Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...

म
मुक्त विहारि
Tue, 09/27/2022 - 06:58
💬 7 प्रतिसाद
नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली. हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले. पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी. शतका नंतरच्या 39 धावा फक्त 11 चेंडूत काढल्या.. दोन्ही मॅचेस सुंदर झाल्या, पण लक्षांत राहिली ती तिसरी मॅच आणि कारण म्हणजे, दिप्ती शर्माने केलेला रन आऊट. लिंक खाली देत आहे. https://youtu.be/9Wabzl17RwI ज्यांनी, ही मॅच लाईव्ह बघीतली असेल, त्यांना ह्या रन आऊटचे महत्व नक्कीच समजले असेल... दिप्ती शर्माने समयसुचकता दाखवून, योग्य तेच केले, पण खरे कौतुक वाटले ते, हरमनप्रीत कौरचे. हरमन प्रीत कौरने दिप्तीची चांगलीच पाठराखण केली ... https://www.loksatta.com/krida/harmanpreet-kaur-comment-on-deepti-sharma-charlotte-dean-run-out-in-ind-vs-eng-womens-cricket-match-prd-96-3149475/ शेवट पर्यंत लढा देणारे खेळाडू आणि खेळाडूंची पाठराखण करणारा नेता असेल तर, संघ उत्तम खेळ करतोच.. 1 ऑक्टोबर पासून, सुरू होणार्या, महिला क्रिकेट आशिया कप साठी, ह्या भारतीय संघाला शुभेच्छा....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3385 views

💬 प्रतिसाद (7)
ह
हेमंतकुमार Tue, 09/27/2022 - 12:24 नवीन
क्रिकेट आशिया कप साठी महिला भारतीय संघाला शुभेच्छा.! !
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 09/27/2022 - 12:51 नवीन
आशिया कपसाठी भारतीय संघाला शुभेच्छा. दीप्तिने जे केलं त्याला पाठिंबा आहे, काही चुकलंय असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 09/27/2022 - 12:55 नवीन
स्मृती मंधाना (९१, ४० व ५०) हिने सुद्धा सातत्याने फलंदाजी केली आहे. तिची फलंदाजी पाहून सौरभ गांगुलीची आठवण येते. २० वर्षे ८ महिने आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेली झूलन गोस्वामी निवृत्त झाली. तितकीच मोठी कारकीर्द असलेली मिथाली राज सुद्धा निवृत्त झाली. पण आता स्मृती मंधाना व हरमनप्रीत कौर या दोन फलंदाज व रेणुका ठाकूर ही गोलंदाज अत्यंत भरात आहेत. जोडीला यास्तिका भाटिया ही अत्यंत चपळ यष्टीरक्षक फलंदाज सुद्धा संघात आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/27/2022 - 14:59 नवीन
फक्त आता दोन उत्तम वेगवान गोलंदाज हवेत. राजेश्र्वरी गायकवाड, स्नेह राणा, दिप्ती शर्मा ह्या हरहुन्नरी आहेत. पण त्या वेगवान गोलंदाजी करत नाहीत. पुजा वस्त्रकार आणि मानसी जोशी, तशा ठीक आहेत. पण झुलन गोस्वामीची उणीव जाणवत राहणार. आघाडीची फळी, मधली फळी, यष्टीरक्षक, स्पिनर्स, ह्या सगळ्या गोष्टी भक्कम आहेत.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 09/28/2022 - 13:53 नवीन
दिप्ती शर्मा ला हरमनप्रीत कौर ने हिंट दिली होती......... व्हिडीओ च्या सुरवातीला बघा...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 09/28/2022 - 15:52 नवीन
सांघिक निर्णय, निर्णयाची अंमलबजावणी आणि घटने नंतर, कॅप्टनने केलेली पाठराखण..... ये नया भारत है ....
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Wed, 09/28/2022 - 18:50 नवीन
+1
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा