Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चित्र-कथा गुंफण

ह
हेमंतकुमार
Wed, 08/31/2022 - 09:09
🗣 6 प्रतिसाद
नमस्कार मित्रांनो ! सर्वांना गणेशोत्सव आणि मिपा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या धाग्याद्वारे एक उपक्रम चालू करतो आहे. अनेकांच्या सहकार्याने तो पुढे चालू ठेवता येईल. खाली एक चित्र दिले आहे. त्यावरुन आपल्याला एक काल्पनिक दीर्घकथा लिहायची आहे. कथेची सुरुवात मी करून देतो. त्यानंतर आपल्यातील कोणीही ती पुढे चालू ठेवू शकतो. एका चित्रावरून कथा लांबवण्याची मुदत 48 तास ठेवूया. त्यानंतर अन्य कोणी सभासद नवे चित्र देईल आणि पुढची कथा सुरू करून देईल. कथा आपण वाटेल त्या प्रकारे आणि आपापल्या शैलीत पुढे नेऊ शकता. कथेतील मजकूर चित्रावर आधारित असावा. सर्वांचे या उपक्रमात स्वागत ! चित्र १ ok ........ आज त्याचे लक्ष सारखे मनोऱ्यावरील घड्याळाकडे होते. तशा त्याने आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि स्पर्धाही जिंकल्या होत्या. परंतु आजची कसोटी काही वेगळीच होती. तिने त्याला साडेचार वाजताची वेळ दिली होती. तेव्हा ते दोघे इमारतीच्या त्या ठराविक कोपऱ्यात भेटणार होते. तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती...... चला तर, यापुढे गोष्ट लांबवत न्या.....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1769 views

🗣 चर्चा (6)
व
विजुभाऊ Wed, 08/31/2022 - 10:40 नवीन
कशाला?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/31/2022 - 11:02 नवीन
बाकी मराठी साहित्य आणि सीरीयल्स मधील सारखे सारखे तेच तेच लग्न , प्रेमप्रकरणं , नातेवाईक, अन त्यांच्या नसत्या कटकटी पाहुन पाहुन कंटाळलो आहे. आता तुम्ही कथेची सुरुवात त्याच तशाच काहीशा नोटवर केली असल्याने सध्या तरी काहीही लिहायची इच्छा नाही. तुर्तास वाट पहात आहे . बघु कोणी काही वेगळा टर्न देतो का कथेला !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/31/2022 - 12:06 नवीन
तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती......
तो अधीर होऊन तीच्या समोर गेला............ तो समोर दिसताच ती दुरूनच म्हणाली यु यू यू यू..... प्रेमभरली ही हाक ऐकून तो आणखीन जवळ आला .... ( दिला की नाही यू टर्न.....)
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/31/2022 - 12:56 नवीन
अभिनव उपक्रम कुमारजी एक सूचना कराविशी वाटते की या कथेच्या अनेकविध शाखा आणि आवृत्त्या बनवू म्हणजे सुरुवात तुम्ही केली तिच ठेवून त्यावर येणारे विस्तार विविध शाखांतून/ आवृत्त्यातूंन करु. उदा:
........ आज त्याचे लक्ष सारखे मनोऱ्यावरील घड्याळाकडे होते. तशा त्याने आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक परीक्षा दिल्या होत्या आणि स्पर्धाही जिंकल्या होत्या. परंतु आजची कसोटी काही वेगळीच होती. तिने त्याला साडेचार वाजताची वेळ दिली होती. तेव्हा ते दोघे इमारतीच्या त्या ठराविक कोपऱ्यात भेटणार होते. तिला तिच्या पूर्वायुष्यातले एक मोठे गुपित त्याला सांगायचे होते. ते ऐकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची मात्र कोणालाच कल्पना करता येत नव्हती......
या तुमच्या सुरुवातीला १ म्हंटले तर
तो अधीर होऊन तीच्या समोर गेला............ तो समोर दिसताच ती दुरूनच म्हणाली यु यू यू यू..... प्रेमभरली ही हाक ऐकून तो आणखीन जवळ आला
विजुभाउंनी केलेला हा विस्तार १.१ शाखा म्हणता येईल. आता ज्याला १.१ शाखेवरच पुढे विस्तार करायचा तो १.१.१ असा विस्तार करेल. एखाद्याला १.१ हवंय पण १.१.१ नकोय तो १.१.२ असा विस्तार करेल.. आणि पण ज्याला विजुभाउंनी केलेला विस्तार नको असेल तो १.२ अशी शाखा बनवून विस्तार करेल..
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/31/2022 - 12:57 नवीन
झालेच तर एकच प्रतिसादक एकापेक्षा जास्त शाखाही बनवू शकेल
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 08/31/2022 - 13:00 नवीन
वरील सर्वांना धन्यवाद.
या कथेच्या अनेकविध शाखा आणि आवृत्त्या बनवू
>> काहीच हरकत नाही. आपापल्या इच्छेनुसार विविध मार्गांनी गोष्ट पुढे नेता येईल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा