Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खरचं गरज आहे का?

क
कर्नलतपस्वी
Mon, 09/26/2022 - 11:43
💬 8 प्रतिसाद
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस. एखादा खुपच जवळचा असेल तर विचारायचा 'कधी बसायचे'...... रस्त्यावर बराच वेळ झाला एक तरूण, चिंताग्रस्त चेहर्‍याने येरझार्या घालत होता. सुरवातीला वाटले असेल कुणीतरी, पण बराच वेळ शतपावली केल्या सारखे फिरताना बघून असे वाटले की बहुतेक याला डॉक्टरला भेटायचंय. पण मग येत का नाही? असो, दुपारचे दोन वाजायला आले होते. गर्दी जवळ जवळ संपली,शेवटचा रोगी बघून निघूयात असे म्हणत मित्र तपासायच्या खोलीत गेला. शेवटचा रोगी निपटून आता आम्ही निघणार, तोच तरूण घाईघाईत आत शिरला.'डॉक्टर एक मिनिट प्लीज!'.मित्र त्याला घेऊन आत तपासायला गेला. आता मात्र माझे कुतूहल शिगेला पोहचले होते. मित्राने त्याला वाटेला लावले. आता त्या तरुणाचा चेहरा थोडा रिल्याक्स वाटत होता. त्याने पण घाईघाईत काही नोटा मित्राच्या हातात कोंबल्या आणी जवळ जवळ पळतच बाहेर पडला. "काय झालंय रे त्याला?", बराच वेळ फेऱ्या मारत होता. मित्र हसत हसत म्हणाला त्याला 'फेडस' झालायं. डोकं गरगरलं,मला हा आजार माहीतीच नव्हता. कदाचित काही नवीन संशोधन झाले असावे म्हणून म्हणलो "जरा समजवून सांग ना, मला माहीत नाहीये,नवीन आहे का?" मित्र पुन्हा एकदा जोरात हसला. "एक व्हिटामीनचे इंजेक्शन,काही व्हिटामीनच्या गोळ्या, आणी सात दिवस उपास सांगीतला आहे. आठवड्यात बरा होईल". अरे पण आजार काय? मित्र म्हणला नवीनच लग्न झालयं, आताच मधुचंद्रा वरून परत आलाय. काल पासुनच त्रास होतोय,हनीमून मस्त झाला पण आता बॅटिंग करताच येत नाहीये.आसे बकरे येतात,गुपितच ठेवायचं असते म्हणून परवलीचा शब्द.भरपुर फि देतात वर आशिर्वाद सुद्धा. पि आर वाढवतात ते वेगळेच. &#128526 फेडस म्हणजे...... Post Honeymoon Erectile Dysfunction Syndrom आता उपास कुठला ते लक्षात आले. आम्ही दोघेही हसत हसत दैनै बाये मुड करत घराकडे निघालो. ह्म्म.... दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये!!!!!! खरचं गरज आहे का? कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!! (फक्त दारू ढोसण्यास) ह्म्म ...... असे हा सहावा वेद न लगे संथा कुणाची का भांबावलास तू रे ही कस्तुरी तुझ्याच पाशी अदृष्य सापळे हे का पळे तू उगाच जे पाहिजे ते आहे जवळ तुझ्याच कधी समजेल या खुळ्यांना जे पाहिजे ते आहे त्याच्याच पाशी -कवी चाहूल ३१-९-२०२२, मुहुर्त- स्टॅ टा दु २:४१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3730 views

💬 प्रतिसाद (8)
त
तर्कवादी Mon, 09/26/2022 - 12:29 नवीन
अफाट !!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 13:01 नवीन
मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 13:02 नवीन
जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 13:02 नवीन
जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 09/26/2022 - 18:33 नवीन
31 / 9 च्या प्रतीक्षेत!! _/\_
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/26/2022 - 19:11 नवीन
पोलीसा पेक्षा पण बारीक निरीक्षण करताय की राव. खुनी,चोर,दरोडेखोर लगेच पकडताल. सॅल्युट. मोबाईल मुआ दांडीयामुळं बिथरलाय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/27/2022 - 05:00 नवीन
भारी किस्सा आहे...
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 09/27/2022 - 10:20 नवीन
व!!कविता आवडली. पण तरीही वयाच्या काही टप्प्यांवर काही जणाना सेक्सॉलॉजिस्ट्ची मदत लागु शकते. जसे आपण ईतर डॉक्टरांकडे(डोळे/दात्/ईतर तक्रारी) त्या त्या वेळी जाउन सल्ला/ औषधे घेतो तसेच. त्यामुळे"खरच गरज आहे का?" याचे उत्तर होय असु शकते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा