Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२

प
पाषाणभेद
Fri, 09/02/2022 - 14:19
🗣 89 प्रतिसाद
मिपासदस्यांचे नाशिकमध्ये अनेक कट्टे आयोजित झाल्याचे समजते. आता मिपाचा पुण्यात कट्टा या महिन्यात आजोजित करूया. मिपा कट्ट्यांत - पुणे कट्टा फक्त पुणेकरांसाठी, नाशिक कट्टा हा फक्त नाशिकसाठी असला प्रकार नसतो, तो सर्वांसाठी असतो याची कृपया नोंद घ्यावी. कट्टा साधाच असेल. कौटुंबिक असेल. (तरच सदस्य येऊ शकतात व कुटूंबाचीही सहल होते.) फक्त खाण्यासाठीच कट्टा नसावा. प्रत्यक्ष भेट व विरंगुळा हा स्वच्छ हेतू ठेऊया. साधारण शनिवारचे नियोजन असू देऊ जेणे करून रविवार आराम होईल व बाहेरगावच्या सदस्यांना जाणे सोपे होईल. (अर्थात वार व दिनांक सर्वानुमते ठरवूया.) दुसरे असे की प्रत्यक्ष भेटीत ओळख करण्यातच वेळ जातो हा आधीच्या कट्ट्यांतील अनुभव आहे. या वेळी ओळख कमी वेळात करून देऊ. नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया. माझ्या मते थोडासा जवळचा विषय घेऊ म्हणजे की आपल्या लाईफमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही तर्हेवाईक लोकं भेटलेले असतात. त्यांचा प्रत्येकी सदस्य एक असा अनुभव सांगावा हा विषय ठेवू. तर मंडळी, तुम्ही सांगा की मिपा कट्टा पुणे, सप्टेंबर २०२२ कधी अन कुठे ठेवायचा ते. कळावे, आपला, पाभे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16933 views

🗣 चर्चा (89)
त
तुषार काळभोर Fri, 09/02/2022 - 19:12 नवीन
मला वाटतं पाताळेश्वर-२०१८ नंतर पुण्यात जाहीर कट्टा झालेला नाही. (अघोषित कट्टे बहुतेक दरमहा होत असावेत.) पण असं ठरवून "नंतर प्रोफेशनल लाईफ बद्दल कोणतीही चर्चा न करता या वेळी साहित्यिक किंवा संबंधीत विषयावर चर्चा करूया." हे फारच औपचारिक वाटतं. कट्टे कसे मोकळे ढाकळे, गप्पा मारण्यासाठी व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 09/02/2022 - 20:06 नवीन
अगदी अगदी. आत्तापर्यंतचा अनुभव असा की 'हेच बोलायचं' असं ठरवून कट्टा होत नाही, मिपाकर भेटले की आपसूक वेगवेगळे विषय निघत जातात व गप्पा होत राहतात.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/03/2022 - 20:23 नवीन
या वेळचा कट्टा निराळा असेल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/06/2022 - 13:43 नवीन
अरे बापरे...अनौपचारिक कट्टा असेल तर ठीक. पण सेमिनार छाप औपचारिक कार्यक्रमात निदान मलातरी रस नाही! कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 09/06/2022 - 14:56 नवीन
चिंता करू नकोस .... पाताळेश्र्वर आणि वल्ली, असे मिश्रण असेल तर, कट्टा अनौपचारिक होतो...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/06/2022 - 15:39 नवीन
आम्ही त्याच वडाच्या झाडाखाली तिथेच एक उपकट्टाही चालवला होता. ('अनिवासी' यांची मुलाखत चालू होती आणि ती तिथूनच ओडिओ फाईल प्रसारितही केलेली.) खूप मिपाकर आले तर वडाचं झाड तसं मोठं आहे.
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Wed, 09/07/2022 - 12:13 नवीन
टर्मीनेटर जी कट्ट्याला नक्की या, भेटीगाठी होतील.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 09/06/2022 - 16:03 नवीन
या वेळचा कट्टा निराळा असेल.
"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल." याची आठवण झाली..!! ;-)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 09/06/2022 - 17:37 नवीन
"ती मोठी होईल तेव्हा तिचा हिरो बदललेला असेल."
नक्की का ? बॉलीवूडच उदाहरण पाहिलं तर ती म्हातारी होईल तरी तिचा हिरो दुसर्‍या हिरोईनबरोबर रोमांस करत असेल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 09/02/2022 - 20:00 नवीन
पुणे कट्टा धागा क्रमांक १ असे टाकावे.. चार्वितचर्वण होईतो दोन धागे होतील
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 09/02/2022 - 20:04 नवीन
मला वाटतं १७ सप्टेंबर, शनिवार ही तारीख ठरवण्यास हरकत नाही, गणपतीची धामधूम पण संपून जाईल, थोडे निवांत भेटता येईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/03/2022 - 04:17 नवीन
१७ सप्टेंबर >>>> +१
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 09/03/2022 - 08:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/03/2022 - 12:55 नवीन
+२
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 09/06/2022 - 16:18 नवीन
येणार!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/03/2022 - 07:19 नवीन
ठिकाण - पाताळेश्र्वर
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/03/2022 - 07:48 नवीन
अर्थात नेहमीचेच :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/03/2022 - 10:03 नवीन
जंगलीमहाराज रोड?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/03/2022 - 10:19 नवीन
जंगलीमहाराज रोड टोकाला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/06/2022 - 15:42 नवीन
पण चौकाला अधिकृत पाटी एका मिपाकराच्या आजोबांच्या नावे आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 09/03/2022 - 09:28 नवीन
श्री पाषाणभेद, जाहिररीत्या कट्ट्याचा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा. तुमच्यासारख्या जिंदादिल मिपाकरांना बघुन आनंद होतो. एक विनंती: जमले तर कट्टा प्रसारण आंतरजालावर होऊद्या. ज्यांना त्याठिकाणी येता येणार नाही त्यांना कमीत कमी लांबुन आस्वाद घेता येईल. एमएस टीम (MS Team), झुम (Zoom), गुगल मीट (google meet) इ. सारखे सॉफ्टवेअर तुम्हाला उपयोगी पडु शकतात. त्याविषयातील तज्ञ तुम्हाला सहज मिपावर मिळतील.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/03/2022 - 09:44 नवीन
प्रत्यक्ष कट्ट्याची मज्जा ऑन लाईन नाही! (असे मला वाटते) बाकी कट्टा वृत्तांत फोटोफुल्ल असतोच की!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/03/2022 - 13:13 नवीन
१७ सप्टेंबर व पाताळेश्वरास बहूतेकांची संमती आहे असे दिसते आहे. तसेच पाचामुखी परमेश्वर. त्यामुळे आपण सर्वांनी १७ सप्टेंबर व पाताळेश्वर येथे सकाळी १० च्या सुमारास भेटूया. आधी गप्पा मारू व नंतर जेवणाचे ठरवू. हा मेसेज आपल्या मिपाच्या फेसबूक पेजवर टाकतो, म्हणजे आणखी लोकांस समजेल.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Sat, 09/03/2022 - 13:59 नवीन
भेटुया
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Fri, 09/09/2022 - 11:39 नवीन
पाताळेश्वरा मंदिरा कडे का? नेमका पत्ता दिल्ल्यास बरे पडेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/09/2022 - 12:11 नवीन
https://www.openstreetmap.org/#map=16/18.5290/73.8509&layers=N ओम लिहिलंय ती जागा शिवाजीनगर स्टेशनपासून चालत दहा मिनिटांवर आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वलेकर Fri, 09/09/2022 - 13:03 नवीन
लक्षमिशेवर मंदिर च्या लोकेशन वर आहे. बरोबर ना?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/09/2022 - 14:03 नवीन
पाताळेश्वर नाव दिसू लागतं तिथं.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/03/2022 - 13:33 नवीन
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो, व माझे दोन शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 09/03/2022 - 18:09 नवीन
तसेच यापुढे खाजगी चर्चेअंती, व्हाअ‍ॅवरील चर्चेने जे जे कट्टे ठरतील त्यांना मिपाकट्टे समजले जाऊ नयेत अशी विनंती सर्वांना करतो.
+१
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sat, 09/03/2022 - 15:21 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. फोटो आणि खादाडी सह कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत. मात्र सकाळी १० ते १ म्हणजे वेळ कमी पडेल असे वाटते आहे. केवळ ३ तास पुरेसे होतील का?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 09/03/2022 - 15:44 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! १७ तारखेला काही पुर्वनियोजित कार्यक्रम नसल्याने (आणि पर्जन्यराजाने अनुकुलता दर्शवल्यास) आत्ता तरी कट्ट्याला उपस्थित राहता येईल असं वाटतंय. वेळ आणि ठिकाण समजल्यावर अचानक येउन थडकण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/03/2022 - 16:05 नवीन
उत्साहवर्धक !! 2019 च्या दिवाळीपूर्व पाताळेश्वर कट्ट्याला १० जण उपस्थित होते. यावेळेस तो आकडा मागे टाकूयात !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/06/2022 - 17:42 नवीन
"उपस्थितांत ज्येष्ठ नागरिकच अधिक आहेत" अशी कॉमेंट आली होती. त्यामुळे यापुढे कट्ट्याला जाणार नाही. रामराम.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 09/06/2022 - 18:14 नवीन
ते तुमच्यासाठी नव्हते हो... यावेळी या भेटायला..
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 09/06/2022 - 19:17 नवीन
म्हातारे नको आहेत? अरे बापरे. हे नव्हते माहीत. मग माझाही पास.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 09/07/2022 - 02:31 नवीन
तो, तरूण मंडळींना टोला होता ...
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 09/07/2022 - 08:19 नवीन
जेष्ठ नागरीक म्हणजे जास्त आयुष्याचा अनुभव, जास्त वाचन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 09/04/2022 - 03:35 नवीन
१) वाचून झालेल्या पुस्तकांची अदलाबदल कट्ट्याला करता येईल. वाशी महाकट्ट्याला मी आणलेली होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 09/04/2022 - 07:32 नवीन
येण्याचा प्रयत्न करतो...
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 09/04/2022 - 08:18 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा ! पहिलाच कट्टा आहे अशा सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा.. माझ्या कोणी ओळखीचे नाही या कारणाने कट्टा मिस करू नये
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 09/04/2022 - 08:26 नवीन
सहमत आहे ...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 09/05/2022 - 05:01 नवीन
साडे नऊला पोहोचू शकतो. पण दुपारी पावणेबाराची भुसावळ पकडावी लागते. नंतर एकदम सवातीनला गाडी आहे.
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Tue, 09/06/2022 - 13:01 नवीन
येण्याचा नक्की प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/06/2022 - 17:46 नवीन
येण्याचा प्रयत्न करेन. उत्सुकता आहे कारण आजवर एकाच मिपाकराला प्रत्यक्ष भेटलो आहे.
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो Wed, 09/07/2022 - 15:17 नवीन
सध्या प्रवासावर बंधने आहेत त्यामुळे नगरहून कोणी जाणारे असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या अथवा माझ्या खाजगी वाहनाने नक्कीच कट्ट्याला उपस्थित राहील . इच्छुकांनी नक्की संपर्क करावा . ता क - मी ड्राईव्ह करणार नाही ( गाडी माझी असली तरीही )
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 09/10/2022 - 12:44 नवीन
इच्छा असूनही जमणार नाही. १६ तारखेलाच १ आठवड्यासाठी बिझनेस ट्रिपला निघत आहे. बिझनेस ट्रिपचे नक्की होत नव्हते त्यामुळे आधी प्रतिसाद दिला नाही. कट्ट्याला शुभेच्छा. सविस्तर व्रुत्तांत (खादाडी आणि फोटोसहीत) पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 09/12/2022 - 08:23 नवीन
मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. लक्षात राहण्यासाठी धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 09/12/2022 - 13:13 नवीन
धागा तापलेला असू द्या .. नाहीतर लोक विसरतात
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/14/2022 - 06:24 नवीन
दोन दिवस शिल्लक आहेत. मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा