Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

च — चांदणे संदीप, Wed, 09/14/2022 - 06:21
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6310 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/14/2022 - 08:09 नवीन
आवडली कविता, जाता येता दिसणारी ही विलोभनिय दृष्ये, मधला सिमेंट मधे वाळू मिसळण्याचा काळ सुसह्य करतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/14/2022 - 09:24 नवीन
सुरेख एकदम
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/14/2022 - 09:29 नवीन
मस्त! चित्रदर्शी|मर्मदायी|
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 09/14/2022 - 09:37 नवीन
सुरुवातीची कविता छान आहे, पण..
दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं.
याला पर्याय नाही..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/14/2022 - 10:17 नवीन
सुरेख एकदम !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/14/2022 - 10:23 नवीन
कामगार एकजूटीचा विजय असो.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 09/14/2022 - 17:14 नवीन
कधी काळी दुचाकीवरून शनिवार रविवार ताम्हिणी घाट उतरुन जात असे ते आठवले :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 09/20/2022 - 11:53 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/22/2022 - 05:09 नवीन
व्वा, सुंदर शब्दचित्र. आवडली कविता ! पण शेवटच्या तीन ओळीत खडा लागून भानावर आलो. आपल्या सर्वांचे तेच आहे, वास्तवात परतावे लागतेच. तेच आयुष्य आहे !
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 09/22/2022 - 08:13 नवीन
मनाला भिडणारी सुरेख कविता!!! Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/09/2023 - 01:53 नवीन
कविता वाचताना फार फार वर्षांपूर्वी पावसाळ्यात करत असलेल्या भटकंतीच्या आठवणी मनात दाटून आल्या. तेंव्हा शहराबाहेरचा परिसर फार रमणीय होता, आणि त्यात फिरताना अद्भुततेचा प्रत्यय यायचा.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/09/2023 - 02:01 नवीन
या कवितेत 'एका दिवसातले येणेजाणे' याऐवजी संपूर्ण आयुष्याचे सांकेतिक चित्रण आहे, असा विचार केला, तर 'परत येताना पुन्हा तेच सारं' जर होऊ शकलं, तर किती छान होईल, असं वाटून गेलं. अर्थात काही उद्यमी (आणि भाग्यवान) लोक अगदी उतारवयातही नवनवे उपक्रम हाती घेत असतात, तसा प्रयत्न करायला हवा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 34 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा