Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कण अमृताचे......

क — कर्नलतपस्वी, Wed, 09/21/2022 - 08:35
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5598 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Wed, 09/21/2022 - 08:39 नवीन
मुवी,माऊलींचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/21/2022 - 08:42 नवीन
भावना पोचली, पण हे आचरणात आणणे फार अवघड आहे, भल्या भल्यांची त्रेघातिरपिट होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 09/21/2022 - 09:09 नवीन
माऊली आपल म्हणणं बरोबर आहे पण ठरवलं तर फार आवघड नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/22/2022 - 14:30 नवीन
अशक्य नक्कीच नाही ....
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/21/2022 - 09:05 नवीन
झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही _/\_
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 09/21/2022 - 15:44 नवीन
क्या बात!!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 14:12 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी,भक्ती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/22/2022 - 14:16 नवीन
एकदम सुरेख
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा गुरुवार, 09/22/2022 - 15:47 नवीन
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही
खूप छान!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 17:11 नवीन
प्रचेतस,श्रीगणेशा प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 05:40 नवीन
खूप छान. ज्याला हे जमलं तो सुखी
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 05:41 नवीन
पण एक शंका. अमृताचे कण की थेंब ? द्रव आहे म्हणून म्हटलं
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 09/23/2022 - 10:27 नवीन
अमृत द्रव पदार्थ पण जेव्हा हाच शब्द म्हणून दुसर्‍या शब्दात बरोबर येतो त्या अनुषंगानेच त्याचा अर्थ घेतला जातो. जसे क्षण अमृताचा तसाच वापरला आहे. अर्थात हे स्पष्टीकरण माझे ,कुठलाच आधार नाही. तशीही माझी भाषासमृद्धी गरिबीच्या रेषेखालील. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 12:00 नवीन
गरिबीच्या रेषेखाली... छत्रपती हो. फार सुंदर लिहिता तुम्ही. पण तुमचं स्पष्टीकरणही शक्य आहे. मी सहज.शंका विचारली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 12:03 नवीन
#छत्रपती नाही तर छे छे लिहायचं होतं. Autocorrect खूप गोंधळ करतोय
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 09/23/2022 - 12:38 नवीन
@प्राची अश्विनी, गलेमा मधे शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमीत्त लिहीलेला लेख जरूर वाचा,कदाचित आवडेल व मला नवीन माहीती कळेल . https://misalpav.com/node/50662/backlinks 😀 *** 🙏
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा