जाते. शिवसेनेने कधीही जातीय राजकारण (कमीत कमी समोरासमोर ) केले नाही, ह्याच तत्वाने त्यांनी "मंडल आयोगाला" विरोध केला व भुजबळांचे बाळासाहेबांशी मतभेद होऊन त्यांनी शिवसेना सोडली असा इतिहास ( मलातरी ) ज्ञात आहे. नारायण राणेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर न पटल्याने, पक्षातच स्पर्धक निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली असल्याच्या बातम्या आहेत. ह्यात कुठेच "जात" आल्याचे मला ज्ञात नाही. >>राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते कोणत्या जातीचे आहेत? आणि सगळ्यात जास्त जातीचे राजकारण काँग्रेस करते हे आपण कुठे वाचले? दोन्ही प्रश्नाचे उत्तर ( माझ्यामाहितीप्रमाणे ) वर दिले आहे. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 12/14/2008 - 03:30 नवीन
आपली कळकळ आवडते. आपण आपले मत व्यक्त करा. बर्‍याच वेळेस आपल्याला हवी असलेली प्रतिक्रिया येत नाही अथवा विषय भरकटवला जातो. अशा वेळेस मनाची शांती आपल्या उपयोगी येते. मी सर्वसाधारण पणे खालील विचारसरणी स्विकारतो. १. आपला लेख आल्यानंतर अनेक विरुद्ध प्रतिक्रियेचे उत्तर परस्परच दिले जाते. २. काही मुद्दयांचे उत्तर मात्र आपणच द्यायला हवे. ३. पुढील लेखात या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावयाचा. ४. व्यक्तिश: कोणाबद्दलही द्वेष न ठेवता, आपण प्रबोधनाचे कार्य करित आहोत या वर अबाधित विश्वास ठेवायचा. आपल्या पुढील लेखाची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/14/2008 - 04:27 नवीन
वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील सद्य स्थितीचे राजकारण / खेळी लेखातून मस्त व्यक्त होत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sun, 12/14/2008 - 06:06 नवीन
काँग्रेसचे निर्णय अमराठी हायकमांड वर अवलंबून असणे आणि यातून महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर होणारी गळचेपी थांबवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना संधी मिळावयास हवी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष चांगला म्हणायचा या बाबतीत. (इतर पक्ष राज्यपातळीवर म्हणावे एवढे तुल्यबळ नाहीत म्हणून उल्लेख केला नाही.) (जर त्यांनी हे धोरण बदलले नाही तर..) काँग्रेसला अधिक संधी देण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 12/14/2008 - 07:38 नवीन
"राजकारण म्हणजे गटार" असे मानणार्‍या मान्यवरांनी ह्या लेखाला तशा अथवा त्या अर्थाच्या प्रतिक्रीया देण्याची "तसदी घेऊ नये". उत्तम! आम्ही ही तसदी घेत नाही/घेऊ इच्छित नाही..कारण "राजकारण म्हणजे गटार" असेच आमचे मत आहे.. आम्ही आपले ह्याबद्दल आत्ताच आभार मानत आहोत. धन्यवाद. हा चांगला व आम्हाला सोयिस्कर असा डिस्क्लेमर टाकल्यामुळे आम्हीही आपले आभार मानत आहोत.. चालू द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
क
कशिद Sun, 12/14/2008 - 10:33 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ! लेख वचनिय आहे..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/14/2008 - 14:00 नवीन
डानराव पाटील, आपले कॉग्रेसबद्दलचे विचार वाचून झाल्यावर पुढचे विचार वाचायलाही आवडतील.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 12/14/2008 - 15:06 नवीन
कॊग्रेस, भाजप हे दोन मोठे पक्ष आहेत, कॊग्रेस झाले आता भाजप बद्दल मत/विचार जाणुन घ्यायला आवडतील. :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/14/2008 - 15:15 नवीन
कॉन्गेस ची नाव बुडेल असे मला तरी वाटत नाही. एकतर विरोधी पक्षात फारसा जोर नाही. आणि मुबंई-ठाणे जेथील जागा वाढल्या आहेत, तीथले परप्रांतिय कॉन्गेस किंवा राकॉ ला मदत करतील. मला नाही वाटत की राणे मुंबई - कोकणा बाहेर फारसे बिघडवु शकतील आणी मुळात कॉन्गेस कोकणात जीवच किती होता???. जे आता दिसत आहे ते राणेंमुळे. निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/21/2009 - 16:20 नवीन
निवडुन येणारात किती जोर आहे, ह्या पेक्षा पाडणारर्‍यात किती जोर आहे ह्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. -- दुर्दैवाने हे एक उघड सत्य मागच्या काही निवडणुकांपासून अनुभवाला येत आहे. कळीच मुद्दा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 12/14/2008 - 17:57 नवीन
सुरवात मस्त! सगळे भाग झाले की एकगठ्ठा प्रतिसाद देईन :) तोपर्यंत चालू द्या आम्ही वाचतोय -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Mon, 12/15/2008 - 01:23 नवीन
चांगला लेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - अभिजीत
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/15/2008 - 13:50 नवीन
डॉन्या, लेख छान आहे. मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे. कधी नव्हे तो या घटनेनंतर थेट पाकिस्तानचे नाव घेऊन पंतप्रधान-संरक्षणमंत्री त्यांच्याशी युद्ध करावे न कारावे अशी मते प्रकट करत आहेत. माझ्या मते याचा सरळ संबंध जनतेला तात्पुरते तुष्ट करुन या निवडणूकीमध्ये इतर मुद्दे दाबून स्वदेशप्रेम वगैरे दाखवून हेतू साध्य करणे याच्याशी आहे. आपले केंद्रातले मंत्री लोक अचानक इतके कठोर कसे झाले याचे उत्तर निवडणुका जवळ येत आहेत हेच वाटत आहे. आता स्थानिक जातीय दंगगली, वीज, पाणी यांपेक्षा मोठा व्यापक प्रश्न आयताच मिळाला आहे. याचाच उपयोग महाराष्ट्रात सुद्धा होईल असे वाटते. एकदा का सूनबाई सभेत येऊन म्हणाल्या की या देशासाठी मी माझ्या सासूबाई,.. वगैरे की सगळे वातावरण भारले जाईल. :) पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 12/15/2008 - 14:48 नवीन
मुंबईमध्ये झालेली घटना निवडनूकीचे वारे वाहू लागल्यावर झाली आहे दिल्ली आणि राजस्थानातील निवडणूकांतील मतदान ह्या घटनेनंतर आठवड्याभरात झाले होते. तरीही दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडून आली. मला॑ वाटते, विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/15/2008 - 15:56 नवीन
>> विधानसभा निवडणूकीत लोक राष्ट्रीय समस्या आणि स्थानिक (राज्यस्तरावरील) घटनांची फारकत करतात. असेच म्हणतो ... प्रत्येक पातळीवरच्या निवडणुकांसाठी "विषय आणि मुद्दे" सर्वस्वी भिन्न असतात. त्याचा बहुतेक करुन "इतर पातळीशी" संबंध नसतोच / नसावाच. स्थानीक परिमाण, स्थानीक समस्या, स्थानीक नेतॄत्व, स्थानीक राजकारण ह्यांचा प्रामुख्याने संबंध येतो. तुम्हीच पहा ना, जेव्हा पंचायत समित्यांच्या वगैरे निवडणुका होतात तेव्हा एखाद्या महान / मोठ्ठ्या / बलदंड अशा मंत्री असलेल्या नेत्याच्या पॅनेलला स्थानीक पातळीवरची एखादी "आघाडी / पॅनेल / महासंघ " चक्क धुळ चारतो. कारण त्या मंत्र्याने स्वतः मंत्री म्हणुन केलेल्या कामापेक्षा स्थानीक संदर्भ जास्त वरचढ ठरतात. आपल्या राज्यात तर अशी भरपुर उदाहरणे आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये येणार्‍या पंचायत समित्यात, बँकात, परसंस्था यांच्या इलेक्शनमध्ये तेथील "आमदार / खासदार" यांचे पॅनेल भुईसपाट होऊन राज्याच्या राजकारणात काडीचे स्थान नसलेली एखादी "विकास आघाडी" निवडुन आली आहे ... >>महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झालाच तर तो सद्यसरकारच्या स्थानिक गैरकारभारामुळे होईल, दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध असेलच असे नाही. नक्की सांगता येणे कठीण आहे, अजुन बराच वेळ आहे ना निवडणुकीला. आत्ताच लगेच जर निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित "दहशतवादी हल्ल्याच्या ओघाने येणारा सुरक्षेचा मुद्दा" महत्वाचा ठरला असता ( असे मी मानतो) . छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/15/2008 - 16:02 नवीन
बरोबर आहे.. पण मुंबई प्रश्न हा केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर आहे. (मुंबई महाराष्ट्रात आहे म्हणून.)त्यामुळे मराठी माणसांच्या नोकरी प्रश्नाला देशभक्तीचे वातावरण टक्कर देऊ शकेल असे वाटते. काँग्रेसने जर देशभक्तीची लाट आणली तर ते शक्य होईल. पण अशी लाट किती टिकेल आणि खेडोपाडी याचा किती परिणाम होईल ते माहित नाही. ते असो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 12/15/2008 - 14:37 नवीन
छोटे सरदार! मस्तच जमलाय लेख.सध्या काही भाष्य करत नाही. जरा वेळ घेऊन व विचार पुर्वक मत मांडलेले बरे नाहि का? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आम्ही सुद्धा! लिखाळ यांच्या मताशी मी सहमत आहे. "अनामिका"
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 01/21/2009 - 16:24 नवीन
डॉनबा, तुमच्या कल्पनाशक्ती समोर आम्ही नेहमीच चाट पडतो. आपणा सर्वांच्या जीवनावर कमी अधिक प्रमाणात राजकीय पक्ष बदल घडवून आणत असतात. त्यामुळे एक मतदार म्हणून आपणांस त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्रयस्थाच्या नजरेतून आपण एक चांगली लेखमाला उतरवत आहात असे दिसते. अभिनंदन! पुढील भागांच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) भास्कर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा